शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कॅम्पसवाली लव्हस्टोरी

By admin | Updated: June 26, 2014 18:42 IST

कॉलेज कॅम्पस’ आपण सगळ्यांनी पहिल्यांदा कॅम्पस कुठं पाहिलंय आठवतं? कितीही आठवा, बुद्धीला ताण द्या, आपल्यापैकी बहुतेकांनी कॉलेज कॅम्पस पहिल्यांदा सिनेमातच पाहिलं.

 सिनेमातले बेस्ट कॅम्पस

 
कॉलेज कॅम्पस’ आपण सगळ्यांनी पहिल्यांदा कॅम्पस कुठं पाहिलंय आठवतं? कितीही आठवा, बुद्धीला ताण द्या, आपल्यापैकी बहुतेकांनी कॉलेज कॅम्पस पहिल्यांदा सिनेमातच पाहिलं. कॉलेजात जायचं म्हणजे तशाच एखाद्या कॅम्पसमध्ये जायचं आणि सिनेमात जे जे घडतं, ते ते सारं आपल्याही संदर्भात घडेल किंवा घडावं अशी भाबडी आशा मनात ठेवून अनेक जण कॉलेजात गेले.
सिनेमातलं सारं जसं आयुष्यात घडत नाही, तसे सिनेमातलं कॅम्पस आणि त्या कॅम्पसमधली दोस्ती आणि लव्हस्टोरी तरी आपल्या आयुष्यात कशी येईल?
नाहीच येत. ती न आल्यानं अनेकांना कॉलेजात जायला लागलं की वाटतं या कॉलेजपेक्षा आपली शाळाच फार भारी होती. शाळेतल्या दोस्तांबरोबर मजा यायची आणि कॉलेज मात्र जाम इरिटेटिंग. हे असं वाटण्याचं कारण म्हणजे आपल्या डोक्यातली कॅम्पसची प्रतिमा आणि आपल्या वाट्याला आलेलं कॅम्पस काही मेळ खात नाही.
सिनेमातली कॅम्पस कशी चकचकीत, हॅपनिंग, एकदम इंटरेस्टिंग. आणि आपलं कॅम्पस मात्र थंड, शांत, येथे काहीही घडत नाही असा छाप मारल्यासारखं. पण काय करणार वास्तव आणि फॅण्टसी यात काहीतरी फरक असतोच ना? आणि फॅण्टसी ही नेहमीच अद्भुत, रम्य वाटते.
अशीच फण्टास्टिक कॅम्पस आपण आजवर कुठल्या सिनेमात पाहिली, कुणी कुणी आपल्याला स्वप्न विकली आणि कुणाकुणावर आपण फिदा झालो याची ही एक सिनेमॅटिक झलक.
- अनिरुद्ध जाधव
 
