शहरं
Join us  
Trending Stories
1
Maratha Morcha Mumbai: मनोज जरांगेंना दिलासा, पण एका दिवसाचाच! पोलिसांचा निर्णय काय?
2
'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं
3
Manoj Jarange Patil Morcha Update Live: मराठ्यांना आरक्षण देऊन टाकावं, मनं जिंकण्याची हीच संधी : मनोज जरांगे-पाटील
4
चांद्रयान-5, तंत्रज्ञान , हायस्पीड रेल्वे अन् 10 ट्रिलियनची गुंतवणूक...भारत-जपानमध्ये १३ करार
5
"नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका
6
सरिता हिची आत्महत्या नव्हेतर हत्याच... पती पुरुषोत्तम खानचंदानी यांचा आरोप
7
"१९९१ मध्ये फसवणूक करूनच..."; सिद्धरामय्यांच्या एका विधानानं काँग्रेच्या 'मतचोरी' प्रकरणाची 'लंका' लावली; भाजपला मिळाला आयता मुद्दा!
8
राहुल गांधींना बदनाम करण्यासाठी भाजप कोणत्याही थराला जाईल; संजय राऊतांची टीका
9
मनोज जरांगे-पाटील यांना तात्काळ अटक करा; गुणरत्न सदावर्तेंची पोलीस महासंचालकांकडे मागणी
10
एअरपोर्टवर तरूणीच्या सामानाचं झालं 'चेकिंग'; पोलिसांनी बॅग उघडताच बसला धक्का.. आत काय निघालं?
11
बापरे! कच्च्या कांद्यामुळे आरोग्याचं मोठं नुकसान; समजल्यावर खाण्यापूर्वी कराल १०० वेळा विचार
12
पीएम मोदींना शिवीगाळ! अमित शाह म्हणाले- 'तुम्ही जितक्या शिव्या द्याल, तितके कमळ फुलेल...'
13
'सनी संस्कारी की तुलसी कुमारी'चा टीझर प्रदर्शित, वरुण धवन दिसला बाहुबली अवतारात
14
मुलीने बॉयफ्रेंडशी लग्नाचा तगादा लावला, बापाने लेकीचा आवाज बंद केला; मृतदेह लटकवून वेगळाच बनाव रचला 
15
ट्रम्प टॅरिफच्या संकटातही भारताची आर्थिक गाडी सुस्साट! GDP च्या वाढीत चीनलाही टाकलं मागे
16
पंक्चरचं दुकान अन् व्यवसायानं ड्रायव्हर; पंतप्रधान मोदींना शिवीगाळ करणारा तो' कोण?
17
नारळ पाणी प्यायल्याने खरंच कमी होतं का वजन? डॉक्टरांनीच सांगितलं 'हे' सत्य
18
सुवर्णसंधी! एनएचपीसीमध्ये विविध पदांसाठी भरती; २ सप्टेंबरपासून अर्ज प्रक्रियेला सुरुवात
19
पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५ वर्षांत मिळवा ५ लाख रुपये व्याज! मुलांच्या नावावरही करू शकता गुंतवणूक
20
Video: दोन सिंहांमध्ये जुंपली... तुफान भांडण, एकमेकांवर हल्ले... पाहा कोण कुणावर भारी?

मेंदूतील आठवणी कॉम्प्युटरमध्ये डाउनलोड करता येऊ शकतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 07:00 IST

मेंदू आणि एआयची जादू म्हणजे संगणकातील ज्ञान/आठवणी या मानवी मेंदूतसुद्धा अपलोड करता येऊ शकतील.

ठळक मुद्दे रोबोटतर्फे गणपतीची पूजा होते आहे. नागपूरच्या कमिन्स कॉलेजमध्ये तर इंजिनिअरिंगच्या मुलींनी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञान वापरून एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केलं.

