- गजानन दिवाण(लेखक मराठवाडा आवृत्तीत उप वृत्तसंपादक आहेत)जगभरात सर्वाधिक तरुण भारतात आहेतचपण ते उद्योगी, कष्टाळू आणि तेवढेच हुशारही आहेत असं वाटावं याची एक झलकपुण्यातील स्पार्कल २०१६ प्रदर्शनात पाहायला मिळाली. ‘केपीआयटी’ या आंतरराष्ट्रीय कंपनीनंआयोजित केलेल्या या प्रदर्शनात देशभरातील अभियांत्रिकी-विज्ञान क्षेत्रातील ५०० महाविद्यालयांतील तब्बल दहा हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.वेगवेगळ्या क्षेत्रात क्रांती घडवू शकणारे १७०० प्रकल्प या विद्यार्थ्यांनी सादर केले.खरगपूर आयआयटीतील विद्यार्थ्यांच्या ‘आय बाईक’ या प्रकल्पालापाच लाख रुपयांचा प्रथम पुरस्कार मिळाला. शिवाय दखलपात्र प्रकल्पांना एक एक लाखाचा पुरस्कार देण्यात आला.त्यातल्याच काही कल्पक आणिमहत्त्वाच्या प्रकल्पांचीही एक झलक...आय बाईकइंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, खरगपूरअयूष पांडे, सुभामोय महाजन यांच्यासह १३ जणांची टीम.इलेक्ट्रिक बॅटरीवर पूर्णपणे स्वयंचलित अथवा मॅन्यूअली चालणारी ‘आय बाईक’ या मुलांनी बनवली आहे. सर्वसामान्यांसोबतच अपंगांसाठीही मोठी उपयोगी आहे. हात-पाय नसला तरी या बाईकवरून प्रवास करता येतो. या बाईकला अॅण्ड्रॉइड अॅप्लिकेशनशी जोडण्यात आलं आहे. त्यामुळे घरी ठेवलेली बाईक या अॅप्लिकेशनद्वारे आपण कार्यालयात बोलावून घेऊ शकतो आणि काम झाल्यानंतर तिला परतदेखील पाठवू शकतो. स्वयंचलितचा पर्याय निवडल्यास आपल्याला काहीच करायचे नाही. केवळ बसून राहायचे. अॅप्लिकेशनच ही बाईक ड्राईव्ह करेल. वाटले तर मॅन्युअलचा पर्यायदेखील देण्यात आला आहे. ही बाईक वैयक्तिक वापरापेक्षा पब्लिक ट्रान्स्पोर्टसाठी अधिक महत्त्वाची असल्याचा दावा अयूष पांडे करतो. तो म्हणतो, ‘एका संपूर्ण कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे ट्रान्स्पोर्टेशन ही एकटी बाईक करू शकते. इलेक्ट्रिक बॅटरीमुळे पर्यावरणाचा समतोल राखण्यासही मदत होते. ’व्हर्च्यूअल स्पीडब्रेकरहिंदुस्तान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलॉजी, कोईम्बतूरअल्बीन बेबी व सहकारीकल्पना करा, रस्त्यावर एकही गतिरोधक नसेल तर गाडी चालविण्याची मजा काय असेल. तसे झाले तर अपघात वाढतील, अशी काळजी करण्याची गरज नाही. रस्त्यावर एकही गतिरोधक नसताना परिसरानुसार आपल्या वाहनाची गती कमी-जास्त करण्याचे यंत्र कोईम्बतूर येथील हिंदुस्तान कॉलेज आॅफ इंजिनिअरिंग अॅण्ड टेक्नॉलाजीच्या अल्बीन बेबी आणि त्याच्या टीमने तयार केले आहे. हे यंत्र आपल्या गाडीत बसवायचं.http://www.nsdc.t15.com या त्यांच्या वेबसाइटवर जाऊन गूगल मॅपनुसार कुठल्या परिसरात आपल्याला कमी गती हवी आहे याची नोंद करायची. म्हणजे शाळा, रुग्णालये आदि ठिकाणांची नोंद करायची. नंतर त्या परिसरात ठरवूनही तुम्ही गती वाढवू शकणार नाही. हे यंत्रच आपल्या गाडीच्या गतीवर नियंत्रण ठेवेल.‘खेड्यापासून शहरापर्यंत प्रत्येक रस्त्याचं मॅपिंग झाल्यास आणि हे यंत्र प्रत्येक वाहनाला लावल्यास कोठेच गतिरोधकाची गरज राहणार नाही,’ असा दावा अल्बीन सांगतो.