तेजाब
तसा फार्फार वर्षांपूर्वी आला होता हा सिनेमा. पण आजही ‘तेजाब’मधल्या कॅम्पसची मजा पाहताना भारीच वाटतं. मुन्ना आणि मोहिनीची लव्हस्टोरी, मुन्नाचं मुन्नाचे लडकी पटवण्याचे फॉर्म्युले, सायकॉलॉजिकल नुस्के, मुन्ना आणि त्याच्या मित्रांचा कॉलेजमधला धांगडधिंगा, हे सारं या सिनेमातल्या कॅम्पसमध्ये भेटतं. बाकी, सिनेमाची कथा भलतीकडेच जाते, पण लक्षात राहतं ते ‘तेजाब’मधलं कॅम्पसच.
कयामत से कयामत तक.
तुम्ही म्हणाल या सिनेमात कुठं दिसलं होतं कॅम्पस? नव्हतंच दिसलं, पण सिनेमाची सुरुवातच आमीरच्या फेअरवेल पार्टीनं ‘पापा कहते है बडा नाम करेगा’ म्हणत होते ना. तेव्हा वाटतं, आपल्या कॉलेजात अशी पार्टी व्हायला पाहिजे.
दिल
आमीर आणि माधुरीच्या या सुपरहिट सिनेमातलं कॅम्पस आठवा. काय ती लव्हस्टोरी आणि काय ती कॉलेजातली डान्स प्रॅक्टिस. इतकं भन्नाट कॅम्पस आणि आमीर खानचा त्यातला भंकसपणा विसरू म्हणता विसरता येत नाहीच.
जो जिता वही सिकंदर
हा तर अख्खा सिनेमा त्या कॅम्पसमधल्या स्पर्धेसाठी आणि कॉलेजातल्या इर्षेसाठी अक्षरश: हजार वेळा पाहिला तरी कंटाळा येऊ शकत नाही. दोस्ती, जिगर, प्रेम, शत्रुत्व, बेरकीपणा, पंगे, जिंकण्याची जिद्द, गरिबांचा लढा काय नाही त्या एकाच कॉलेजातल्या कॅम्पसमध्ये.सिनेमा संपता संपता आपण स्वत:ला संजयलालच्या जागी पाहत सिकंदर समजायला लागतो हे नक्की.
खिलाडी
या सिनेमातला अक्षयकुमार अर्थात खिलाडी राज आठवा. त्याला सतत पैंज लावण्याची सवय. पैंज तो नेहमी जिंकतोही. त्याच्या कृपेनं गाजलेलं ‘कॉलेज में नयी नयी आयी एक लडकी है. खुद क्या समझती है.’ -हे गाणं आठवा. त्या गाण्यानं आणि खिलाडी राजनं अनेकांना कॉलेजच्या पहिल्या दिवशी नैराश्याचा झटका आणला. या सिनेमातल्या कॅम्पसमध्ये राज पहिल्या दिवशी सगळ्या स्टाफला डोळे मारण्याचं औषध पाजतो. त्यात पंख्यावर फुलांच्या पाकळ्या ठेवतो आणि तेवढय़ात ती येते तर तिच्या अंगावर पाकळ्यांचा पाऊस पडतो. किती रोमॅण्टिक सारं.
पण असं कुठं घडतं खर्‍या कॅम्पसमध्ये? 
कुछ कुछ होता है.
कॅम्पसमधला खरा चकचकीतपणा आणि अस्सल मजा दाखवली ती करण जोहरच्या या ‘कुछ कुछ होता है’ नेच.काय ते कॅम्पस, त्यातले प्राध्यापक, प्राध्यापिकेचा स्कर्ट, वर्गातले विनोद, ती मुलामुलींची मैत्री, त्यांच्या पाटर्य़ा, सगळंच भन्नाट होतं. या सिनेमानं आणि त्यातल्या कॅम्पसनं त्यावेळच्या तरुण पिढीला पुरतं पागल केलं होतं.
मै हूॅँ ना
तसं कॅम्पस ‘मै हूॅँ ना’ सिनेमातही होतंच. त्यातली सुश्मिता सेननं साकारलेली प्राध्यापकाची भूमिका, त्यात त्या लकीचा हेअरकट आणि शाहरुख खानचं नव्यानं कॉलेजात जाणं, कव्वाली गाणं, त्याच्या मागे एकदम व्हायोलिनच वाजायला लागणं, सगळंच कल्पनेपलीकडचं होतं. असं कॅम्पस या देशात कुठंच नसेल, पण सिनेमात होतं.
मोहब्बते
या सिनेमात जसं गुरुकुल असतं तसं कॅम्पस भारतात नक्की कुठं असतं? असं काही विचारू नका. तसं असेलच असं नाही, पण अमिताभने साकारलेले नारायण शंकर आणि शाहरुखचा राज, त्याचे ते शिष्य, त्यांची प्रेमकहाणी, यात अभ्यासबिभ्यास असं काही घडत नाही. परीक्षा वगैरे तर काही नसतंच. पण कॅम्पस मात्र नुस्तं चकचकीत, एकदम खास.
रंग दे बसंती.
विदेशातून आलेली सू या कॉलेजातल्या दोस्तांना विचारते, की अच्छा या कॅम्पसमध्ये तुम्ही शिकता का? तर ते म्हणतात, इथं आम्ही असतो हा शिकण्याबिकण्याचा इल्जाम उगीच आमच्यावर नको. या सिनेमातल्या कॅम्पसमध्ये शिकणंबिकणं नव्हतंच, पण गोष्ट मात्र कॅम्पसमधल्या जानी दोस्तांची. एकदम आपली वाटलेली. त्यातला डीजे आणि त्याचे दोस्त, एकदम खास, अशी दोस्ती कॉलेजात आपल्याला लाभावी, असं कुणाला नाही वाटणार?
थ्री इडियटस
अलीकडच्या काळात कॅम्पसवरचा सगळ्यात खास सिनेमा म्हणजे ‘थ्री इडियट्स’, एवढा भारी कॅम्पस आणि त्यातली दोस्ती, त्यातला बावळट पकाव रट्टामारूपणा, करिअरसाठीची रेस, त्यातला फोलपणा हे सारं ‘खरं’ वाटावं इतकं भन्नाट या सिनेमानं साकारलं. कॅम्पसवर बेतलेला अस्सल अनुभव वाटावा इतका हा सिनेमा सगळ्यांना खरा वाटला. ‘काबील बनो, कामयाबी झक मारके पिछे आएगी’ म्हणणारं हे कॅम्पस, म्हणूनच पुन्हा पुन्हा पहावंसं वाटतं.
स्टुडण्ट ऑफ द इयर
हे कॅम्पस पुन्हा एकदा करण जोहरचं. तसंच चकचकीत, एकदम ग्लॅमरस, प्रश्नही तसेच ग्लॅमरस आणि आयुष्यही. पण हे कॅम्पस आणि त्यातली गोष्ट आपण मनापासून एन्जॉय करतो. हरखून पाहतो आणि जगतो ‘स्टुडण्ट ऑफ द इयर’ची दोस्ती. हे खास कॅम्पस कुणीही चुकवू नये असंच आहे हे नक्की.
टू स्टेटस
नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘टु स्टेट्स’मध्येही कॅम्पस दिसतं. आयआयएम च्या कॅम्पसमध्ये स्कॉलर मुलांच्या जगात घडणारी ही गोष्ट. सगळेच हुशार, स्टडियस, तरीही एकदम ट्रेण्डी, फॅशनेबल. आपल्या अवतीभोवती असं कॅम्पस असावंच असं वाटणारं, एकदम हटके.