शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
निवडणुका जाहीर होताच उद्धवसेनेला धक्का; माजी नगरसेवकांचा जय महाराष्ट्र, शिंदे गटात प्रवेश
4
“२०२९ मध्ये भाजपा विरुद्ध सर्व पक्ष असे चित्र दिसेल, राक्षसी महत्त्वाकांक्षा...”: रोहित पवार
5
IPL 2026 Auction : लिलावासाठी काव्या मारन नटली; सोशल मीडियावर तिच्या स्टायलिश Look ची चर्चा रंगली
6
Marriage: लग्नात आधी वधू वरमाला का घालते? त्यामागे काय आहे धार्मिक आणि सामाजिक कारण 
7
कष्टाचं फळ! आईसोबत शेतात केली मजुरी; ८ वेळा अपयश पण खचला नाही, झाला मोठा अधिकारी
8
विराट आणि अनुष्का पुन्हा एकदा पोहचले वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे घेतले आशीर्वाद
9
"अरे मर्दा, मागे तर बघ, आम्ही बिहारहून आलोय!" Vaibhav Suryavanshi याचा 'तो' व्हिडीओ व्हायरल
10
८ दिवसांत १८० टक्क्यांची तेजी; सातत्यानं 'या' शेअरला लागतंय अपर सर्किट, केडियांचीही आहे गुंतवणूक
11
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
12
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
13
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
14
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
15
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
16
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
17
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
18
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
19
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
20
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! डिजिटल प्रेझेन्स तुमची संधी घालवू शकतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2019 07:00 IST

आपलं ऑनलाइन अस्तित्व कसं आहे? कशी आहे तिथं तुमची इमेज? तिथं काय काय पोस्ट करता? यावर नुसतं तुमचं तिथलं अस्तित्वच नाही तर तुमच्या नोकरी मिळण्या - न मिळण्याच्या शक्यताही अवलंबून आहेत.

ठळक मुद्देआपण आपल्या डिजिटल प्रेझेन्समध्ये काय करणं उत्तम आणि काय घातक याची ही एक चेकलिस्ट.

- डॉ. भूषण केळकर

परवा कॉलेमध्ये माझं सॉफ्ट स्किल्सवरचं सेशन झालं आणि घरी परत असताना एक मलगी धावत आली आणि म्हणाली, सर, मला गुगलकडून आपणहून फोन आला होता  इंटर्नशिपसाठी, मी ती प्रोसेस पुढे चालू ठेवू का हे सगळं फेक असू शकेल?त्यापुढे तिचं म्हणणं मला महत्त्वाचं वाटलं. ती म्हणाली की, माझा सेमिनार स्पीच रेकगनायझेशनमधे होता हेसुद्धा त्यांनी आपणहून सांगितलं. फोनवर आणि त्याच संबंधीची इंटर्नशिप आहे म्हणाले.मी आधीतच तिला डोमेन चेक करून मग रिझ्युम पाठवायला सांगितला. पण मला या प्रकारच्या प्रॉडक्टिव्ह रिक्रूटमेंट म्हणजे तुम्ही अर्ज न करता कंपन्यांनी तुम्हाला आपण होऊन इमेल/एसएमएस/फोन करण्याचं काही आश्चर्य वाटलं नाही. कारण तोच सध्याचा ट्रेण्ड आहे. अगदी फ्रेशर्सकरितासुद्धा.आणि म्हणून सॉफ्ट स्किल्सच्या माझ्या सेशनमध्ये मी गेली 5 वर्षे डिजिटल प्रेझेन्स (आभासी अस्तित्व !) यावर मुलामुलींशीच काय अगदी कंपन्या व सरकारी अधिकार्‍यांच्या ट्रेनिंगमध्येही सतत बोलतोय.आता आपण काही आकडे पाहू म्हणजे तुम्हालाही या डिजिटल  प्रेझेंनसचं महत्त्व कळेल.* 93 % कंपन्या या आजकाल लिंकडीन वरून कर्मचारी भरती करत आहेत !* 66 % कंपन्या फेसबुकवरून आणि 58 % कंपन्या ट्विटरवरून !माझा सर्व वाचक मित्र-मैत्रिणींना प्रश्न आहे की, तुमच्यापैकी किती जण लिंकडीनवर आहेत? बहुधा तुम्ही सर्वजण एफबीवर असाल क्वचित ट्विटरवरपण असाल; परंतु लिंकडीन वर आहात का? ते एक प्रोफेशन नेटवर्क आहे. वाढदिवसाचे फोटो आणि पार्टीची धमल वा नवीन आणलेलं नेलपेण्ट किती सूट होतंय हे दाखवण्यासाठी एफबी असेल; परंतु लिंकडीनवर फक्त प्रोफेशनल गोष्टीच मांडल्या जातात. आणि कंपन्या त्या तपासत असतात. मतितार्थ हा की जर तुम्ही लिंकडीनवर नसाल तर आजच अकाउण्ट (फुकट असतंय !) उघडा आणि तुमची प्रोफेशनल माहिती त्यावर नीट विचारपूर्वक अपलोड करा. न जाणो कंपन्या तुम्हालासुद्धा पुढील महिन्यात जॉबसाठी कॉण्टॅक्ट करतील आपण होऊन!त्यामुळे हे प्रोफेशनल अकाउण्ट कसं वापरायचं, त्यावर काय लिहायचं काय लिहायचं नाही हे जरा समजून घ्या.  पुढील संवादात हा विषय आपण अजून पुढे नेऊ !*****डिजिटल सावधान!

 

1. फेसबुक, लिंकडीन, ट्विटर इ. वर तुम्ही सक्रिय असावंच. पण तुमचं यश, नवे प्रकल्प तिथं वेळेत अपलोड करावेत.2. या सर्व फ्लॅटफॉर्म्सवर तुमचं नाव एकच असावं. म्हणजे मी लिंकडीनवर भूषण व एफबीवर भूषण केळकर आणि ट्विटरवर डॉ. भूषण केळकर असं वेगवेगळं नाव ठेवू नये. सगळीकडे सारखंच असावं. कारण ज्याला एसईओ म्हणजे सर्च इंजिन ऑप्टीमायझेशन म्हणतात. त्यात तुमचं प्रोफाईल उठावदारपणे दिसणार नाही. एकच  नाव सगळीकडे नियमित ठेवलंत तर उपयोग होईल.3. आक्षेपार्ह मजकूर गमतीतसुद्धा नको. असं दिसून आलंय की एफबी वगैरे वर 28 % लोकांचा मजकूर धार्मिक 15 % लोकांचा मजकूर हा वर्ण /लिंग इ. वरचे विनोद असा असतो. 54 %  लोकांच्या लिखाणात स्पेलिंग मध्ये चूक असते. शुद्धलेखन नीट नसतं. हे सर्व घातक ठरू शकतं.4. वेडेवाकडे फोटो व्हिडीओ अपलोड करूच नका; पण इतरांनी ते केले व तुम्हाला टॅग केलं असेल तर तत्काळ अनटॅग पण करा. किमान एवढी पत्थ्यं तरी पाळलीच पाहिजेत.