शहरं
Join us  
Trending Stories
1
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
2
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
3
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
4
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
6
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
7
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
8
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
9
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
10
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
11
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
12
Stock Market Today: मे सीरिजच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात तेजी; Sensex २५० अंकांनी वधारला, रियल्टी-मेटलमध्ये तेजी
13
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
14
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
15
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
16
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
17
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
18
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
19
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
20
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?

औरंगाबादच्या तरुणानं तयार केली मालवाहू रोबोटची सेना

By गजानन दिवाण | Updated: March 14, 2019 07:30 IST

औरंगाबादचा एक तरुण. रोबोट त्याचं पॅशन बनलं आणि त्यानं रोबोटची एक मालिकाच विकसित केली. त्याची आणि त्याच्या रोबोटची ही एक खास भेट.

ठळक मुद्देमानवी कष्ट कमी करणार्‍या रोबोटचा ध्यास घेणारा रोहित दाशरथी.रोजगार जाईल? नव्हे, काम बदलेल!

 - गजानन दिवाण

थलैवा रजनीकांत काय करेल याचा काही नेम नाही. त्याच्या ‘रोबोट’ नावाच्या सिनेमानं अशीच कमालीची जादू औरंगाबादच्या एका तरुणाच्या आयुष्यात केली आणि त्याच्या डोक्यात रोबोटचाच किडा घुसला. त्यानं ठरवलं आपणही असंच काहीतरी भन्नाट करून पाहू. तसंही नवीन काही पाहिलं की करून पाहण्याची इच्छाशक्ती त्या तरुणात होतीच. त्यात त्याला भेटला रोबोट आणि मग त्याचाच ध्यास घेत, हा रोबोट त्या तरुणाचं पॅशन आणि करिअर बनत गेला.

औरंगाबादचा रोहित दाशरथी. 29 वर्षाचा हा तरुण आहे. रोबोट बनवण्याची आयडिया त्याला क्लिक झाली मात्र ही आयडिया आपल्याला झपाटून टाकेल असं त्यालाही वाटलं नव्हतं. मात्र तसं झालं. रोबोटिक्सचा अभ्यास करायचा म्हणून ‘रोबोटिक्स सिस्टीम डेव्हलपमेंट’साठी तो थेट अमेरिकेला गेला.  मास्टर्स झाल्यानंतर अमेरिकेतल्याच कॉर्नियल विद्यापीठात त्याला प्रवेश मिळाला. रोबोटिक्ससाठी ख्यातनाम जगभरातल्या प्रमुख संस्थांमधली ही एक संस्था. तिथे रोहितने अ‍ॅडव्हान्स कोर्स केला. रोबोटिक्स टेक्नॉलॉजी शिकल्यानंतर पुढे काय असा प्रश्न होता. मात्र त्याच्यासाठी त्या प्रश्नाचं उत्तर तयार होतं. ते म्हणजे परत औरंगाबादला यायचं आणि आपल्या हाती असलेली तंत्रज्ञानाची ताकद आपल्या माणसांसाठी, मातीसाठी वापरायची.

औरंगाबादला आल्यावर कुटुंबाचाच व्यवसाय असलेल्या ‘ऋचा यंत्रा’मध्ये त्यानं सुरुवातीला एक वर्ष काम केलं. काम समजून घेतलं शिवाय इथं नेमकी गरज कशाची आहे याचा अभ्यास रोहित आणि त्याच्या टीमने वर्षभर केला. अवजड सामानसुमान एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी वाहून नेण्यासाठी अमेरिकेत रोबोटचा वापर होतो, हे रोहितनं जवळून पाहिलं होतं. त्याची कौटुंबिक पाश्र्वभूमी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रातली त्यामुळे सामानसुमान एका ठिकाणाहून दुसरीकडे नेताना होणारी कसरत त्यानं रोजच पाहिली होती. थोडीथोडकी नाही तर ही वाहतूक टनामध्ये असायची. अंतरही जास्त. ही वाहतूक करण्यासाठी मनुष्यबळच वापरलं जातं. मात्र वेळ आणि सुरक्षा या दोन्ही गोष्टींचा विचार करता रोहितनं ठरवलं यासंदर्भात काहीतरी करू. हे काम माणसांऐवजी यंत्रानं केलं तर असा विचार करून रोबोटचा वापरण्याचा विचार रोहितनं सुरू केला. 

