शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कृत्रिम बुद्धिमत्ता

By admin | Updated: June 21, 2016 08:42 IST

५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले.

- गजानन दिवाण

तुम्हाला माहिती आहे काही यासंदर्भात,हे वाचा..५० वर्षांपूर्वी केवळ अशक्य वाटणाऱ्या अनेक गोष्टी विज्ञानाने आज सिद्ध करून दाखवल्या. माणूस म्हणून तो जे काही करतो, ते तंत्रज्ञान करू लागले. काही वर्षांपर्यंत मेंदूचे काम तेवढे बाकी होते. आता तेही जवळपास केले जात आहे. वातावरण, त्यावेळच्या किंवा आधीच्या घडामोडी, परिस्थिती या साऱ्या गोष्टीचा परिणाम एकवेळ माणसाच्या मेंदूवर होऊ शकतो. या यंत्रावर तसा कुठलाही परिणाम होणार नाही. तो होईल तरी कसा?पण या यंत्रांकडे बुद्धिमत्ता आली तर? सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयावर जगभरात चिंतन सुरू आहे. सगळ्याच गोष्टी यंत्राच्या सहाय्याने होत गेल्या तर मग माणसाचा उपयोग तो काय? त्याची खरंच गरज राहील काय?विख्यात प्रोग्रामर्स, तत्वज्ञ आणि उद्योजकांना याबाबत काय वाटतं? याचा हा आढावा..........सॅम अल्तमनकृत्रिम बद्धिमत्तेचा विकास हाच अल्तमनचा अभ्यासाचा विषय आहे. काही मोजक्या लोकांना सध्या या कृत्रिम बद्धिमत्तेचा लाभ घेता येतो. तो सर्वांना मिळायला हवा, यासाठी अल्तमन झटत आहे. ३० वर्षीय कॉम्प्यूटर प्रोग्रामर असलेला अल्तमन स्टार्टअप इन्क्युबेटर वाय कॉम्बिनेटरचा अध्यक्ष आहे. या तंत्रज्ञानामुळे माणसाची बुद्धिमता काही दशकांनी पुढे नेता येईल. मात्र ते काही लोकांसाठी न राहता सर्वांनाच उपलब्ध व्हायला हवे, असे तो म्हणतो. .....निक बोस्ट्रोम आॅक्सफोर्ड फ्यूचर अ‍ॅण्ड ह्युमॅनिटी इन्स्टीट्यूटचा संचालक असलेल्या ४२ वर्षीय निकने आपल्या ‘२०१४ बुक सुपरइंटेलिजन्स’ पुस्तकात कृत्रिम बद्धिमत्तेचा मानवजातीला प्रचंड धोका असल्याचे म्हटले आहे. तो म्हणतो, ‘या बुद्धिमत्तेमुळे आर्थिक प्रगती होईल. तंत्रज्ञानदखील कुठल्या कुठे पोहचेल. मात्र त्याचा उपयोग करून घेण्यासाठी कोणी माणूस शिल्लक राहणार नाही. म्हणजेच मुलांशिवाय डिस्नेलॅण्ड असा प्रकार होईल.’.........बिल गेट्समायक्रोकॉफ्टचे सहसंस्थापक ६० वर्षीय बिल गेट्स म्हणतात, ‘सर्वत्र कमी भासणाऱ्या मजुरांची ती योग्य रिप्लेसमेंट असेल. हे तंत्रज्ञान योग्यच आहे. त्याचा वापर फक्त सकारात्मक विचारातून व्हायला हवा. आगामी काही दशकांत हे तंत्रज्ञान सर्वत्र दिसेल तेव्हा चिंताही वाढलेली असेल.’ ..........स्टीफन हॉकींगसैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ, लेखक आणि कृष्णविवर भौतिकशास्त्र प्रणेते स्टीफन यांना हा मानवी इतिहासातील सर्वात मोठा इव्हेंट असल्याचे वाटते. या माध्यमातून युद्ध, रोगराई आणि गरिबीवर मात करता येईल. यामुळे आयुष्याला एक प्रचंड गती येईल. आर्थिक बाजार, मानवी संशोधन, शस्त्रास्त्रांचा विकास समजण्यापलिकडे झालेला असेल. यातील धोके कसे टाळायचे हे जर आम्ही समजून नाही घेतले तर मानवी इतिहासातील तो शेवटचा इव्हेंट असेल, असा इशाराही ते देतात.................मिशीयो काकूबेस्टसेलर लेखक आणि सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ ६९ वर्षीय काकू यांच्या मते या हा शतकातील अडचणींचा शेवट असेल. ...............रे कर्झवेलगुगलमधील अभियांत्रिकी विभागाचे संचालक ६८ वर्षीय रे यांच्या मते २०२९पर्यंत आपण हे यश मिळविलेले असेल. रोगराई आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी याची मोठी मदत होईल. ...............इलोन मस्कटेस्टा मोटर्सचा सीईओ आणि ४४ वर्षीय उद्योजक इलोन म्हणतो, हा अनुभवातून घेतलेला सर्वात मोठा धोका असेल. प्रगतीच्या नावाखाली आपण काही वेडेपणाचे पाऊल तर उचलत नाही ना याचाही विचार करायला हवा. अर्थात याचा वापर चांगल्या हेतूतूनच व्हायला हवा. ............