शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
3
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
4
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
5
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
6
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
7
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
8
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
9
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
10
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
11
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
12
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
13
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
14
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
15
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
16
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
17
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
18
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
19
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
20
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...

चीनच्या रस्त्यांवर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 08:33 IST

चीन. आपला सख्खा शेजारी. त्याच्याविषयी आपण ‘ऐकतो’. पण त्या देशात फिरताना कळतो तो चीन वेगळा दिसतो, वेगळा भासतो.. तो समजून घेताना..

-  नीलेश बने

बीजिंग विद्यापीठात पोहचताच आमचं स्वागत ‘आईए, आने में आपको कोई तकलिफ तो नही हुई ना?’ असं अस्सल हिंदीमधून झालं. साउथ एशियन स्टडीज विभागाचे प्रमुख जिंयांग जिंकुई यांनी केलेलं हे स्वागत आम्हाला अनपेक्षित नसलं तरीही कानांना आनंद देणारं होतंच. आज या विद्यापीठात जिंकुई यांचे अनेक विद्यार्थी हिंदी शिकताहेत. या साऱ्या हिंदी-चीन नात्याचे जनक होते, थोर संस्कृत पंडित झी शियानलिन. रामायणाचा संस्कृतमधून चिनी भाषेत अनुवाद करणाºया शियानलिन यांना भारत सरकारनं पद्मभूषण देऊन गौरविलं आहे. या जी शियानलिन यांचा बीजिंग विद्यापीठातील पुतळा या दोन देशांमधील हजारो वर्षांच्या समृद्ध देवाणघेवाणीची साक्ष पटवत राहतो.बीजिंगप्रमाणे चीनमधील इतरही अनेक विद्यापीठांत भारतीय भाषा आणि भारतीय समाजव्यवस्थेचा अभ्यास करणारे शेकडो विद्यार्थी तयार होताहेत. काही विद्यार्थी तर, भारतात येऊन येथील भाषांचा आणि समाजशास्राचा अभ्यास करताहेत. जागतिकीकरणानंतर वाढत असलेल्या भारत-चीन व्यापारी आणि भूराजकीय संबंधांसाठी चीनने उचलेले महत्त्वाचे पाऊल आहे. ज्या देशाशी आपल्याला व्यवहार करायचा त्या देशाबद्दल, तिथल्या माणसांबद्दल, भाषेबद्दल माहिती असायला हवी, हे चीननं पुरतं जाणलं आहे.भारतातही आज मेंडरिन शिकणाºयांची संख्या वाढत असली, तरी विद्यापीठीय पातळीवर मात्र पुरती बोंब आहे. चीन आणि तिथल्या समाजव्यवस्थेबद्दल आपल्याकडे समज कमी आणि गैरसमज जास्त अशी परिस्थिती आहे. चिनी माणसं क्रूर असतात, ते साप-किडे वाट्टेल ते खातात, चीनमध्ये फिरणं धोकादायक आहे अशी धारणा आपल्याला सर्रास आढळते. चीनमध्ये फिरताना मात्र यातील अनेक गोष्टी अतिरंजित आहेत याची खात्री पटत जाते. उलट भारत आणि चीनमध्ये असलेले अनेक समानतेचे धागे सहजपणे जाणवू लागतात. आज जग जवळ येत असताना आणि चीन महासत्ता म्हणून उदयाला येत असताना, चीन समजून घ्यायलाच हवा असं ठामपणे वाटू लागतं.चीनच्या कोणत्याही विमानतळातून बाहेर पडलो की, परदेशाच्या टिपिकल वर्णनाप्रमाणे, आकाशाशी स्पर्धा करणाºया इमारती, भव्यदिव्य रस्ते, त्यावरून धावणाºया सुसाट गाड्या, चकाचक स्वच्छता हे सारं पहायला मिळतं. भारतातून जाणाºया प्रत्येकाला हे चित्र ‘वॉव’ असं वाटणारं असलं, तरीही चीनची खरी ओळख पटते ते तेथील माणसांशी बोलायला लागल्यानंतर. चिनी माणूसही कुटुंबकबिल्यात रमणारा असल्यानं त्यांच्याशी सहज गट्टी जुळते. बुद्धाच्या देशातून आलेल्या भारतीय माणसांबद्दल चिनी माणसाच्या मनात असलेला आदरही अनेकदा जाणवतो. फक्त अडचण येते ती भाषेची. पण व्यवहाराच्या पातळीवर चीनने त्यावर मात केली आहे.