शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

इंग्रजी येत नाही म्हणून आपण मागे पडलोय, असं वाटतं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 07:15 IST

भाषेला कमी-जास्त लेखण्यापेक्षा ती शिकण्यातली गंमत

ठळक मुद्देआपण काहीतरी कमी आहोत, या आपल्याच मनातल्या शंकांमधून आपण आत्मविश्वासाने बाहेर पडू

प्राची  पाठक

मराठी माध्यमात शिकलेल्या अनेक मुलांच्या मनामध्ये इंग्रजी भाषेविषयी एक भीती बसलेली असते. आपल्याला ही भाषा समजेल की नाही, आपण इंग्रजीत उत्तम संभाषण करू शकू की नाही, याबद्दल सतत मनामध्ये शंका असते. आजूबाजूला अनेक लोक फाडफाड इंग्रजी बोलताहेत आणि आपणच मागे राहून गेलोय, अशी भावना आपल्या डोक्यामध्ये काहूर माजवते. त्यातून आपला आत्मविश्वास कमी होऊ लागतो. कुठे बोलायची वेळ आली तर आपण मागेमागेच राहतो. बोलायचे प्रसंग टाळायला बघतो. दुसरं कोणी आपल्या वतीने ते बोलून टाकेल, अशी वाट बघतो. कॉलेजमध्ये, नवीन नोकरीमध्ये, एखाद्या कस्टमर केअरला फोन केल्यावर लोक चटकन इंग्रजीमध्ये बोलायला लागतात. ती जगाची भाषा आहे हेही आपल्याला मान्य असतं. इंग्रजी छान यावी म्हणून आपण खूप धडपड करत असतो. इंग्रजी बोलायची वेळ आली की मात्न आपलं त-त-फ-फ होतं. इंग्रजीत बोलण्याचा आपल्याला इतका सराव नसतो. आपण काही बोललो आणि त्याचे वेगळे अर्थ निघाले तर काय, असा प्रश्न सतत मनात येत असतो. केवळ इंग्रजी येत नाही म्हणून आपण काही संधी सोडून देतो. जे इंग्रजी माध्यमात शिकले आहेत, त्यांनासुद्धा इंग्रजी बोलताना जरा चाचपडावं लागतं, हे आपण समजून घेत नाही. आपण सोडून सगळं जग अस्खलीत इंग्रजी बोलतं, असं आपल्याला वाटत राहतं.  काय करता येईल?  पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही, हे आपण स्वतर्‍ला पक्क बजावायला हवं. आपल्या कामासाठी, आपल्या प्रेझेंटेशनसाठी, आपल्या शिक्षणासाठी ती एक महत्त्वाची भाषा आहे आणि ती चांगल्याप्रकारे आपल्याला आली पाहिजे, यासाठी प्रयत्न करायची तयारी ठेवायची. आजकाल स्मार्टफोनचीसुद्धा एक वेगळीच इंग्रजी भाषा तयार झालेली आहे. अनेक शॉर्टफॉर्म त्यात सहज वापरले जातात. हे शॉर्टफॉर्म ऑफिशियल भाषेमध्ये चालत नाहीत. त्यामुळे, जितकं फाडफाड इंग्रजी बोलता येणं महत्त्वाचं असतं, तितकंच चांगल्याप्रकारे इंग्रजी लेखन करता येणंही महत्त्वाचं असतं. कोणत्या शब्दाचा अर्थ काय आहे, स्पेलिंग काय आहे, याची माहिती आपल्याला असायला लागते. ती चटकन शोधता येण्याचे पर्याय आपल्यापाशी आहेत. सगळे शब्द काही रेडिमेड आपल्याला माहीत असायची गरज नसते. जसजसे संभाषण वाढत जाईल, आपला अभ्यास वाढत जाईल, तसतसे आपल्याला