रोहितला जे सुचलं ते तसं फार नवं नव्हतं.  अशा प्रकारचं काम करणारे अनेक रोबोट बाजारात होते, फक्त ते भारतात नव्हते. युरोपमध्ये होते. जपान-जर्मनीत होते. रोहित सांगतो, ‘ते रोबोट तिथून इकडे आणणं परवडत नाही. मुळात त्याची मूळ किंमतदेखील आपल्यासाठी फार मोठी असते. त्यापेक्षा भारतातच आपल्या गरजेप्रमाणे रोबोट बनवणं हे किफायतशीर ठरावं. आयातीचा खर्च वाचतो. बाहेर देशातील किमतीच्या तुलनेत हा रोबोट कमी पैशांत तयार होऊ शकतो.’ आपणच रोबोट तयार करावा या विचारातून रोहितने स्वतर्‍ रोबोट बनवण्याचं ठरवलं. विनाचालक मोटारीच्या श्रेणीतील हे रोबोट बनविण्यासाठी त्यानं वेगवेगळे प्रयोग केले. सुरुवातीला एका लोखंडी पट्टीवर वजन नेणारं यंत्र विकसित केलं. लोखंडी धावपट्टी बनविण्यात अडचणी येऊ लागल्या तेव्हा रंगाच्या पट्टय़ाच्या आधारे सामानाची ने-आण करणारा रोबोट तयार करण्यात आला. आता त्यातही बदल करण्यात आला असून, अगदी खड्डे किंवा ओबडधोबड जमिनीवर सामानाची ने-आण करू शकणारा रोबोट विकसित केला आहे. राघव आणि वामन असं त्यांचं त्यानं बारसं केलं. मोबाइलवरून या रोबोटचं नियंत्रण करता येतं.

औरंगाबाद येथील शेंद्रा औद्योगिक वसाहतीमधील ऋचा यांत्रिकीमध्ये सध्या दिवसाला तो असे दहा रोबोट बनवतो आहे. ‘सेवक’ या आणखी एका रोबोटचं लाँचिंग औरंगाबाद विमानतळावर करण्यात येणार असल्याचं रोहित सांगतो. त्याची बोलणी विमानतळ अधिकार्‍यांसोबत अंतिम टप्प्यात आहे. प्रत्येक रोबोला त्या-त्या टीमनेच नाव दिलं आहे. प्रत्येकाचा एक वेगळा अर्थ आहे. राघव म्हणजे रूचा ऑटो गाईडेड हेवी असिस्टन्स व्हेईकल. वामन म्हणजे व्हेईक्युलर अ‍ॅकनॉलेजिंग मनूवरिंग अ‍ॅटॉनॉमस नेव्हिगेशन. तिसरा सेवक. त्याच्या नावातच त्याचा अर्थ आहे. या तिन्ही रोबोमध्ये काही सेन्सर्स सोडले तर सारं काही मेड इन इंडिया आहे. जगभरात रोबोटचा मराठवाडी ‘ब्रॅण्ड’ ओळखला, नावाजला जावा अशीच आपली इच्छा आणि प्रयत्न असल्याचं रोहित सांगतो.

रोजगार जाईल? नव्हे, काम बदलेल!

