शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विदान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
3
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
4
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
5
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
6
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
7
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
8
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
9
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
10
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
11
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
12
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
13
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
14
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
15
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
16
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
17
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
18
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
19
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
20
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं

पोट तरी कशावर भरणार तुम्ही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 15:19 IST

लाखोंनी इंजिनिअर कॉलेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे?

ठळक मुद्देजग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!

- मिलिंद थत्ते

नैसर्गिक साधनसंपत्ती हा सर्वाच्याच जगण्याचा आधार आहे. निसर्गातल्या वेगवेगळ्या वस्तूंवर आधारित पोटापाण्याचे उद्योग लोक करत असतात. पण तो आधार काढूनच घेतला तर? म्हणजे मासेच संपले किंवा मासे पकडण्यावर बंदीच घातली तर मच्छीमारांनी जगायचे कसे? किंवा जमीन नापीक झाली वा त्यावर नांगर धरायची परवानगीच काढून घेतली तर शेतकर्‍यांनी जगायचे कसे?निसर्गाच्या वापराचे कोणते हक्क कोणाकडे आणि कशासाठी आहेत यावर ती माणसं टिकणार का आणि निसर्ग टिकणार का हे अवलंबून असते. समजा एखाद्या जंगलातून इमारती लाकूड काढण्याचे हक्क एखाद्या कंपनीला 10 वर्षांसाठी दिले तर काय होईल? त्या कंपनीला त्याच 10 वर्षात जास्तीत जास्त नफा कमवायचा आहे. ती कंपनी अधिकाधिक लाकूड तोडेल, त्या लाकडाच्या आड येणार्‍या इतर झाडाझुडपांना ‘अडथळा’ मानून नष्ट करेल, 10 वर्षात आणखी लाकूड देतील अशा झाडांची लागवड ‘अडथळा’ साफ केलेल्या जागेवर करेल. अडथळा म्हणून नष्ट केलेल्या झुडपांत काही औषधी वनस्पती असतील. त्या वनौषधींपासून औषध बनवणारा एखादा स्थानिक वैद्य/वैदू असेल. कंपनीने तो ‘अडथळा’ नष्ट केल्यावर या वैदूच्या पोटापाण्याचे काय होईल?जेव्हा जेव्हा नवे तंत्रज्ञान येते, नवे उद्योग येतात, तेव्हा संसाधनांवरचे अधिकार इकडून तिकडे हेलकावे खातात. जेव्हा जेव्हा माणूस निसर्गावर घाला घालतो, तेव्हा तेव्हा तो काही माणसांवरही घाव घालत असतो. अशा स्थितीत ‘बळी तो कान पिळी’ हा कायदा चालतो. मरेनात का दुबळे लोक - असा याचा अर्थ होतो. तसं होणं योग्य नसेल तर आपण भारतीय समाज म्हणून काही काळजी घेणं भाग आहे. आपल्या संविधानात यालाच ‘समान संधीचा अधिकार’ म्हटलं आहे. काळ बदलतो, तंत्रज्ञान बदलतं - तेव्हा मागे राहणार्‍यांना किमान उभं तरी राहता यावं याची काळजी आपण भारतीय म्हणून करतो का?शेकडो वर्षापूर्वी आपल्यापैकी काही लोक शेतीकडे वळले. त्यांना एका जमिनीला धरून राहण्याचं महत्त्व कळलं. नदीकाठच्या सुपीक गाळाच्या जमिनी त्यांनी ताब्यात घेतल्या. आजही आपण असं पाहतो की, तेव्हा जे शेतीकडे वळले नाहीत, शिकार करत राहिले किंवा फळे-कंद गोळा करून पोट भरत राहिले - त्यांना आताही मागास म्हटलं जातं. त्यांच्या हातात सत्ता नाही. वरकस, छोटय़ा तुकडय़ातल्या जमिनी आहेत. किंवा भूमिहीन आहेत. शेकडो वर्षापूर्वी शेतीचं युग सुरू झाले, तेव्हा मागे राहिलेले आपले भाऊबंद आताही मागे आहेत. पुढचे युग यंत्रोद्योगांचे आले. जे यंत्रविद्या व कौशल्य शिकले, त्यांनी यंत्रयुगात विकास साधून घेतला. काही महापुरुषांनी तेव्हाच ‘शहरांकडे चला’ हा मंत्र दिला. पुढचे युग शहरांच्या स्फोटाचे आहे. अतिलोकसंख्येकडे कोलमडणार्‍या शहरांचे आहे.शहरांचे विकेंद्रीकरण हा पुढचा मंत्र सुरू झाला आहे. यंत्र चालवण्यासाठी माणसांची गरज उरलेली नाही. अनेक अवघड कामे करणारे यंत्रमानव तयार होत आहेत. ते संप करत नाहीत, पगारवाढ मागत नाहीत, जातीय गुंडगिरी करत नाहीत. अशा काळात पुन्हा युग बदलत असताना माणसांना नेमके काय काम उरणार आहे? रसायनयुक्त अन्नाने जग त्रासत चालले आहे. नवीन आजार येताहेत, आणि वैद्यक माफियांची चांदी होत आहे. पुन्हा शाश्वत जीवनशैलीकडे, रसायनमुक्त अन्नाकडे जाण्यासाठी पैशाने  पुढारलेले लोक मागे वळू लागले आहेत. शुद्ध अन्न महाग होण्याचा पुढचा काळ आहे.आपण गावातले सामान्य तरुण या उलथापालथीत कशाला धरून राहू शकतो? लाखोंनी इंजिनिअर वगैरे कालेजांच्या फॅक्टरीतून टिकल्या छापल्यासारखे बाहेर पडत असताना शिक्षणाला काय किंमत उरणार आहे? जग उलटेपालटे झाले तरी शाश्वत राहणारी एकच वस्तू आपल्या हातात आहे. ती ओळखा आणि राखा!