शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

चॅटबॉट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 12:52 IST

भारतात ४० लाख लोकं आयटी सर्व्हिसमध्ये काम करतात. त्यातील २० लाख (म्हणजे निम्मे!) लोकं हे अजून ३-४ वर्षांत चॅटबॉट या विकसित तंत्रज्ञानानं ‘विस्थापित’ होण्याची शक्यता आहे!

- भूषण केळकर

आपण इंडस्ट्री ४.० चे नऊ मुख्य भाग बघितले. त्यातील रोबोटिक्स आणि सिम्युलेशन/इंटिग्रेशन हे पहिले दोन भाग आज आपण अधिक विस्तृतपणे समजावून घेणार आहोत. रोबोट हा शब्द मूळचा ‘रोबोटा’ या झेक शब्दावरून येतो. १९२० च्या सुमारास या शब्दाचा प्रथम वापर झाला. जोसेफ कॅपेक या झेक माणसाकडे रोबोट शब्दाचं जनकत्व जातं. जगात अनेक संस्कृतींमध्ये रोबोट या संकल्पनेची मुळं दिसतात. रोबोट म्हणजे गुंतागुंतीची एकसारखी कामे स्व-नियंत्रितपणे करू शकणारी प्रणाली वा यंत्र. प्रामुख्याने रोबोटमध्ये ‘यंत्र’ हा भाग महत्त्वाचा आहे. भारतीय संस्कृतीमध्येसुद्धा ‘लोकपन्नती’ याने बौद्ध अवशेष/ खुणांचे जतन करणारी यंत्रं ‘भूतवाहनयंत्र’ याचा उल्लेख केलाय. ‘समरांगण सूत्रधार’ या संस्कृत पुस्तकात यांत्रिक वाहक- नर्तक इत्यादींचा उल्लेख ११ व्या शतकात आहे. रोबोट्रिकचा इतिहास जेवढा रंजक आहे तेवढाच वर्तमान आणि विशेषत: भविष्यकाळ रोमहर्षक आहे यात शंकाच नाही.

इंडस्ट्री ४.० मध्ये रोबोट्सचा वापर अनेक क्षेत्रांमध्ये होतो आहे. आपण आधीच्या लेखात गाड्या तयार करणाºया फॅक्टरीमध्ये होणारा त्यांचा वाढता वापर, विशेषत: युद्ध तंत्रज्ञानात होणारा वापर तसेच अगदी रेस्टॉरण्ट्समधील वेटर्स म्हणूनसुद्धा अगदी भारतातही होणारा वाढता वापर पाहिला. याच संकल्पनेत अजून दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. बॉट्स व चॅटबॉट्स! बॉट ही एक संगणकीय प्रणाली/ सॉफ्टवेअर अप्लिकेशन असते की ज्यामुळे इंटरनेटवर स्वयंचलित कामं करता येतात. याची अनेक रुपं आहेत. नावं आहेत. उदा. इंटरनेट बॉट, वेब बॉट, डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू रोबोट किंवा नुसताच बॉट. यांना एजंट असंही कधी कधी संबोधलं जातं.

यात एक विशेष रूप म्हणजे ‘चॅटबॉट’. आपल्या सगळ्यांना व्हॉइस चॅट माहिती असतं. याहू किंवा व्हॉट्सअ‍ॅप/ फेसबुकमुळे ‘चॅटिंग’ फंडा (संभाषण) आपल्याला नवीन नाही. जेव्हा रोबोट किंवा बॉट हाच चॅटिंग करतो त्याला म्हणतात चॅटबॉट!

भारताला हे चॅटबॉट का महत्त्वाचे आहेत? अहो, हेच बघा ना की, मेकॅन्सी या कंपनीच्या अहवालानुसार भारतात जे ४० लाख लोकं आयटी सर्व्हिसमध्ये काम करतात. त्यातील २० लाख (म्हणजे निम्मे!) लोकं हे अजून ३-४ वर्षांत या चॅटबॉटच्या विकसित तंत्रज्ञानानं ‘विस्थापित’ होण्याची शक्यता आहे! ज्याला सारं जग आणि विशेषत: भारत व फिलिपीन्स हे बीपीओ म्हणून ओळखतं, त्यात भारताची आयटीमधली खरी ताकद संख्येच्या पातऴीवर आहे. चॅटबॉट्सच्या प्रगतीमुळे बीपीओमध्ये मानवी सहभाग झपाट्यानं कमी होणार आहे हे नक्की.इंडस्ट्री ४.० मधला दुसरा महत्त्वाचा भाग आहे. सिम्युलेशन आणि हॉरिझोंटल/ व्हर्टिकल इंटिग्रेशन. म्हणजे जे भौतिक जग आहे त्याची व्हिज्यूअल किंवा आभासी प्रतिमा करणं आणि या व्हर्च्युअल ट्विन किंवा ‘आभासी जुळे’ यांच्या सहाय्यानं अनेक कामं करणं.आजकाल कंट्रोल रूममध्ये जगडव्याळ असणाºया कारखान्याचा ‘आभासी जुळा’ असतो आणि त्यामुळे नुसती माहिती मिळवणं एवढंच नव्हे तर कारखान्यातील विविध क्षेत्रांतील यंत्रांवर/ प्रक्रियांवर नियंत्रण ठेवणंपण शक्य असतं. सिम्युलेशनचं अजून एक उदाहरण तुम्हाला देतो. अ‍ॅनटॉमॅग टेबल या नावानं सिम्युनेशनमुळे वैद्यकीय क्षेत्रात आमूलाग्र बदल झालाय. मानवी शरीराचे सर्व भाग आणि अस्थी, मांस, स्नायू, अवयव आणि त्वचा अशा सर्व पातळ्यांवर वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थी व डॉक्टर्स हे प्रत्यक्ष शवविच्छेदनाशिवाय प्रत्यक्ष शवाशिवाय ज्ञान मिळवू शकतात. अधिक माहितीसाठी जॅकचोई याचा ट्रेड कॉम वरील या विषयावरचा व्हिडीओ जरूर पाहावा.रोबोट्स आणि सिम्युलेशनचा विचार करताना काही विचार मनात येतात. पुढे पुढे करून, खुशमस्करी करत लांगूलचालन करून वरिष्ठांची मर्जी सांभाळणाºया कर्मचाºयांना ‘रोबोट’ मॅनेजर बॉस म्हणून मिळाले तर त्यांची खैर नसेल आणि चांगले नेक काम करणाºयांना न्याय मिळेल हा भाग नक्की. परंतु, निदान आतातरी रोबोट मानवी भावविश्वात तोकडे आहेत हेही नक्की! आयक्यू पेक्षा इक्यू आणि कॉम्पिटिशनपेक्षा को- आॅपरेशनमध्ये पुरुषांपेक्षा स्त्रिया फार प्रगत असतात. रोबोट ना आयक्यू असेल; पण इक्यू असणं आवश्यक आहे हेच जणू सांगायला नागरिकत्व मिळालेला पहिला रोबोट आहे सोफिया, एक स्त्री.बदल आपल्यापासून असा फार लांब नाही.

( लेखक आयटी तज्ज्ञ आहेत.)bhooshankelkar@hotmail.com