शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

बिन पायडलची हवा सायकल

By admin | Updated: February 15, 2017 18:05 IST

अकरावीत शिकणारी एक मुलगी तिला वाटलं टायरमध्ये हवा भरतात, तर मग त्याच हवेवर सायकल का चालणार नाही?

 - संदीप आडनाईक

अकरावीत शिकणारी एक मुलगी तिला वाटलं टायरमध्ये हवा भरतात, तर मग त्याच हवेवर सायकल का चालणार नाही?एक चौदा वर्षाची मुलगी. ओरिसामधील राउरकेलची. तिथल्या सरस्वती शिशु विद्यामंदिरात ती अकरावीत शिकते. तेजस्विनी प्रियदर्शिनी तिचं नाव. तर गेल्या आठवड्यात या मुलीच्या कर्तबगारीची बातमी वाचली. तिनं चक्क हवेवर चालणारी सायकल तयार केली आहे. दहा किलो हवेच्या सिलिंडरवर विना पायडल ही सायकल जवळजवळ ६० किलोमीटर तिनं चालवत नेली. पण एकदम या सायकलची आयडिया सुचली कशी याची एक कथा आहे. एकदा तेजस्विनी तिची नेहमीची सायकल दुरुस्तीला नेली. तिथं बसल्याबसल्या तिला ही कल्पना सुचली. की टायरमध्ये हवा भरतो तशी सायकलच हवेवर चालली तर? टायरमध्ये हवा भरण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एअरगनचीच संकल्पना तिनं तिच्या या सायकलसाठी वापरायची ठरवली. एअरगनद्वारे जर सायकलमध्ये हवा भरली जाते, तर तिचा वापर सायकलीमध्येही करता येईल अशी कल्पना डोक्यात घेऊन ती घरी आली. तिनं वडिलांना ही कल्पना सांगितली. सुदैवानं त्यांनी तिला वेडात काढलं नाही. तर तिला तिनं मागितलं ते साहित्य प्रयोगासाठी आणून दिलं. खूप परिश्रम घेत हा छोटासा प्रयोग तिनं सुरू केला. एक हवेची टाकी खरेदी केली आणि त्यात हवा भरून घेतली. या टाकीला तिने स्टार्टिंग नॉब आणि सेफ्टी व्हॉल्व्हही बसवला. सेफ्टी व्हॉल्व्हद्वारे अतिरिक्त हवा बाहेर सोडली जाते. नॉब फिरवताच एअरगनद्वारे हवा टाकीत भरली जाते. ही गन पायडलजवळच बसविली आहे. सहा वेगवेगळ्या गिअरद्वारे पायडल फिरते. तेजस्विनीचे वडील नटवर गोच्युयत यांनी या प्रयोगात तिला मदत केली. तेजस्विनीने वापरलेले तंत्रज्ञान हे मोटारसायकल आणि मोटारगाडी चालविण्यासाठी वापरले जाते. तेजस्विनीने या नव्या प्रयोगामुळे अनेक बक्षिसे जिंकली आहेत. ही सायकल प्रामुख्याने दिव्यांग आणि पर्यावरणाची काळजी वाहणाऱ्या लोकांकडून उपयोगात आणली जाऊ शकेल, अशी तिला आशा आहे. याशिवाय इंधन बचतीचा मोठा मार्ग म्हणूनही या सायकलचा वापर होऊ शकतो. आता विविध विज्ञान प्रदर्शनात तेजस्विनी आपली सायकल ठेवणार आहे.प्रयोग करून पाहणं, डोक्याला चालना देणं हे जास्त महत्त्वाचं आहे - असं ती सांगते. तेव्हा तिची जिद्द तिच्या डोळ्यात दिसत असते.हवेच्या दाबावर चालणाऱ्या वाहनांचा इतिहासहवेच्या दाबावर वाहन चालवणे तसे नवे नाही, याची सुरुवात दोन शतकं आधीच झाली आहे. युरोपमध्ये ट्रॅम आणि रेल्वेसुद्धा यावर चालवली गेली आहे. मात्र तरी सहज मिळणाऱ्या पेट्रोलपुढे अशी वाहने दुर्लक्षितच राहिली. कारण उच्च दाबाची हवा ही पेट्रोलपेक्षाही महागडी ठरत होती. आता मात्र पेट्रोलच्या वाढत्या भावामुळे अनेक मोटार कंपन्यांचा हवेवरील इंजिनातील रस वाढला आहे. फ्रान्सच्या एमडीआय कंपनीची एअर कारसध्या फ्रान्समधल्या एमडीआय या कंपनीच्या एअर कारच्या शोधामध्ये इंजिन अतिउच्च दाबाची हवा वापरते.रोटरी इंजिन याच वेळी आॅस्ट्रेलियातल्या मेलबर्नमध्ये असलेल्या एका एंजेलो दी पिएत्रो या संशोधकानेही हवेवर चालणारी वाहने बनवली आहेत. भारतीय टाटा वनकॅट गाडीसध्या फ्रान्समधल्या एमडीआय या कंपनीच्या एअर कारच्या शोधामध्ये भारतीय उद्योजक टाटा मोटर्सनी रस घेतला आहे आणि त्यांच्याशी करारही केला आहे.