माणसांची कामं रोबोट करायला लागली तर माणसांचा रोजगार जाईल असं भय जगभर व्यक्त होत आहे, त्याचं काय या प्रश्नावर रोहित सांगतो, ‘आपल्या जगण्यात बदल व्हावं, आपण पुढच्या आर्थिक स्तरात जावं असं प्रत्येकाला वाटतं. कष्टाचं काम करणार्‍या मजुरानं कायम तेच काम का करावं. आमच्या रुचा इंजिनिअरिंगमध्ये सुरुवातीला रोबोटचा वापर केला त्यावेळी सात माणसांची कामं तो एकटाच करू लागला. त्यामुळे त्या सात माणसांना वेल्डिंगचं ट्रेनिंग देऊन कमी मनुष्यबळ असलेल्या विभागात शिफ्ट करण्यात आलं. पूर्वी केवळ ओझी वाहणारा कामगार आज या रोबोटचं सव्र्हिसिंग करतोय. प्रोगामिंगही करतो आहे. तंत्रज्ञान माणसाला मदत करतं, काम बदलतं, रोजगार जात नाही!’ आज रोहितच्या टीममध्ये काम करणारे 90 टक्के तरुण मराठवाडा आणि विदर्भातले आहेत, ते रोबोटच्या जगात आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. 

अशी आहे रोबोट सेना

राघवएका जागेवरून दुसर्‍या जागी वजनदार साहित्य वाहून नेणारा रोबोट. रोहितने तो जानेवारी 2015मध्ये तयार केला. साधारण पाच किलो वजन तो वाहून नेत सलग 30 मिनिटे तो काम करायचा. त्याची बॅटरी चाजिर्ग करण्यासाठी दोन तासांचा वेळ लागायचा. आज ‘राघव’ दीड टनार्पयत ओझे वाहून नेऊ शकतो. आठ तास सलग काम करतो आणि चार तासांत त्याचं चाजिर्ग पूर्ण होते. कुठल्याही एका रंगाचा मार्ग हा रोबो ओळखू शकतो. तो त्याच रंगाच्या रेषेवरून सामानाची ने-आण करतो. याला कलर सेन्सिंग टेक्नॉलॉजी असं म्हणतात. 

वामनमाणूस जसा स्वतर्‍च्या डोळ्याचा वापर करून हालचाल करत असतो. त्याचप्रमाणे पाहून, वातावरण समजून घेऊन हा रोबोट सामानाची ने-आण करतो. समोर भिंत आहे. टेबल-खुर्ची आहे हे त्याला कळते. कारण तसे सेन्सर त्यात आहेत. नकाशा आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करतो.  स्वतर्‍च स्वतर्‍चा रस्ता शोधून मालाची ने-आण करीत असतो.

सेवकविमानतळाबाहेर आपल्या मोठय़ा बॅगा घेऊन ट्रॉल्या ढकलत गाडीर्पयत जावं लागतं. हा  ‘सेवक’ रोबोट विकसित करण्यात आला आहे. ही एक प्रकारची ट्रॉलीच आहे. त्याला कॅमेरा आहे. तो प्रवासी व्यक्तीचे पाठमोरे छायाचित्र आपल्या मेमरीमध्ये साठवून घेतो आणि ज्याचं सामान आहे त्याच्या पाठीमागे तीन मीटर अंतर ठेवत चालू लागतो. प्रवासी थांबला की हाही थांबतो. मार्गात अडथळे आले तर तो थांबतो आणि पुन्हा चालू लागतो. या रोबोमध्ये कॉम्प्युटर व्हिजन, मशीन लर्निग, डीप लर्निग या अलीकडच्या अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलेला आहे. बॅटरी चार्जिग संपले तरी माणसांची गरज लागत नाही. मोबाइल रिमोटच्या आधारे त्याला चार्जिग पॉइंटर्पयत आणता येते.  त्यातील एक रोबो स्वतर्‍च्या ‘चार्जिग स्टेशन’र्पयत जाऊ शकतो. 

(लेखक ‘लोकमत’च्या मराठवाडा आवृत्तीत उप वृत्तसंपादक आहेत. सर्व छायाचित्रे - सचिन लहाने )

पहा व्हिडिओ :