- डॉ. हरीश शेट्टी
रोज रात्री तीन-साडेतीन वाजेर्पयत जागरण करणं आणि त्याचा आपल्यावर काहीच परिणाम होत नाही असा समज करून घेणं ही स्वत:ची फसवणूक आहे. परीक्षेच्या काळात जागरण करणं ही वेगळी गोष्ट; पण सातत्याने केलेल्या जागरणामुळे शारीरिक आणि मानसिक आजार वयाच्या आधीच जडताना दिसतात. चारपैकी एक तरुण सध्या जागरण करत असल्याचे आणि त्यामुळे अनेक व्याधींनी त्रस्त असल्याचं दिसतं.
प्रत्येक व्यक्तीने किमान सलग सात तास झोप घेणो आवश्यक आहे. झोपेचे प्रकार आहेत. त्याप्रमाणो डीप स्लीप- कॉन्शस स्लीप असं चक्र सुरू असतं. ही सायकल सलग पूर्ण झाल्यावरच सकाळी उठल्यावर फ्रेश वाटतं. अनेकजण तक्रार करतात- सकाळी उठल्यावरही फ्रेश वाटत नाही, कंटाळा येतो. कारण शरीराला आणि मेंदूला आराम मिळतच नाही. यातील काहीजण मद्य, सिगारेट आणि पुढची पायरी म्हणजे ड्रग्जच्या आहारी गेलेली आहेत. त्याचाही गंभीर परिणाम शरीरावर होतो.
सातत्याने कमी झोप घेणा:या व्यक्तींच्या आयुष्यात पुढे जाऊन सेक्युशल लाइफमध्ये प्रॉब्लेम येतात. याविषयीच्या समस्या घेऊन येण्याचे जोडप्यांचे प्रमाण वाढले आहे. म्हणजे जागरण हा दिसतो तितका साधा सरळ विषय नाही.