शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

छत्तीसगडच्या सीमेवर मजुरांना मदतीचा हात देण्याच्या प्रयत्नाची एक गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 18:21 IST

मजूर पायीच निघाले होते. त्यांचे कष्ट कमी करणं ही आपली जबाबदारी आहे असं वाटलं. परवानग्या काढल्या, बसची सोय केली.

ठळक मुद्देमात्र त्यांचे हाल अजूनही संपलेले नाही हेही तितकंच खरं.

- डॉ. प्रियदर्श

आम्हाला बाघनदी बॉर्डरबद्दल कळाले. तिथं जायचं ठरवलं. या खेपेला राजनांदगावच्या कलेक्टर ऑफिसमध्ये रीतसर परवानगी घेऊन आम्ही काम करायचं ठरवलं. यूएनडीपीच्या नमिता मॅडमपण होत्या सोबत. तेथील पोलीस अधिकारी कार्तिकेश्वर भडांगे सरांना भेटलो. त्यांनी खूप मदत केली. सिनिअर इन्स्पेक्टर सुधीरजीसुद्धा मदत करत होते. त्यांच्यासाठीपण मास्क, फेस शील्ड आणि सॅनिटायझर्स घेऊन गेलो होतो. ते त्यांच्या सुपूर्द करून कलेक्टर ला भेटण्यास  राजनांदगावला आलो. परंतु सर्व अधिकारी मीटिंगमध्ये असल्यामुळे कुणीच भेटलं नाही दिवसभर. हताश होऊन निघालो.  कुठेच जेवण उपलब्ध नव्हतं. एका ढाब्यावाल्याने आम्हाला जेवण पार्सल दिलं. युमेत्तामधील आमचा सहकारी आकाश पत्की हा छत्तीसगढमध्ये काही वर्ष आधी प्राइम मिनिस्टर रुरल डेव्हलपमेण्ट फेलो म्हणून काम करत होता.त्याला फोन केला. त्याने राजनांदगावचे आयुक्त कौशिक यांच्याशी बोलणं करूदिलं. त्यांनी ऑफिसमध्ये भेटायलाही बोलावलं.त्यांना आम्ही बाघनदीचा पूर्ण रिपोर्ट सांगितलं की, रोज तिथे 5 ते 7 हजार लोक येत आहेत. पण सध्या फक्त आम्हीच बसेस तेथून राजनांदगावपर्यंत चालवत आहोत. बाकी प्रवासी ट्रक किंवा अन्य मार्गाने येत आहेत. परवानगी मागितली की यापुढे आम्ही बाघनदी बॉर्डर वरून सरळ रायपूर, बिलासपूर, ओरिसा किंवा झारखंड बॉर्डरपर्यंत प्रवाशांना सोडून देऊ. कारण राजनांदगाववरून प्रवाश्यांना परत रायपूर, मग बिलासपूर किंवा ओरिसा, रायगढ, जशपूर, झारखंड मग बंगाल, बिहार असे ब:याच ठिकाणी थांबून थांबून प्रवास करावे लागत होते. कधी गाडी मिळत होती, कधी पायीच. कधी त्यांना 2-3  दिवस लागत होते झारखंड बॉर्डरला पोहोचायला. आम्ही ठरवलं की छत्तीसगढ बॉर्डरपासून सरळ आता झारखंड किंवा ओरिसा बॉर्डर्पयत लोकांना पोहोचवू. निदान त्यांचा 8-12 तासांचा प्रवास तरी सुखकर होईल. आयुक्त कौशिक यांनी निवेदन लिहून घेतले.  जिल्हाधिका:यांना त्या निवेदनाचे फोटो घेऊन व्हॉट्सअॅप केले. त्यांनी संमतीही दिली. त्यांनी ते निवेदन एसडीएमला पाठवलं. त्यांनीही संमती दिली. एसडीएम मुकेश रावते यांनीही लागलीचीच सही-शिक्क्याची मोहोर दिली. आता आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून प्रवास करत बॉर्डर्पयत प्रवाशांना सोडून देऊ शकणार होतो.पोलीस इन्स्पेक्टर कार्तिकेश्वर यांच्या मदतीने आम्हास जस्सी म्हणून एक ट्रॅव्हल कंपनीचे मालक मदतीला पुढे आले. ते म्हणाले की, बसचे भाडे देऊ नका. फक्त डिङोल आणि  ड्रायव्हरच्या खाण्यापुरते काही पैसे द्या. काम आणखी सोपे झाले. तेव्हढय़ाच पैशात आम्ही अनेक फे:या मारू शकणार होतो आणि जास्तीत जास्त प्रवाशांना मदत करू शकणार होतो. रोज मानपूर किंवा बाघनदीवर गर्दी झाली की तहसीलदार किंवा पोलिसांचा फोन यायचा. आम्ही लगेच गाडी पाठवून द्यायचो. एका दिवसाला 8  ते 10 बस धावू लागल्या.निर्माण, सेवांकुर, गांधी विचार परिषद यासा:यांशी संपर्काचा फायदा झाला. महाराष्ट्रातून स्वयंसेवकांची टीम या मजुरांना अनेक ठिकाणी मदत करत होती. मग आम्ही एक लिंक बनविली. महाराष्ट्रातून जेव्हाही आमचे मित्न गाडी पाठवायचे तेव्हा आम्हाला कळवायचे की अमुक अमुक गाडी इतके लोक या ठिकाणचे घेऊन निघाली आहे आणि गाडीतील 2-3 लोकांचे नंबर असायचे. ती गाडी छत्तीसगढला पोहोचली की लगेच आम्ही त्यांना बॉर्डरवरून सरळ जिथे जायचे आहे तिथे सोडत होतो. जेणोकरून त्यांना परत कुठेच वाट पाहत राहायची गरज नव्हती. 

