शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

मनासारख्या साडीची सुंदर घडी

By admin | Updated: September 17, 2015 22:59 IST

कपाटात साठविलेल्या प्रत्येक साडीची एक आठवण, अटॅचमेंट असते. नव:याने दिलेली पहिली साडी, दिवाळीची साडी, सहज आवडली म्हणून घेतलेली साडी

 - अदिती मोघे

 
कपाटात साठविलेल्या प्रत्येक साडीची एक आठवण, अटॅचमेंट असते. नव:याने दिलेली पहिली साडी, दिवाळीची साडी, सहज आवडली म्हणून घेतलेली साडी, मैत्रिणींबरोबर शॉपिंग करताना  घेतलेली साडी अशा साडीच्या आठवणी मनाच्या कुपित असतात.  
आईसाठी साडी खरेदी करण्यासाठी बाजारात गेल्यानंतर एकदा जाणवलं की, दुकानदाराने अनेक साडय़ा दाखवल्या तरी साडी चटकन मनात भरत नाही. एका साडीचा पदरच आवडत  नाही किंवा काठतरी. ‘हे असं हवं होतं, ते तसं असतं तर छान दिसलं  असतं’ असं मनात सुरू होतं. मग वाटलं की, असं दुकानंच्या दुकानं पालथी घालूनही मनासारखी साडी न घेता हात हलवत येण्यापेक्षा आपणच आपली साडी डिझाइन केली तर काय हरकत आहे? या तिच्या विचारांना धुमारे फुटले ते कांदिवलीच्या चाळीत. 
एका टीव्ही शोसंदर्भात संशोधन करण्यासाठी  कांदिवली परिसरातील चाळी पालथ्या घालत होते. तेथे रमिलाबेन भेटल्या. ‘आम्हालाही काही काम द्या ना असेल तर..’ असं त्या म्हणाल्या.  प्रश्न पडला, काय बरं काम द्यावं यांना? यांना घराबाहेर पडून काम करायचं नाही. घरात बसून फार फार तर शिवणकाम, भरतकाम  करतील या. आणि ते त्यांना छान जमतंसुद्धा. म्हणूनच मग ‘फ्युजन साडी’ बनवायचं ठरलं.
‘फ्युजन साडी’ची संकल्पना रमिलाबेन यांच्याकडे मांडली. प्युअर सिल्क, रॉ सिल्क, टिश्यू, कॉटन, सुपरनेट, ब्रोकेड, खणाचं कापड, चंदेरी, ज्यूट अशा विविध कापडांना एकत्र आणून फ्युजन साडी बनवायचं ठरलं. वेगवेगळे पदर, वेगवेगळ्या बॉर्डर्स शिवून साडीला फ्युजन लूक मिळणार होता. त्यासाठी मदतनीस म्हणून रमिलाबेन यांनी परिसरातील गरजू पण शिवणकामात तरबेज बायका निवडल्या आणि अस्तित्वात आली ‘रावी’ची फ्युजन साडी. सुरुवातीला अडचणी आल्या. कारण चाळीतील बायकांना कामात फिनिशिंग आणणं जमत नव्हतं. त्यामुळे काही साडय़ा वाया गेल्या. त्याच्या अक्षरश: पिशव्या शिवल्या गेल्या. पण हळूहळू सारं जमलं आणि फ्युजन साडीचं युगच अवतरलं! 
 मुंबई, येवला, बनारस येथून निरनिराळे फॅब्रिक्स मागवून, त्यांचा वापर करून साडय़ा डिझाइन करण्यात येऊ लागल्या. चंदेरी  साडीला ज्यूटची  बॉर्डर, सुपरनेट साडीला ब्रोकेडचा पदर, कॉटन साडीला पैठणी बॉर्डर अशा अनेक नवनवीन फ्युजन साडय़ा ‘रावी’त तयार होतात. रोहित भोसले या कामात मदत करतो. यामुळे दोन  फायदे झाले. एक तर गरजू हातांना काम मिळालं आणि वेळेचीही बचत झाली. फ्युजन साडीचं  आणखी एक वैशिष्टय़ म्हणजे तुम्ही एकच एक साडी घालून कंटाळलात तर मग या साडीचा पदर तुम्ही बदलवू शकता, बॉर्डर बदलवू शकता. म्हणूनच ही साडी कधी जुनी होत नाही.
आपल्या मनासारखी साडी स्वत: तयार करता येणं, यात सुख असते हे खरंच!