शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

सावधान! व्हाट्सअ‍ॅपवर तुम्ही ' हे ' काय शेअर करताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 14:46 IST

व्हॉट्सअ‍ॅप हे प्रकरण आपल्याला भयंकर खासगी वाटतं. खासगी क्षण, खासगी फोटो विश्वासानं शेअर केले जातात. काहीजण अश्लील व्हिडीओ, फोटोही सहज शेअर करतात; पण आता सावध राहा, पोलीस कोठडीची हवा खावी लागेल!

ठळक मुद्देव्हॉट्सअ‍ॅपही आता सुरक्षित वापराच्या जाहिराती करू लागलंय पण आपण स्वतर्‍ला वेसण घातली नाही तर कायद्याचा बडगा लांब नाही.

- मनीषा म्हात्रे

व्हॉट्सअ‍ॅपवर टिनेजरपासून तरुण, तरुणी, त्यांचे पालक, त्यांचे आजी-आजोबा, कॉलेज-क्लास-शाळांचे मित्र असे शेकडोनं ग्रुप केले जातात. कोण कोणत्या ग्रुपात येतो याची स्पर्धा असते. अमूक ग्रुपात जाण्यासाठी भयंकर धडपडही केली जाते. या ग्रुपवर अनेकदा दोस्ती होते, अनोळखी माणसांत वादही होतात. चर्चा तापतात. भयंकर ताण वाढतो; पण हे चालतं ते व्यक्तिगत पातळीवर, त्याचा ताणही तेवढय़ापुरता येतो-जातो. मात्र अश्लील व्हिडीओ, फोटो, मेसेज यांचंही शेअरिंग जोरात होतं. आपण काय आणि कशासाठी फॉरवर्ड, अपलोडकरतोय, याचं भानच राहात नाही. वाहत जाणं होत राहातं.  आणि ते कुठवर कसं पोहोचेल याची काही मर्यादाच उरत नाही.अलीकडची मुंबईतलीच एक घटना. अश्लील शेरेबाजी करणार्‍या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये महिलेला सहभागी करून घेतलं आणि ते सारं गचाळ पाहावं लागतं अशी तक्रार महिलेनं केली आणि त्यापायी ग्रुप अ‍ॅडमिनला थेट पोलीस कोठडीची हवा खावी लागली, ही मुंबईतली घटना ताजी आहे. मूळचा पश्चिम बंगालचा रहिवासी असलेला मुस्ताक अली शेख हा तरुण. व्यवसायाने सुतार. कामाच्या शोधात त्यानं कोलकातासह दिल्ली आणि मुंबई गाठली. हातातल्या अ‍ॅण्ड्राइड मोबाइलमध्ये टाइमपास म्हणून त्यानं पश्चिम बंगालमधील मित्रांचा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप तयार केला.  सुरुवातीला हाय-बायचे संदेश सुरू झाले. नंतर अश्लील शेरेबाजी, व्हिडीओ, फोटो ग्रुपमध्ये पोस्ट होऊ लागल्या. सगळेच मित्र असल्याने मित्रांच्या लाइक्स, कमेण्ट्स फॉरवर्ड-अपलोडिंगला वेग आला. याच दरम्यान ग्रुपमध्ये एक नवीन क्रमांक अ‍ॅड झाला. तो क्रमांक एका महिलेचा होता. ग्रुपवरील  पोस्टला आक्षेप घेत ग्रुपमध्ये का सहभागी केलं याबाबत त्या महिलेनं जाब विचारला. बघता  बघता सगळेच शांत झाले. अखेर काहीच प्रतिसाद न आल्यानं महिला ग्रुपमधून बाहेर पडली. आणि तिने माटुंगा पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला. तिनं दिलेल्या क्रमांकावरून ते पश्चिम बंगालचे असल्याचं उघड झालं. पथक पश्चिम बंगालला रवाना होणार त्यापूर्वीच, ग्रुपचा अ‍ॅडमिन मुंबईत आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी मुंबईतूनच त्याला बेडय़ा ठोकल्या. चौकशीत मित्राला ग्रुपमध्ये सहभागी करून घ्यायचं होतं मात्र त्याच्या मोबाइल क्रमांकामधील काही क्रमांक चुकले असावेत आणि महिलेचा क्रमांक त्यात जोडला गेल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. ही घटना अपवाद असेल का? त्या महिलेनं तक्रार केली म्हणून पण अश्लील शेरेबाजी, फोटो टाकणं, एखादीला टार्गेट करणं हे ग्रुपमध्ये आताशा सर्रास चालतं. मुश्ताकसारखे अनेक तरुण अशाप्रकारे ग्रुप तयार करून शेअरिंगच्या स्पर्धेत उडय़ा मारताना दिसत आहेत. त्यातून  इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे कायदा व सुव्यवस्था राखणार्‍या यंत्रणांपुढे या माध्यमातून केल्या जाणार्‍या गुन्हेगारीला रोखण्याचं मोठं आव्हान उभं ठाकलं आहे. विशेषतर्‍ फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप यासारख्या प्रचलित समाजमाध्यमांचा वापर करून केल्या जाणार्‍या सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. हे सारं वाचताना हेच लक्षात ठेवायला हवं की, हातातला फोन, त्यावरचं व्हॉट्सअ‍ॅप आपल्याला कितीही प्यारं असलं तरी एक छोटीशी चूक आपल्याला पोलीस कोठडीत पोहोचवू शकते.