औरंगाबाद येथील पीयूष, नताशाचा ग्रुप, पुणो येथील सायली/चिन्मयचा ग्रुप, वर्धा येथील युवराजचा ग्रुप, अहमदनगर येथील स्नेहालयचा ग्रुप जेव्हाही मजूर पाठवायचे तेव्हा आधी कल्पना द्यायचे. त्याच्याकडून आलेल्या प्रत्येकाची छत्तीसगढमधील प्रवासाची जबाबदारी आम्ही घेतली होती. सोबतच ओरिसा आणि झारखंडचे अधिकारी आणि स्वयंसेवी संस्था यांच्याशी समन्वय साधला. सचिन बारब्दे आणि मशकरा यांनी या कामात मदत केली. असं काम सुरू झालं. एकमेकांच्या सहकार्याने एक साखळी बनत गेली.या कामात अनेक लोकांनी मदत केली. अनेक लोकांच्या छोटय़ा-मोठय़ा देणग्या, यातून हे काम उभे राहिले आहे.  मेडिको फ्रेण्ड सर्कल, स्वान ग्रुप, सोचारा, अझीम प्रेमजी फाउण्डेशन, यूएसएड, एड इंडिया, अनघा आमटे  आणि त्यांचा हेमलकसा ग्रुप यांनी मदतीचा हात दिला.आतार्पयत एकूण 83 बसच्या माध्यमातून 3787 प्रवाशांना वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचविण्यासाठी मदत केली गेली आहे. युमेत्ताची पूर्ण टीम यात मदत करत आहे. श्रीनिधी, नीधींन, सावित्नी, सिंधू, आकाश, उमेश, इत्यादी अनेक लोक वेगवेगळ्या मार्गाने मदत करत आहेत. गुरु, राजीव, वासू, अद्वैत, नीलेश, मनीष, रोकडे सर, अनघा ताई, इत्यादी अनेक नवे मित्न आम्हास मिळाले आहेत.  सर्वात महत्त्वाचे आहे देणगीदार. अनेक लोक मदत करण्यासाठी पुढे येत आहेत. अनेक देणगीदारांना आम्ही ओळखतसुद्धा नाही. पण ते पूर्ण विश्वासाने या कामासाठी मदत करत आहेत. स्वतंत्र भारतात मजुरांना असं स्थलांतर करावं लागलं.त्यांच्या वाटय़ाला ज्या हाल अपेष्टा आल्या, त्यांची कल्पनाही करवत नाही.आपण छोटी मदत करत त्यांच्यासोबत काही पाउलं चाललो. याचं समाधान आहे.मात्र त्यांचे हाल अजूनही संपलेले नाही हेही तितकंच खरं.

(डॉ. प्रियदर्श छत्तीसगडमध्ये शहीद हॉस्पिटल येथे कार्यरत असून, छत्तीसगडच्या सीमेवर मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यासाठी त्यांनी मदत कार्य उभारलं होतं.)