शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

भर पावसात बाइकवर बुंगाट

By admin | Updated: June 16, 2016 12:28 IST

पावसात बाइकवर बुंगाट फिरायचं प्लॅनिंग तुम्ही करत असाल, पण तुमची बाइक त्यासाठी तयार आहे का?

 - जयेश भंडारी (द हायकर क्लब)

 

 

हे सारं कितीही रोमॅण्टिक वाटत असलं, तरी पावसाळ्यात आपल्या गाडीची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे. पावसाळ्याअगोदर जसे आपण आपले ठेवणीतले छत्र्या, रेनकोट वगैरे व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घेतो व त्यांची दुरुस्ती करतो, तसंच गाडीचीही काळजी घेणं गरजेचं आहे.कारण पाऊस कितीही रोमॅण्टिक वाटत असला तरी पावसात बाइक चालवणं हे तसं धोक्याचं असतंच. पावसाच्या माऱ्यात समोरचं कमी दिसतं, रस्त्यात खड्डे, त्यात साचलेलं पाणी, गाडी स्लिप होण्याची शक्यता या साऱ्यानं वाढतेच.त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वी (खरंतर गाडी वापरताना नेहमीच) तिची नियमित सर्व्हिसिंग करून घेणं गरजेचं आहे. बहुतकेदा गाडीची काळजी घेताना गाडीच्या चाकांकडे आपलं दुर्लक्ष होतं. वापर होऊन होऊन झिजल्यामुळे टायर्स गुळगुळीत होतात. असे टायर्स पावसाळ्यात ओल्या रस्त्यावर घसरून अ‍ॅक्सिडेंट व्हायची शक्यता असते. त्यामुळे टायर्स जास्त झिजले असल्यास पावसाळा सुरू होण्यापूर्वी बदलून घेणे आवश्यक ठरते.दुसरी एक सहसा दुर्लक्षित होणारी गोष्ट म्हणजे स्पार्क-प्लग कॅप. बरेचदा ही कॅप सैल असल्यामुळे पावसाचे पाणी जाऊन प्लग शॉट होण्याच्या घटना घडतात. म्हणून पावसाळ्यापूर्वी ही कॅप चेक करून घ्यावी.अशाच प्रकारे इतरही काळजी घेत आणि पावसाळ्याच्या स्वागताला आपली गाडी सज्ज ठेवू शकतो.१) इंजिन आॅइल लेव्हलतुमच्या गाडीला चेनगार्ड असलं तरीही पावसाळ्यात, गाळ-चिखलात चेन लवकर खराब होतेच. त्यातून तुमच्या अ‍ॅव्हरेजवरही परिणाम होऊ शकतो. त्यामुळे चांगलं चेन क्लीनर आणाच. पण त्याआधी इंजिन आॅइल लेव्हल तपासून घ्या. चांगल्या कंपनीचं आॅइल वापरा. त्यामुळे गाडीची तब्येत धडधाकट राहील.२) ओपन वायरिंगगाडीच्या काही वायरी लोंबत असतील, बाहेर असतील तर त्याभोवती इलेक्ट्रिक टेप गुंडाळा. पावसाळ्यात या वायरींना पाणी लागतंच. त्यातून शॉर्टसर्किट होऊ शकतं. त्यामुळे या उघड्यावाघड्या वायरींचं काम आधी करा.३) व्हील अलाइनमेण्टज्यांच्या जिवावर तुम्ही बुंगाट निघता ते हे टायर्स. त्यांच्याकडे विशेष लक्ष द्यायला हवं. २५ ते ३० हजार किलोमीटर गाडी फिरली असेल किंवा गाडी घेऊन पाच वर्षे होत आली असतील तर तुम्ही नवीन टायर्स घ्या. जर घासून घासून टायर गुळगुळीत झालेले असतील तर ग्रीप कमी होते, गाडी स्लिप होऊ शकते. त्यामुळे हे व्हील अलाइनमेण्टही एकदा करून घ्या. ४) ब्रेकगाडीचे ब्रेक तर उत्तम हवेतच. ब्रेक पॅड, लायनर्स तपासून आवश्यक असल्यास बदलून घ्या. काही होत नाही म्हणत ब्रेक नसलेली गाडी अजिबात चालवू नका.५) बॅटरी चार्जिंगबॅटरी चार्ज आहे की नाही हे पाहणं महत्त्वाचं. अनेकांच्या गाड्या पावसाळ्यात त्रास देतात. स्टार्ट होत नाही. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी बॅटरी चार्जिंग करून घेणं महत्त्वाचं.१) गाडीचे आरसे चांगले आहेत की नाही ते तपासा. तेच हेल्मेटचंही. त्याच्या काचेतून चांगलं दिसेल ना पावसात हे एकदा तपासून घ्या.२) मडगार्ड, एअर फिल्टर, प्लग इथं चिखल बसला असेल तर तो रोजच्या रोज काढा.