शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
4
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
5
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
6
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
7
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
8
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
9
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
10
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
11
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
12
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
13
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
14
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
15
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
16
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
17
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
18
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
19
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
20
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम

जंगलातला सुगंध

By admin | Updated: March 23, 2017 09:22 IST

अगरबत्ती यंत्र आणि महिलांना स्वयंनिर्भर होण्याची संधी

 आदिवासींच्या चरितार्थात बांबूचा वाटा खूप मोठा. या बांबूनं आदिवासी बांधवांच्या आयुष्यात थोडीफार स्थिरताच आणली नाही, तर त्यांच्या पोटापाण्याचाही तो प्रमुख आधार ठरला. वर्षानुवर्षांपासून या बांबूनंच त्यांना तारलं आहे. आजही बांबूनंच त्यांचं ‘पालकत्व’ घेतलं आहे.बांबूपासून टोपल्या विणणं, कलाकुसरीच्या वस्तू बनवणं, बांबूच्या काड्यांपासून अगरबत्त्या तयार करणं.. यांसारख्या छोट्या-मोठ्या कामांतून आपल्या पोटाची खळगी ते भरतात. मात्र यातलं कुठलंही काम करण्यासाठी त्यांना हातातल्या सुरी, कोयता किंवा चाकूसारख्या धारदार हत्यारावर आणि आपल्या शारीरिक श्रमांच्या क्षमतेवर अवलंबून राहावं लागतं.सुरी, कोयत्यानंच बांबू तासणं, त्याच्या लांबच लांब कामट्या काढणं आणि मग हव्या त्या आकारात त्यांचे तुकडे करणं, या साऱ्या कामांत नुसते शारीरिक श्रमच नाहीत, तर धोकाही खूप मोठा आहे.सुरी, कोयते वापरताना थोडं जरी दुर्लक्ष झालं तरी त्यामुळे हात, बोटं कापलं जाणं, जखमी होण्याचे प्रकारही नित्याचे आहेत. हातावर पोट असणाऱ्यांची रोजीरोटीही त्यामुळे बऱ्याचदा हिरावली गेली आहे.बांबूपासून अगरबत्त्या किंवा त्यासाठीचा कच्चा माल, म्हणजे कामट्या, काड्या तयार करण्याचा उद्योग आदिवासी, ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणावर चालतो. विशेषत: घरातला महिला वर्ग आणि थोड्या कळत्या वयातल्या मुलांचा तर यात खूपच मोठा हातभार आहे. रोजचा घरखर्च चालवण्यात आणि त्याचबरोबर महिलांना स्वयंनिर्भर बनवण्यात या उद्योगाचं योगदान आदिवासी भागासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मात्र बांबू आणण्यापासून ते अगरबत्ती, इतर वस्तू तयार करण्यापर्यंतचे कष्ट अपरंपार आहेत. आदिवासी लोकांचे हे कष्ट कमी करण्यासाठी एका तरुणानं पुढाकार घेतला.त्याचं नाव परेश पांचाल.गुजरातेतल्या अहमदाबादचा हा तरुण. अगरबत्त्यांची मशीन्स तयार करण्याचा त्यांचा पिढीजात उद्योग आहे. या व्यवसायात त्यांनी चांगलं नावही कमावलं आहे. अर्थात, या उद्योगातही आता मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरणही झालेलं आहे. सेमी अ‍ॅटोमॅटिक मशीनपासून ते फुल्ल अ‍ॅटोमॅटिक मशीनपर्यंत अनेक पर्याय उपलब्ध आहेत, पण अशा यंत्रांची किंमत जास्त आणि विजेची गरजही मोठी.फावल्या वेळात हे काम करणाऱ्या गरीब आदिवासी महिलांसाठी यातला कोणताच पर्याय परवडणारा नाही. आणि घरातल्या घरात, हातावर काम करणाऱ्या या कुटुंबांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर उत्पादन करणंही शक्य नाही. अगरबत्त्यांसाठी मशीन्स तयार करण्याचा घरचा उद्योग होताच. परेशनं मग आणखी अभ्यास केला. आदिवासी, ग्रामीण भागातल्या अडचणी जाणून घेतल्या. विजेची उपलब्धता ही तिथली आणखी एक प्रमुख अडचण. परेशनं या साऱ्या गोष्टी विचारात घेतल्या आणि साधी, सोपी, घरच्या घरी चालवता येऊ शकतील, कमी जागेत बसू शकतील अशी सुटसुटीत काही यंत्रं तयार केली. या यंत्रांचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे ही यंत्रं असली तरीहीदेखील हातानंच चालवावी लागतात. विजेची किंवा कोणत्याही ऊर्जेची गरज या यंत्रांना लागत नाही.या यंत्रांत बांबू टाकल्यावर आपल्याला पाहिजे त्या आकाराच्या, जाडीच्या आणि लांबीच्या कामट्या या यंत्रांतून तयार होऊ शकतात. बांबूच्या ठरावीक जाडीच्या कामट्या अगोदर तयार करायच्या आणि नंतर त्याच मशीनच्या साहाय्याने नेमक्या उंचीच्या काड्या तयार करायच्या! यामुळे आदिवासींचे श्रम खूप मोठ्या प्रमाणात वाचले, त्यात अधिक कौशल्यही आले. तयार झालेल्या या काड्या ‘अगरबत्ती रोलिंग मशीन’मध्ये टाकायच्या. त्यातला अगरबत्ती मसाला आपोआप त्या काड्यांना लागतो. झाली सुगंधित अगरबत्ती तयार!आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवू शकणाऱ्या या अगरबत्ती यंत्रांच्या संशोधनासाठीच परेशला गौरविण्यात आलं.