-महेश गलांडे
मुंबई बघाय चला, मुंबई बघाय चला.. अमिताभ बच्चन बघाय चला, श्रीदेवी बघाय चला.. मुंबई बघाय चला, मंबई बघाय चला..- लहानपणी बायस्कोपवाला हेच गाणं म्हणत याचचा गावात. एक डोळा झाकून पेटीतल्या होलमधून मुंबई अन् बॉलिवूड पाहताना कधी याच बॉलिवूडमध्ये काम करण्याची संधी मिळेल असं वाटणंही कल्पनेच्या, स्वपAांच्या पलीकडलं होतं.मुंबईपासून 450 किमीवर असलेल्या बार्शीतला समीर परांजपे.राजकीय वा कलात्मक पाश्र्वभूमी नाही, की आसपास तसं वातावरण नाही. पण नाटक, एकांकिका आणि सांस्कृतिक आवड असल्याने हळूहळू कला जगताकडे वळला. बार्शी ते बॉलिवूड हा प्रवास समीरसाठी नक्कीच सोपा नव्हता.मात्न शाहरूख खानच्या रेड चिलीज प्रोडक्शनच्या क्लास ऑफ 83 सिनेमात संधी मिळाली. मुलाने डॉक्टर, इंजिनिअर किंवा सरकारी नोकरदार व्हावं, म्हणून मागं लागणारे मध्यमवर्गीय आई-वडील. कला अन् क्रीडा म्हणजे टाइमपास, यात कुठं करिअर असते का. भाकरी मिळते ती फक्त नोकरीनेच असंच एकूण वातावरण.म्हणून, इंजिनिअरिंग करण्यासाठीच समीरने पुणो गाठलं. ठरवल्याप्रमाणो इंजिनिअरची पदवी पूर्णही केली. मात्न, कलेची आवड स्वस्थ बसू देत नव्हती. इंजिनिअरिंग करतानाच, एकांकिका आणि नाटकांमधून स्वत:च्या आवडीचा प्रवास सुरूच होता. फिरोदिया करंडक स्पर्धेतून समीरने आपल्या अभिनयाची झलक दाखवली. पण, दुसरीकडे इंजिनिअरची पदवी पूर्ण झाल्यामुळे आता पुढं काय? हा प्रश्न त्याच्यासमोरही होता. मध्यमवर्गीय कुटुंबातील असल्याने नोकरी आणि कुटुंबाला हातभार हे तर ठरलेलंच. समीरचा पुण्यात स्ट्रगल सुरू होता, इंजिनिअरिंग पूर्ण झाल्यानंतर नोकरीही लागत होती. पण, अभिनयाचं याड लागल्यानं त्यानं मनाचंच ऐकलं. मुंबईत जाण्याबाबत वडिलांना विचारलं. 1 महिन्याचा कालावधी मागताना, केवळ 21 दिवस मला द्या, त्यात काही नाही झालं तर मी पुण्याला येऊन नोकरी करतो, असं सांगितलं. वडिलांनी मुंबईला जाण्याची परवानगी दिली.
कधी काळी बार्शीच्या चित्नपटगृहात आणि घरातल्या लहानशा टीव्हीवर पाहिलेल्या शाहरूखचीही मग अर्थातच भेट झाली. समीर सांगतो, मुंबईतील ताज हॉटेलमध्ये शाहरूखसोबत क्लास ऑफ 83ची चर्चा झाली. भेट झाल्यानंतर तो एकच प्रश्न विचारायचा, काम का मजा आ रहा है ना?एन्काउण्टर स्पेशालिस्ट इन्स्पेक्टरची भूमिका असल्यामुळे पोलिसाचं काम शिकण्यासाठी बाळू राऊत यांची मोठी मदत झाली. अंधेरी इस्टला पोलीस प्रशिक्षण केंद्र आहे, तेथील ट्रेनिंग हेड बाळू राऊत यांनी 20-25 दिवस प्रशिक्षण दिलं. क्लास ऑफ 83 चित्नपटाचा ट्रेलर रिलीज झाला, त्यावेळी मी मुंबईतच होतो. कोविडमुळं घरी जाता आलं नाही, याचं वाईट वाटतंय. पण, आईने फोन करून अभिनंदन केलं, तर स्थानिक वृत्तपत्नात बातमी देण्यासाठी वडिलांनी लिहिलेली सुवाच्च अक्षरातील प्रेसनोट त्यांचा आनंद सांगून गेली. सय्यद युनूस हुसैन जैदी यांच्या क्लास ऑफ 83 या कादंबरीतील सत्य घटनेवर आधारित हा चित्नपट 21 ऑगस्ट रोजी नेटफ्लिक्सवर रिलीज होणार आहे.
(महेश लोकमत ऑनलाइनमध्ये वार्ताहर आहे.)