शहरं
Join us  
Trending Stories
1
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
2
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
3
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
4
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
5
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला
6
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
7
फायद्याची गोष्ट! 'या' ३ गोष्टी फ्रिजमध्ये ठेवण्याची अजिबात करू नका चूक; कॅन्सरचा वाढेल धोका
8
सावधान! WhatsApp वर आला 'प्रोफाईल फोटो' स्‍कॅम; तुमच्या अकाऊंटमधून 'असे' जातील पैसे
9
शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्यांना त्याच भाषेत उत्तर, नारायण राणे यांचा इशारा
10
भारताशी पंगा घेणाऱ्या पाकिस्तानला मोठा झटका! 'या' मोठ्या एअरलाईन्स वापरणार नाहीत पाकचा एअरस्पेस
11
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
12
Video - रीलचा नाद लय बेक्कार! सिंगरने गाण्यासाठी लावली पँटला आग; अवघ्या काही सेकंदात...
13
'तुझ्या बायकोला माझ्याजवळ पाठव, कर्ज माफ करतो'; पतीचा संयम सुटला अन् त्याने सावकाराचा जीवच घेतला
14
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
15
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
16
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
17
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
18
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
19
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
20
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?

अजिंक्य रहाणे - फायटर माणसांचं कुल युद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 08:00 IST

शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत, असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

-अभिजित पानसे

शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत, असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे.

नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

तो मैदानात देहबोलीतून अतिउत्साह, आक्रमकता दाखवत नाही, त्यामुळे त्याच्याकडे स्टारडम नाही. त्याचे टॅण्ट्रम नाही. तो वादग्रस्त बोलत नाही. झंकीफंकी स्टाईल करून कॅमेरे आपल्याकडेच राहतील, असाही तो कधी वागला नाही. यशात त्याचा चेहरा बदलला नाही, अपयशातही नाही. त्याच्या वाट्याला अपमान आणि टीका तर किती आली याचा हिशेब त्यानंही कधी ठेवला नसेल. त्याला सुरुवातीला संघातून बाहेर ठेवलं गेलं, कारण काय पुढे करण्यात आलं तर तो सिंगल रन घेत स्ट्राइक बदलू शकत नाही. तत्कालीन कर्णधारांच्या विशेष आवडत्या खेळाडूंमध्ये तो नसल्याने इतरांप्रमाणे त्याला विशेष प्राधान्य मिळत नसे. तरीही त्याला संधी मिळेल तशी तो तिचं सोनं करत राहिला. कधी त्याला चांगलं खेळता आलं, कधी तो ही ढेपाळला. मात्र, पुढे तो भारतीय टीमचा उपकर्णधार झाला; पण तरीही त्याला टीम मॅनेजमेंटद्वारे त्याला वगळण्याची मालिका सुरूच राहिली. मात्र, क्रिकेटपेक्षा क्रिकेटरचे फॅन असलेल्या क्रिकेटरप्रेमींना स्टारडम नसलेल्या त्याचं हे आतबाहेर होणंही काही फार खुपलं नाही. तसा तो दर आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा काढणारा. मात्र, मागच्या वर्षी राजस्थान रॉयल्सचा कॅप्टन असलेल्या त्याच्याकडे दुबईमध्ये नुकत्याच झालेल्या आयपीएलमध्ये पूर्णपणे दुर्लक्ष केलं गेलं. दिल्लीने बराच काळ त्याला नुसता बसवून ठेवला. आणि उतरवला तेव्हा तो चालला नाही, असंही काहीजण म्हणत होतेच. मुद्दा काय त्याच्या क्षमतेबद्दल सतत प्रश्नचिन्हं उभी करण्यात आली आणि तो शांत, गप्प कायमच... तो अर्थातच अजिंक्य रहाणे.

प्रस्तुत ऑस्ट्रेलिया दौऱ्यात कसोटी मालिकेसाठी रहाणेला उपकर्णधार बनवण्यात आलं. पहिल्या कसोटी सामन्यानंतर विराट कोहली ‘पॅटरनल लिव्ह’मुळे भारतात परत येणार हे ठरलं होतं. त्यामुळे या ऐतिहासिक व अत्यंत खडतर मालिकेत अजिंक्य रहाणे नेतृत्व करणार, हे ठरलं होतं.

