शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
3
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
4
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
5
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
6
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
7
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
8
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
9
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
11
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
12
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
13
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
14
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
15
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
16
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
17
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
18
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
19
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
20
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत

चार्जिंगला लावलेल्या फोनच्या शॉकनं जीवाला धोका

By admin | Updated: April 4, 2017 15:23 IST

फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय आहे तुम्हाला? असेल तर ती झोप तुमच्यासाठी काळझोप ठरू शकते.

नाशिक, प्रतिनिधी,फोन चार्जिंगला लावून झोपायची सवय आहे तुम्हाला? असेल तर ती झोप तुमच्यासाठी काळझोप ठरू शकते. मोबाईल फोनची बॅटरी एक टक्का उरेपर्यंत अनेकजण फोनवर बोलतात, मग फोन एकीकडे चार्जिंगला लावून बोलतात आणि रात्री झोपताना तर फोन उशाशीच घेवून झोपतात. हे कमीच म्हणून जवळपास जर प्लग असेल तर अगदी उशाजवळ फोन ठेवून तो चार्जिंगला लावला जातो. फोन तापतो, चटके बसतात, तरीही बोलणं, व्हॉट्सअ‍ॅपवरच्या गप्पा संपत नाहीत..हे सारं जीवावर बेतू शकतं.वॉशिंग्टन पोस्टने या अमेरिकेतील दैनिकानं कालच प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार अशीच घातक सवय एका ३२ वर्षाच्या तरुणाच्या जीवावर बेतली. दैव बलवत्तर म्हणून तो बचावला. विल डे नावाचा हा तरुण अलाबामा राज्यात हंण्टसविल या शहरात राहतो. रात्री आपला आयफोन चार्जिंगला लावून तो झोपला. फोन उशाशीच होता. सकाळ होता होता कूस बदलली तशी त्याच्या गळ्यातली चेन त्या चार्जरवर पडली. आणि त्याच्या गळ्याला असा भयानक शॉक बसला की त्याचा पूर्ण गळा भाजला गेला, छातीही भाजली गेली. वेळेत दवाखान्यात पोहचल्यानं तो वाचला.तो सांगतो, मी कधी कल्पनाही केली नव्हती की गळ्यातली चेन, चार्जर या रोजच्या वापरातल्या वस्तूच अशा ब्लास्ट होतील आणि बॉम्ब फुटल्यासारख्या माझ्या अंगावरच फुटतील. साधारण १०० व्होल्ट्स इलेक्ट्रिसिटीचा शॉकही माणसासाठी जीवघेणा असू शकतो. त्यामुळे यापुढे फोन चार्जिंगला लावून बोलताना, उशाशी ठेवून झोपताना आपल्या जीवाला धोका आहे एवढं लक्षात असू द्या..प्रश्न आपल्या जीवाचा आहे..आणि इतरांच्याही!