चार्जिंग डिव्हाईसइंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, खरगपूरअर्घ्य पत्र, अभिषेक त्रिपाठी, दीप कुमारजगभरातील तागाच्या एकूण उत्पन्नात भारताचा वाटा तब्बल ७० टक्के आहे. सध्या या तागाचा वापर केवळ पोती बनविण्यासाठी होतो. आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या तागाचा वापर करून चार्र्जिंग उपकरण तयार केलं. हे चार्जर लॅपटॉपसह मोबाइललाही वापरता येतं. सध्याच्या वीजटंचाईच्या काळात परवडणारं आणि पर्यावरणपूरक असं उपकरण बनवल्याचा दावा अर्घ्य पत्र या विद्यार्थ्याने केला. ‘सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अम्ल किंवा पॉलिमर बॅटऱ्यांच्या तुलनेत कमी वेळेत हे चार्र्जिंग होतं’ असं अर्घ्य सांगतो.इफिशियन्ट ट्राफिक कन्ट्रोलमनीपाल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, उडुपीसुकुमार करुमुरी व सहकारीप्रत्येक शहरात सध्या वाहतूककोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर ‘मनीपाल’च्या विद्यार्थ्यांनी नामी उपाय शोधून काढला आहे. सीएमओ कॅमेऱ्यांच्या मदतीने शहरातील प्रत्येक रस्त्यावर नजर ठेवली जाईल. ज्या ठिकाणी कोंडी आहे, त्याची माहिती कंट्रोल रूमला मिळेल. शहरामधील सिग्नल्सना ही यंत्रणा जोडली जाईल. त्यामुळे पुढील कोंडीची माहिती वाहनचालकांना आधीच्या चौकातच मिळेल. ‘ या यंत्रणेमुळे शहरातील कोंडी कंट्रोल करण्यास मदत होईल, विशेष म्हणजे ही सर्व यंत्रणा सौर ऊर्जेवर चालेल.’ असं सुकुमार सांगतो. ग्रीन अॅण्ड क्लीन एनर्जी व्हेईकलकॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणेस्वप्नील येऊतकर व सहकारी२५० किलोग्रॅमपर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेलं हे पर्यावरणस्नेही वाहन आहे. मालवाहू् वाहनांप्रमाणे यातही काही सुविधा देण्यात आल्या आहेत. पायातील ब्रेक निकामी झाल्यास हॅण्डब्रेकचा वापर करता येतो. यात डिस्क ब्रेक, सस्पेन्शन, डिझाईन, सुरक्षा या सर्व बाबींचा विचार केला आहे. अ इलेक्ट्रिक ड्राईव्ह प्रणालीमुळे या वाहनापासून पर्यावरणाला कुठलाही धोका नाही. ‘भााजीपाला, आइस्क्रीम विक्रेत्यांसारख्या छोट्या उद्योगांसाठी हे वाहन उपयोगी आहे’ असं स्वप्नील सांगतो.रोड क्वालिटीएम.एस. रमय्या इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी, बंगळुरूरक्षित रमेश, राघवेंद्र पद्मनाभ, मोहंमद मिथाएखाद्या रस्त्यावर आपण पहिल्यांदाच जातो त्यावेळी तेथील खड्ड्यांमुळे प्रवास नकोसा होतो. भविष्यात त्याच रस्त्यावरून जाण्याची वेळ आली आणि खड्ड्यांची सूचना आपल्याला आधीच मिळाली तर? यापेक्षा मोठा आनंद नाही. ही सोय ‘रमय्या’च्या विद्यार्थ्यांनी केली आहे. मोबाइलच्या आकाराचे यंत्र या विद्यार्थ्यांनी तयार केलं आहे. ते आपल्या कारला बसवल्यास प्रत्येक रस्त्याचा अभ्यास हे यंत्र स्वत: करते. दुसऱ्यांदा या रस्त्यावर वाहन धावू लागताच त्यावरील खड्डे, चांगला रस्ता किती याची सूचना तातडीने मिळते. त्यामुळे असे खडतर मार्ग टाळण्यास मदत होते.सोलर वॉटर हिटिंग सिस्टमकॉलेज आॅफ इंजिनिअरिंग, पुणेनिधी खैनारतुमच्याकडे असलेल्या सोलर वॉटर हिटिंग सिस्टीममध्ये या प्रकल्पांतर्गत सुधारणा केली जाते. होतं काय की गरम पाण्यात आपोआप थंड पाणी पडलं की ते गरम पाणीही थंड होतं. त्यामुळे त्या पाण्याला गरम करण्यासाठी पुन्हा वेगळी ऊर्जा वापरावी लागते. निधीच्या या उपकरणात असा धोका नाही. एकदा गरम झालेलं पाणी पुन्हा थंड होत नाही. यात आपोआप पडणाऱ्या थंड पाण्यालाच गरम केलं जातं. परिणामी ऊर्जाही कमी लागते आणि वेळ वाचतो असं निधी सांगते.
अॅपवाली बाईक ग्रीन टेम्पो खड्डे टाळू यंत्र
By admin | Updated: March 17, 2016 22:12 IST