तुम्ही कोणत्याही दुकानात गेलात आणि तुम्हाला तिथली एखादी वस्तू आवडली की तुम्ही त्या वस्तूच्या दिशेने बोट दाखवायचं. दुकानदार ती वस्तू तुमच्या हाती काढून दाखवणार. तुम्ही खुणेने किंमत किती म्हणून विचारता क्षणीच, तो कॅलक्युलेटर हातात घेणार आणि त्यावर त्याचा आकडा टाकणार. मग तुम्ही ही किंमत मान्य नाही म्हणून मान डोलावलीत की तो त्याचा आकडा थोडा कमी करणार. तुम्ही पुन्हा मान डोलावून तुमचा आकडा त्यावर टाकलात की तो मान डोलावणार आणि त्यावरची किंमत त्यावर टाकणार. सौदा पटला तर ती वस्तू प्रेमाने पॅक करून तुमच्या हातात देत ‘श्ये श्ये’ म्हणजे ‘थँक यू’ म्हणणार.याहून एक गमतीचा प्रकार आम्ही हाँगझूमध्ये पाहिला. हाँगझू या नितांतसुंदर शहरामध्ये ग्रँडमा’ज किचन नावाचं अस्सल चिनी जेवण वाढणारं हॉटेल आहे. या हॉटेलच्या परिसरात अक्षरश: आपल्याकडील जत्रा वाटावी अशी दुकानं लागली होती. तेथील एका दुकानात एक जण साखरेच्या पाकामधून आपल्या लॉलीपॉपसारख्या कॅण्डी बनवित होता. पण त्या कॅण्डींना तो फुलपाखरू, ड्रॅगन असे विविध आकार देत होता. त्याचं ते कसब लाजवाबच होतं; पण ज्यांना चायनीज बोलता येत नाही, त्याला आपल्याला काय हवं हे कसं सांगायचे म्हणून त्याने समोर चक्क घड्याळासारखी तबकडी लावून ठेवली होती. आपल्याला ज्या आकाराची कॅण्डी हवी त्या चित्रावर काटा ठेवायचा आणि युवान द्यायचे. आपल्याला हवं ते चित्र साखरेच्या पाकातून साकारत तो आपल्या हातात देणार.‘शब्देविण संवादू’चा हा अनुभव घेत खरं तर संपूर्ण चीन फिरणंही फारसं अवघड नाही. आता तर नव्या पिढीला बºयापैकी इंग्रजी बोलता येतं त्यामुळे बीजिंग, शांघाय, ग्वांगडांग, हाँगझू आदी शहरात (त्यांच्या आणि आपल्याही) तोडक्यामोडक्या इंग्रजीतून संवाद साधता येतो.इथं पोटाशी साहसी खेळ ज्यांना करायचे नाहीत, त्यांच्यासाठी भारी पर्याय म्हणजे इंटरनेटवरील भारतीय रेस्टॉरंटची यादी तयार ठेवायची. आज चीनमधल्या प्रत्येक शहरात अनेक भारतीय रेस्टॉरंट आहेत. तिथे अगदी इडली डोश्यापासून पनीर माखनीपर्यंत आणि कटिंग चहापासून चिकन बिर्याणीपर्यंतचे पदार्थ मिळतात. समजा आपण जिथे फिरतो आहोत, तिथे जवळ भारतीय रेस्टॉरंट नसेलच, तर आसपासचे सुपरमार्केट शोधायचं भारीतली भारी फळे तिथे स्वस्तात मिळतात. तसेच ब्रेड, बटर, चीज मिळतंच. फलाहारावर किंवा ब्रेड बटरवर सहजपणे वेळ मारून नेता येते.आम्ही ज्या बीजिंगमधील हॉटेलात उतरलो होतो तिथल्या किचनमध्ये आम्हाला विजेंदर प्रसाद भेटला आणि आमचे बीजिंगमधले दिवस दाल-राइस आणि पराठा खात आनंदात गेले. उत्तराखंडमधील गढवाल विद्यापीठातून शिकलेला विजेंदर २००८ मध्ये बीजिंगमध्ये झालेल्या आॅलिम्पिक खेळाच्या वेळी शेफ म्हणून चीनमध्ये आला. तो सांगत होता की, त्याच्यासारखे बरेच जण या दरम्यान चीनमध्ये आले इथलेच झाले.भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला आणि १९४९ मध्ये चीनमध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली. दोन्ही देशांनी एकत्रच; पण दोन स्वतंत्र मार्गाने नव्या पर्वाला सुरुवात केली. आज भारत महासत्ता बनण्याचं स्वप्न पाहत असताना, चीन जवळपास महासत्ता बनला आहे. अर्थात या महासत्तेला अमानुष नरसंहारांची आणि हुकूमशाहीची काटेरी टोचणी आहे. तरीही गेल्या सत्तर वर्षाने चीनने जो बदल घडवलाय, तो कमालीचा विस्मयकारक आहे.जगभर कम्युनिझमचा पराभव होत असताना, चीनने भांडवलशाही स्वीकारूनही रुजविलेला कम्युनिझम भल्याभल्या अभ्यासकांना कोड्यात टाकणारा आहे. मानवी इतिहासात समूह म्हणून जगताना चीन करत असलेला हा प्रयोग विकासाकडे नेणारा आहे की विनाशाकडे हे येणारा काळच ठरवेल. पण चीनचं जे काही होईल त्याचा परिणाम भारतावर आणि पर्यायाने तुमच्या आमच्यावर होणार आहे. कारण भारत आणि चीन हे भूगोलाने जोडलेले शेजारी आहेत. त्यामुळेच चीन समजून घेणं या प्रवासात अधिक गरजेचं वाटत गेलं.भारतीय दूतावासातील एक उच्चपदस्थ अधिकारी आम्हाला सांगत होते की, आज चीन ज्या वेगाने भारताचा आणि भारतातील विविध विषयांचा अभ्यास करते आहे, त्या तुलनेत भारतात मात्र चीनचा अभ्यास होताना दिसत नाही. दोन्ही देशांमधला व्यापार आज वाढतो आहे. एशियन डेव्हलपमेंट बँकेचे मुख्यालय चीनमध्ये आहे, त्याचे प्रमुख के.व्ही. कामत हे भारतीय आहेत. दुर्दैवानं भारतात मात्र चीनबद्दलचा अभ्यास गांभीर्याने होताना दिसत नाही. चीनबद्दलची अढी मनातून काढून टाकून त्यासाठी चीन फिरायला हवा, अनुभवायला हवा आणि समजून घ्यायला हवा.

(लेखक ‘ऑब्झर्व्हर रिसर्च फाउण्डेशन’ येथे रिसर्च फेलो म्हणून काम करतात. अलीकडेच त्यांनी एका अभ्यासासाठी चीनचा दौरा केला.)