-डॉ. भूषण केळकर

नीटची परीक्षा एकदाच होईल; परंतु जेईई ही परीक्षा वर्षातून दोनदा होईल अशी घोषणा झाली आहे, हे आपण जाणतोच. त्यात मुलांवरचा ताण कमी करण्याचा हेतू आहे व तो स्तुत्यपण आहे. त्याचबरोबर प्रत्येक परीक्षार्थीला वेगळा प्रश्नसंच पण समान काठिण्य पातळीवर असेल अशा अभिनंदनीय बदलांचीही घोषणा झाली आहे; पण नॅशनल टेस्टिंग एजन्सीला (एनटीए) सावध राहावे लागेल. जेईईसारख्या विलक्षण स्पर्धात्मक परीक्षांमध्ये विद्याथ्र्याकडून तंत्रज्ञानाचा गैरवापरपण होऊ शकेल हेसुद्धा लक्षात ठेवायला हवं. आता हेच बघा ना - ‘इंटरनेट कॉँटॅक्ट लेन्सेस’च्या साहाय्यानं तुम्ही केवळ डोळ्यांची पापणी लवलीत की इंटरनेटला जोडले जाल असं तंत्रज्ञान विकसित झालंय! अशा गोष्टी फार महाग असतील असंही नाही, कारण कॉम्प्युटरमधली चिप. ही ‘चीप’पण होत चालली आहे. एका चिपची किंमत ही सहजपणे एक रुपयाच्या आतलीच आहे! त्यामुळे अशा काही चिप्सचा समुच्चय असणारी ‘इंटरनेट काँटॅक्ट लेन्स’ ही सर्वसामान्यांच्या आवाक्यात असू शकेल हे उघड आहे. परीक्षेत कॉपी (दुसर्‍याचं पाहून) करण्याऐवजी इंटरनेटवरून केलं तर?हे तर काहीच नाही. इंडस्ट्री 4.0 च्या तंत्रज्ञानाच्या कक्षा एवढय़ा वेगाने रूंदावत आहेत की ‘मिचिओ काकू’  हा शास्त्रज्ञ व भविष्यवेत्ता असं सांगतोय की आत्ताच आपल्याला आठवणी संगणकात अपलोड  करता येत आहेत. म्हणजे आपल्या मेंदूतील आठवणी या डाउनलोड करून संगणकात अपलोड करता येत आहेत! त्याही पुढची पायरी म्हणजे संगणकातील ज्ञान/आठवणी या मानवी मेंदूतसुद्धा अपलोड करता येत आहेत. याचाच अर्थ माझ्याप्रमाणे तुम्हीही काढला असेल की दोन मानवी मेंदूंमध्ये माहिती/आठवणी/भावना यांचे आदान-प्रदान हे तंत्रज्ञानाच्या साहाय्याने होऊ शकेल!! या विषयातील अद्ययावत माहितीसाठी अनेकांमधली एक वेबसाइट मी तुम्हाला सुचवतो. 666.ु1ं्रल्लल्ली3.ल्ली3 हे ब्रेननेट म्हणजे ज्याला न्यूरोसायन्स/कॉग्निटिव्ह सायकॉलॉजी म्हणतात. त्यात रस असणार्‍या व कार्यरत असणार्‍या जगभरातील शास्त्रज्ञांचा गट आहे.‘शब्देविण संवादू’ची इंडस्ट्री 4.0 ची आवृत्ती! टोटल रिकॉल हा सिनेमा तुम्हाला आठवेल आणि हा सिनेमा आता कल्पनाविश्वातून वास्तवात येण्याची वाटचाल सुरू झाली आहे हे पटेल.इंडस्ट्री 4.0 चं तंत्रज्ञान आपल्या सर्वाचं जग व्यापत चाललं आहे. हेच बघा ना, परवाचीच बातमी होती की ल्युकेमिया या कर्करोगाचे निदान हे एआयचा वापर करून कुठल्याही डॉक्टरापेक्षा अचूकपणे करण्यात आलं आहे. कालची बातमी आहे की जपानने एआय रोबोट्स तयार केलेत की ज्यांच्या साहाय्याने जपानी विद्यार्थी हे इंग्रजी भाषा शिकतील. 250 मिलियन येन (जवळपास 1.5 कोटी रुपये) असा खर्च असणारा हा प्रकल्प पथदर्शी म्हणून 500 शाळांत राबवला जाईल. मुलांना वाचनाची गोडी लागावी म्हणून ‘मिनी’  नावाची रोबोट- ‘रीडिंग बडी’ विस्कॉन्सिनमध्ये अमेरिकेत बनवली आहे. आणि मुलं ते एन्जॉय करत आहेत.हे सगळे प्रकार फक्त जपान आणि अमेरिकेत होऊ शकतात, आपल्याकडे नाही असं समजू नका! मागील महिन्यातील माहिती आहे की ‘बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर’ ‘‘आस्क मोटाभाई’’ नावाचा चॅटबॉट आलाय. स्टॉक मार्केटमधली माहिती हा चॅटबॉट देतोय! रोबोटतर्फे गणपतीची पूजा होते आहे. नागपूरच्या कमिन्स कॉलेजमध्ये तर इंजिनिअरिंगच्या मुलींनी इंटरनेट ऑफ थिंग्ज तंत्रज्ञान वापरून एका कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन केलं. अहो हेच काय, पाथर्डी फाटा येथील धनलक्ष्मी शाळेत आठवीच्या मुलांनी तयार केलेल्या रोबोटतर्फे स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण केले गेलं.आता बोला!!