शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
2
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
3
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
4
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
5
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
6
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
7
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
8
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
9
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
10
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
11
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
12
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
13
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ
14
काँग्रेस-NCPशी आघाडी करून मविआत सामील का झालो?; उद्धव ठाकरेंनी सांगितले मोठे ‘राज’कारण
15
VIDEO: ऑलिम्पिक पदकविजेती मनु भाकरने व्हायोलिनवर वाजवलं भारताचं राष्ट्रगीत, होतंय कौतुक
16
मराठीचा उल्लेख करत भारतीय भाषांबाबत लाल किल्ल्यावरून नरेंद्र मोदींनी केलं मोठं विधान, म्हणाले...
17
एकमेव भारतीय क्रिकेटपटू ज्याने १५ ऑगस्ट रोजी ठोकलंय शतक, कोण आहे तो?
18
डबेवाला बांधवांना २५.५० लाखांत ५०० चौरस फुटांचे घर; CM देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
19
"साहेब मी जिवंत आहे..."; मतदार यादीत ज्याला मृत घोषित केले, तो थेट निवडणूक कार्यालयात पोहचला
20
"... मग त्यासाठी जितेंद्र आव्हाड शरद पवार यांचा निषेध करणार का?"; भाजपाचा खरमरीत सवाल

एका अँपवर दुनिया बदलेल.

By admin | Updated: February 19, 2015 20:49 IST

अमेरिकेतील लास वेगासमध्ये येणार्‍या चिनी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तिथल्या लिंक हॉटेलने चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या वुईचॅटबरोबर एक नावीन्यपूर्ण सुविधा तयार केली.

अमेरिकेतील लास वेगासमध्ये येणार्‍या चिनी पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तिथल्या लिंक हॉटेलने चीनमध्ये लोकप्रिय असलेल्या वुईचॅटबरोबर एक नावीन्यपूर्ण सुविधा तयार केली. तुमच्या फोनवर वुईचॅट असेल तर या हॉटेलमध्ये तुम्ही डोअरलॉक रूम टेंपरेचर, लाइट्सपासून ते अगदी म्युझिक सिस्टिमपर्यंत सर्व गोष्टी वुईचॅट अँपमधून नियंत्रित करू शकता. यू-ट्युबवर याचा एक मस्त व्हिडीओ आहे. पहायला विसरू नका (kwechat linq')  असं सर्च करा.
एवढंच कशाला तुम्हाला कन्नड शिकायची आहे? आता तुम्ही व्हॉट्सअँपवर एक ग्रुप जॉइन करून कन्नड शिकू शकता बंगळुरूच्या कानडी माणसांनीच तयार केलेल्या या ग्रुपचे सभासद बनल्यानंतर तुम्ही एक महिन्यात नाममात्र शुल्क देऊन बेसिक कन्नड शिकू शकता. (www.kannadagottilla.com) प्रिंट आणि टेलिव्हिजनपेक्षाही मोबाइल हे माध्यम आज जास्त भिडणारे आहे. दिवसभरात सामान्य यूजर आपला स्मार्टफोन १५0 पेक्षाही अधिकवेळा चेक करतो. त्यात जर व्हॉट्सअँपसारखे इन्स्टण्ट मेसेजिंगअँप असेल, तर ६ मिनिटांपेक्षा जास्त वेळ आपला मोबाइल चेक न करता आपण राहू शकत नाही. यामुळे फक्त चॅटिंगपुरते र्मयादित न राहता विविध सेवा-सुविधा पुरवण्याचे माध्यम म्हणून या इन्स्टण्ट मेसेजिंग अँप्सचा उपयोग सध्या करण्यात येत आहे. 
आणि येत्या काळात त्याचं स्वरूप आणखीनच बदलणार आहे.
व्हॉॅट्सअँप, लाइन, हाइक यासारखे शब्द आता अगदी छोट्या-छोट्या शहरातही परवलीचे झाले आहेत. सध्या जगभरातल्या व्हॉट्सअँप यूर्जसपैकी  १0 टक्के म्हणजे ७0 लाख यूर्जस भारतात आहेत.  भारतातील यूर्जससाठी व्हॉट्सअँप कायम मोफत असेल असेही व्हॉट्सअँपने गेल्या वर्षी जाहीर केले आहे.
या इन्स्टण्ट मेसेजिंगच्या दुनियेत येत्या काही काळात बरेच बदल येऊ घातले आहेत. तुमच्या-माझ्यासाठी हे  सगळे बदल फार इंन्टरेस्टिंग ठरणार आहेत. 
इन्स्टण्ट मेसेजिंग अँप्स 
व्हॉट्सअँप, बीबीएम, लाइन, हाइक, वुईचॅट, फेसबुक मेसेंजर आणि गूगल हँगाउट हे अँप्स भारतात बर्‍यापैकी प्रचलित आहेत. यापैकी व्हॉट्सअँप तर अगदी डिफॉल्टअँप असल्यासारखे. याशिवाय टेलिग्राम आणि स्नॅपचॅट हे अँप्सदेखील उपलब्ध आहेत. या सगळ्यांपैकी हाइक हे एकमेव भारतीयअँप आहे. स्नॅपचॅट हे अँप नावीन्यपूर्ण आहे. फोटो किंवा व्हिडीओ रेकॉर्ड करा, त्यावर कॅप्शन टाका आणि मित्र-मैत्रिणींना पाठवा अशी स्नॅपचॅटची कल्पना आहे. यातली मजेशीर बाब अशी की, हा फोटो किंवा व्हिडीओ मेसेज तुमचे मित्र फक्त ५-१0 सेंकदच बघू शकतील. त्यानंतर हा मेसेज आपोआप नष्ट होतो.
अर्थात इतर मेसेजिंग अँप्सच्या तुलनेत व्हॉट्सअँपने आपले अँप्लिकेशन अजूनही बर्‍यापैकी साधे-सोपे ठेवले आहे. यूर्जसनी व्हॉट्सअँप मेसेजिंगसाठीच वापरावे, असा त्यामागचा उद्देश आहे. लाइन, वुईचॅट यासारख्यांनी मात्र केवळ मेसेजिंग असा हेतू न ठेवता त्यांच्या अँप्सवरील सेवांचा बर्‍यापैकी विस्तार केला आहे. याचा अर्थ असा की, मेसेजिंगपासून सुरू झालेला या सगळ्या अँप्सचा प्रवास आता विविध सेवा पुरवण्याचे एक प्रभावी माध्यम या दिशेने सुरू झाले आहे.
 