३६ धावांत आपली अब्रू वेशीला टांगून संघ परतला ही गोष्टही ठसठसत होतीच. पहिल्या कसोटीत सर्वाधिक धावा काढलेला विराट कोहली परत गेला होता, भारतीय बॉलिंग आक्रमणाचा कणा मोहम्मद शमी जायबंदी होऊन मालिकेतून बाद झाला. तिकडे इंग्लंडचा मायकेल व्हॉन ट्विटरवर सांगत होता की, मी आधीच सांगितलं होतं भारतीय टीम ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार-शून्यने मालिका हरणार. अशा अवस्थेत अजिंक्य रहाणेने संघाची धुरा सांभाळली. भारत टॉस हरला; पण चौथ्या दिवशी मेलबर्न कसोटी जिंकली.

अजिंक्य रहाणेने जे नेतृत्व केले ते हृदय जिंकणारे होते. संपूर्ण संघ मोकळ्या मनाने खेळताना, वावरताना दिसला. संघात दोन खेळाडू कसोटी कारकीर्दीची सुरुवात करणारे होते, त्यांना कॅप्टन राहणेने सांभाळून घेतलं. सतत डीआरएससाठी विचारणा करणाऱ्या उत्साही मोहम्मद सिराजला त्याने स्लिपमध्ये उभं राहून नीट हाताळलं. रवीचंद्रन अश्विन जो काही वर्षांपासून टीम मॅनेजमेंटद्वारे नीट हाताळल्या न गेल्याने दडपणाखाली खेळताना वावरताना दिसत होता, तो मेलबर्न कसोटीमध्ये अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली मोकळेपणाने खेळताना दिसला. त्याच्या बॉलिंगमध्ये तो शार्पनेस तर जाणवलाच शिवाय

कसोटीमध्ये तो एक्स्प्रेसिव्ह दिसला. जसप्रीत बुमराहला पहिल्या इनिंगमध्ये एकदा सलग तीन मोठे शॉट्स लगावल्यावर रवी अश्विन त्याला समजावताना दिसला. असं चित्र याआधी कधी दिसलं का! पहिल्या दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये आगमन करणाऱ्या मोहम्मद सिराजने अव्वल दर्जाची बॉलिंग केल्यावर पहिल्या दिवसाचा खेळ संपल्यावर कॅप्टन रहाणेने त्याला पुढे करून त्याच्या मागून सर्व संघ मैदानाबाहेर गेला. या छोट्या गोष्टीमुळे सिराजचा आत्मविश्वास तर वाढलाच शिवाय ऑस्ट्रेलियाच्या मीडियाने देखील कॅप्टन राहणेच्या या कृतीचे कौतुक केले. संपूर्ण संघ अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली एकजूट होऊन खेळला आणि सामना जिंकला.

अजिंक्य रहाणे कॅप्टन म्हणून चांगला आहे, हे दिसत होतंच; पण एक प्रमुख कसोटी होती ती अजिंक्य रहाणे एक बॅट्समन म्हणून कसा खेळणार! जबाबदारी पडल्यावर कोणी तुटतात तर कोणी उठून उभे राहतात. अजिंक्य रहाणेने जबाबदारी घेत चौथ्या नंबरवर बॅटिंग करायला येऊन त्याने थ्रिलिंग झुंझार शतक झळकवले. जणुकाही तो स्वतःची संहिता स्वतः लिहीत होता. शतक पूर्ण केल्यावर त्याने काहीही हावभाव न दर्शवत संयतपणे शतक साजरं केलं. त्याच्या आदल्या दिवशी सकाळी रवींद्र जडेजाच्या चुकीच्या कॉलमुळे धावबाद झाला असता त्याने जडेजावर न रागावता सकारात्मक मुद्रा दर्शवली. ह्या सर्व गोष्टींमुळे अजिंक्य रहाणेने क्रिकेट रसिकांची मने जिंकली.

अर्थात त्याची परीक्षा अद्याप संपली नाही, कारण अजून दोन कसोटी बाकी आहेत.

मात्र, शांतपणे, शोशा न करता, स्टाइल न मारता, आक्रमक आहोत असं न दाखवता केवळ आपली गुणवत्ता, मेहनत आणि संयम या जोरावर जिंकता येतं हे २०२० संपता संपता अजिंक्यने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे. नव्या बडबोल्या काळात अजिंक्यचं जिंकणं म्हणूनच जास्त महत्त्वाचं आहे.

( अभिजित ब्लॉगर आहे.)

abhijeetpanse.flute@gmail.com