****

 

व्हिडीओ कॉलचा विकृत वापर

अलीकडेच एका फॅशन डिझायनरच्या मुलीनं पोलीस ठाणे गाठलं. तिची तक्रार ऐकून सर्वानाच धक्का बसला. रात्री-अपरात्री आलेल्या अनोळखी व्हॉट्सअ‍ॅप कॉलद्वारे तिला गुप्तांग दाखविण्यात येत होते. याच क्रमांकाच्या आधारे पोलीस मोबाइल क्रमांकाच्या मालकार्पयत पोहोचले. मात्र मोबाइल पत्नीनं नेल्याचं त्याच्याकडून समजताच पोलिसांनी पत्नीला गाठलं. तपासात त्याची पत्नी वेश्याव्यवसाय करत असून, तिच्याकडे आलेल्या ग्राहक फैयाज शेख हा त्या मोबाइलद्वारे अश्लील वर्तन करत असल्याचं समोर आलं. महिलेच्या मदतीने फैयाजला पोलिसांनी अटक केली.तेव्हा, चौकशीत तरुणीला आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी मिर्झापूरच्या फैयाज शेखने व्हॉट्सअ‍ॅप कॉल करून असा विकृत त्रास त्या मुलीला दिला. शेख हा कपडे शिवण्याचे काम करतो. तक्रारदार तरुणीची आई फॅशन डिझायनर आहे. त्यामुळे त्याचं तिच्या घरी येणं-जाणं होतं. त्यातून त्यानं हा प्रकार केला.तरुण मुलामुलींमध्ये अनेक खासगी गोष्टी शेअर करण्यासाठी व्हिडीओ कॉलचा वापर वाढलेला आहे. आपलं खासगीपण जपतोय का याचा विचार करायला हवा, कारण पुढं याच क्लिप व्हायरल झाल्या तर काय, याचाही विचार करायला हवा.

अक्षराचे फोटोआणि शेअरिंगचा धडा

अभिनेत्री अक्षरा कमल हसन (वय 28) हिचे अश्लील फोटो सोशल मीडियावर व्हायरल केल्याप्रकरणी वसोर्वा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहाते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, 2013 मध्ये सांताक्रुझ येथे राहात असताना, आयफोन 6 मध्ये काही खासगी फोटो काढले होते. त्यानंतर, मोबाइल पाण्यात पडल्यानंतर तो बंद झाला. हे फोटो फक्त प्रियकर तनुज वीरवाणीला पाठवले होते. 2016 मध्ये त्यांचं ब्रेकअप झालं. जानेवारी 2018 मध्ये चार बंगला परिसरात ती राहायला आली. याचदरम्यान 1 ऑक्टोबर रोजी खासगी फोटो यूटय़ूब, तसेच फेसबुकवर शेअर झाल्याचं समजताच धक्का बसल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं होतं.अक्षराचं प्रकरण हे एक उदाहरण आहे. आपले खासगी फोटो, खासगी क्षण शूट करून ते परस्परांना पाठवणार्‍या तरुण जोडप्यांनीही भान ठेवलं नाही तर गोष्टी अशा व्हायरल होणं, त्यातून पुढं ब्लॅकमेलिंग होणं असा प्रकार घडू शकतो. व्हॉट्सअ‍ॅपवर आपण काय शेअर करतोय, ते खरंच गरजेचं आहे का, याचा एकदा विचार करायलाच हवा. फॉरवर्ड-शेअर करण्यापूर्वी विचारा स्वतर्‍ला, याची गरज काय?

अफवा पसरवताय का?

महाराष्ट्रात घडलेल्या दंगलीच्या वेळी विविध अफवांनी डोकं वर काढले. त्यामुळे या अफवांना पेव फुटला. धार्मिक भावना भडकाविण्याचा प्रयत्न झाला. अखेर पोलिसांना सगळीकडे ज्ॉमर लावण्याची वेळ आली.  त्यामुळे आपण फेक न्यूज फॉरवर्ड करतोय का, समाजात विघ्न आणणार्‍या शक्तींच्या हातातलं खेळणं होतोय का, विखार पसरवतोय का, हे तपासून पाहायला हवं.