शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

सिनेमांचं कलेक्शन फुल, पण पहायची बत्ती गुल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:20 IST

हार्ड डिस्क भरून ठेवण्याऐवजी कला समजून घेण्यातला आनंद

ठळक मुद्दे आपल्या तुडुंब भरलेल्या हार्ड डिस्क, गचागच भरलेले पेन ड्राइव्ह यांना जरा मोकळा श्वास घेता येईल.

प्राची  पाठक

‘काय सॉल्लिड कलेक्शन आहे तुझ्याकडे मुव्हीजचे!’..   ‘अरे तो पिक्चर मिळाला का तुला? मी कधीचा शोधतोय’..  ‘फार भारी डॉक्युमेंटरी आहे ती’.. ‘त्या फिल्म फेस्टिव्हलमधल्या सगळ्या फिल्म्स मी कॉपी करून आणल्या’..  ‘अरे, त्या साइटवर जाऊन डाउनलोड मार कि पिक्चर’.. - ओळखलीत ना ही वाक्यं? नेटिफ्लक्स, अमेझॉन प्राइम, जिओ सिनेमा, आणखी कोणकोणत्या फोन कंपनीचे अ‍ॅप्स, कुठल्या कुठल्या सिनेमांच्या लिंक देणारे पोर्टल्स, वेबसाइट्स आणि तिथून मारलेलं डाउनलोड, खास सिनेमासाठी असलेले वेगवेगळे ऑनलाइन ऑप्शन्स.. सगळी अप टू डेट माहिती आपण जमा करून ठेवतो. एखादा सिनेमा नव्याने आला रे आला की तो आपल्याला लगेच हवा असतो. कधी एखाद्या वेबसाइटवरून आपण ते सिनेमे डाउनलोड करतो. सगळं जमा करून ठेवायची काय हौस आणि किती तो उरक कामाचा ! फोनचं मेमरी कार्ड फुल होऊन गेलेलं असतं. पेन ड्राइव्ह गचागच भरलेले असतात. तुम्ही फक्त नाव सांगा, तो सिनेमा आपल्या पेन ड्राइव्हमध्ये, नाहीतर हार्ड डिस्कमध्ये येऊन पडलेला असतोच असतो ! पण ते सिनेमे पाहता का तुम्ही कधी?

काय करता येईल?सुरु वातीला आपल्याकडे किती प्रचंड डेटा सिनेमा म्हणून, डॉक्युमेंटरीज म्हणून, शॉर्ट फिल्म म्हणून येऊन पडलेला आहे तो आधी तपासा.  हा सर्व डेटा वन्स फॉर ऑल एकत्न जमा करा. आपल्या कामाचं, कॉलेजचं वेळापत्नक कसं आहे, ते नीट लक्षात घ्या. त्यानुसार फावल्या वेळाचे नियोजन करा. आपल्या अभ्यासाशी संबंधित, जॉबशी संबंधित सिनेमे, डॉक्युमेंट्री, शॉर्ट फिल्म्स एका फोल्डरमध्ये एकत्न करा. एकेक करून ते पाहून टाकायचा निश्चय करा. कोणते सिनेमे आपण एकटय़ाने पाहणार आहोत, कोणते घरी एकत्न पाहणार आहोत, ते ठरवा. मित्नांसोबत पाहायचे सिनेमे वेगळे काढा आणि त्यांना कधी बोलवायचं ते पक्कं करा. एकेक करून वॉच लिस्ट पूर्ण करतता येईल. 

त्याने काय होईल?1- आपल्या तुडुंब भरलेल्या हार्ड डिस्क, गचागच भरलेले पेन ड्राइव्ह यांना जरा मोकळा श्वास घेता येईल. 2- उगाचच खूप सारे डिजिटल डिव्हाइस विकत घेत सुटायच्या सवयीला आळा बसेल. रिकामे पेन ड्राइव्ह वरचेवर हाताशी असतील. 3- एकेका सिनेमावर, आवडत्या डॉक्युमेंटरीवर चर्चा करायची संधी मिळेल. 4-त्यातली कला समजून घेता येईल आणि एक सुंदर दृश्य अनुभूती ठरावीक काळाने मिळवत राहायचा आनंद घेता येईल.