नवनवीन शब्द कळत जातात. आपला शब्दसंग्रह वाढत जातो. त्या शब्दांचे स्पेलिंग माहीत नसले तरीही व्हॉइस टायपिंगमुळे आपण हवा तो शब्द केवळ त्या पद्धतीने उच्चारून त्याचं योग्य स्पेलिंग शोधू शकतो. मोबाइलमध्ये अनेक अ‍ॅप्स आता आपल्या हाताशी आहेत, जे भाषा शिक्षणासाठी खूप कामास येतात. मुळात आपल्याला आपल्या मातृभाषेची किती गोडी आहे, तिच्यात चांगलं संभाषण करण्यासाठी, चांगलं लिहिता येण्यासाठी आपण काय प्रयत्न करतो, त्याचाही या निमित्ताने विचार करता येईल. भाषिक बुद्धिमत्ता हा एक मनाचा वेगळा पैलू असतो आणि आपल्याला एकूणच वेगवेगळ्या भाषांची किती गोडी आहे याचाही विचार त्यानिमित्ताने करून बघता येईल. कोणत्याही भाषा शिक्षणात चार टप्पे महत्त्वाचे असतात. ऐकणं, बोलणं, वाचणं आणि लिहिणं. ऐकणं आणि वाचणं हे भाषेचं इनपुट असतं, तर ती बोलणं आणि लिहिणं हे आउटपुट! इंग्रजी वाचन वाढवणं, सतत आपल्या कानावर चांगलं इंग्लिश पडत राहील असे व्हिडीओज बघणं प्लॅन करता येईल. आपली मातृभाषा काहीतरी कमी आहे आणि इंग्रजी भारी आहे, या विचारातून बाहेर पडून इंग्रजीचा अभ्यास केला पाहिजे. वाचन-मनन-चिंतन यातून भाषा शिक्षण चांगलं होतं. जोर्पयत आपण इंग्रजी भाषा आपल्या दैनंदिन व्यवहारांमध्ये सहजगत्या वापरत नाही, तोर्पयत आपल्याला तिची नजाकत कळत नाही. इंग्रजी विषयाच्या न्यूनगंडातून आणखीन एक गंमत होते. ती म्हणजे, ज्यांना थोडंफार इंग्रजी बोलता यायला लागतं, ते उगाचच अति स्टायलीश पद्धतीने ही भाषा बोलायला लागतात. इंग्रजी भाषेच्या लहेजाचं, अ‍ॅक्सेंटचं उगाचच अवसान घ्यायची गरज नसते. इंग्रजी बोलायचा सतत सराव केला की आपण मनातही इंग्रजीतच विचार करू शकतो. मनातल्या मनात भाषांतर करून मग बोलायची गरज उरत नाही. उगाचच आव आणून इंग्रजीची स्टाइल मारण्यापेक्षा आपण सहजगत्या ती भाषा बोलायला शिकू शकतो. भाषेच्या व्याकरणावर नीट भर देऊन योग्य पद्धतीने इंग्रजी लिहायला शिकता येईल.  

त्याने काय होईल?  1- इंग्रजी ही आपली मातृभाषा नाही. त्यामुळे, ती अस्खलित- फाडफाड बोलता येत नाही, याचा न्यूनगंड बाळगायची गरज नाही हे आपल्याला कळेल. 2- ‘सगळे बोलतात म्हणून’ आपल्याला इंग्रजी उत्तम आलं पाहिजे, यापेक्षा भाषाशिक्षणाचा एक आनंद म्हणून आपण त्याकडे बघू शकू. 3- इंग्रजी भाषेविषयी असलेली मनातली भीती हळूहळू निघून जाईल. 4- आपल्या मनातसुद्धा आपण इंग्रजी भाषेत विचार करून व्यक्त होऊ शकतो.5- आपण काहीतरी कमी आहोत, या आपल्याच मनातल्या शंकांमधून आपण आत्मविश्वासाने बाहेर पडू. 6- आपल्या मातृभाषेकडेही आपण नवीन नजरेने बघायला शिकू. तिच्यातही चांगल्या दर्जाचं बोलायला, लिहायला शिकू.