शहरं
Join us  
Trending Stories
1
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
2
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
3
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
4
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
5
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
6
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
7
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
8
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
9
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
10
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
11
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
12
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
13
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
14
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
15
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
16
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
17
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
18
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
19
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
20
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
Daily Top 2Weekly Top 5

तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 18:06 IST

आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घरकामात अंग चोरणारी, जिममध्ये घाम गाळणारी आईवडिलांना कामात मदतच न करणारी तरुण मुलं बेजबाबदार आहेत का?

ठळक मुद्देही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? 

- विकास बांबल

जिममध्ये मरेस्तोवर घाम गाळतात आणि घरकामात अंग चोरतात. हे असं ऐकलंय का तुम्ही? म्हणजे असा शेरा, राग वडीलधार्‍यांच्या तोंडून निघतोच आताशा! आज आपली पिढी तब्येतीबाबत  सजग झालेली दिसून येते. ती चांगलीच गोष्ट आहे. अगदी खेडय़ातील मुलंमुलीसुद्धा हल्ली राहणीमानाच्या बाबतीत चोखंदळ झालेली आहेत. छान दिसणं, नीटनेटकं राहणं हे चांगलंच आहे आणि प्रत्येकानं तसं असावंदेखील; परंतु या राहणीमानाच्या चोखंदळपणात आपली कर्तव्य, जबाबदार्‍या यांचा विसर पडता कामा नये.छानछोकी आणि मोबाइल यात तरुण मुलंमुली असे गुरफटू लागलेत की त्यांना आईच्या कंबरेवरचा पाण्याचा हंडा किंवा वडिलांच्या हातातील पिठाचा डबापण दिसत नाही.असं होतंय का?घरकाम करणं, आईवडिलांसोबत राबणं आपल्याला कमीपणाचं वाटतं का? घरात इकडची काडी तिकडे न करणं हे योग्य आहे का?एकीकडे आईवडील रक्ताचं पाणी करून, हाल अपेष्टा सहन करून, उसनवार पैसे घेऊन मुलांमुलींचं शिक्षण पूर्ण करतात. आपली जिंदगी बर्बाद झाली; पण आपल्या मुलांची व्हायला नको म्हणून माझी मुलं शिकली पाहिजेत असा हट्ट करतात. मला जे नाही मिळालं ते सर्व मी माझ्या  मुलांना मिळावं म्हणून राबतात; पण बर्‍याच मुलांना याची जाणीवच नसते.काहीजण तर स्वच्छ सांगतात,   ‘मायबापाचं ते कर्तव्यच असतं, असं काय मोठं केलं!’ मात्र त्यांच्याकडून अपेक्षा ठेवताना आपली कर्तव्य आपण विसरतोय का, याचा विचार कुणी करायचा? काही मुलं तर बापाला नुसता भाजीवरील भाकर समजतात. चारचौघात बसलेले असले की बापाच्या नावाने एकमेकांना हाक मारतील, चेष्टा करतील. कट्टय़ावर तर बाप हा वाटेल तसा छळला जातो, हातावर तंबाखू मळावा तसा चोळला जातो, मळला जातो.कालपरवा मी कार्यालयीन कामानिमित्त बाहेरगावी गेलो होतो. जातांना वाटेत एक आलिशान जीम दिसलं. मुलं व्यायाम करत होती. सायंकाळी जेव्हा घरी आलो तेव्हा  त्याच भागातल्या स्त्रिया हातपंपावरून पाणी भरताना दिसल्या. त्यांची मुलं समोरच्याच मैदानात खेळत होती. कुणी चौकात गप्पागोष्टी करत होती.आपल्या कपडय़ांची इस्री मोडायला नको म्हणून घर कामात थोडाही हातभार न लावणारी, ही तरुण मुलं ‘आळशी’ झालेली आहेत का? राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेत म्हणतात,

असेल कुस्तीमाजी बरवा परि जो प्रसंगी कामी न यावा तो मल्ल म्हणोनि गौरवावा कोणत्या न्याये ?? 

कपडय़ास न पडावी वळी 7म्हणोनि दुरूनीच सांभाळी कामे करिती माणसे सगळी 7परी तो जागचा हालेना 

हाते घेवोनि दंड मारणे त्याहुनि उत्तम पाणी ओढने दळणे, फोडणे, जमीन खोदणेआरोग्यदायी..

हे सारं तरुण मुलांना खरंच कळत नसेल का?