फक्त फॉलो करा.
 आजच्या घडीला जगभरात तब्बल ७0 कोटी लोक व्हॉट्सअँप वापरतात. त्या पाठोपाठ लाइन, वुईचॅट यासारख्या अँप्सचा क्रमांक लागतो. गेल्या वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान बीबीसीने भारतात वुईचॅटवर निवडणुकीला वाहिलेले अकाउण्ट सुरू केले होते. वुईचॅटमध्ये आपल्या फेंण्डलिस्टसोबतच बीबीसीसारख्या ऑफिशिअल अकाउण्टची एक लिस्ट दिसते. हे अकाउण्ट आपण फॉलो केले की, ताज्या घडामोडी आपल्याला ताबडतोब कळतात. लाइन आणि स्नॅपच:टनेदेखील या सुविधा पुरवल्या आहेत. याशिवाय बर्‍याच वृत्तपत्रांनी आणि टीव्ही चॅनेल्सनी व्हॉट्सअँपचा वापर नागरिकांकडून माहिती मिळवण्यासाठीही सुरू केला आहे.
 
इंटरनेट कॉलिंग 
ज्या वेगानं थ्रीजी-फोरजीचा भारतात प्रसार होत आहे त्यातून आता इंटरनेट कॉलिंगचा प्रसार वेगाने होणार हे नक्की. लाइनसारख्या कंपन्या त्यांच्या अँपद्वारे इंटरनेट कॉलिंगची सुविधा बर्‍याच काळापासून देत आहेत. भारतातही वुईचॅट, वायबर, हाइकसारख्या कंपन्यांनी ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. काही दिवसांपूर्वीच्या बातमीनुसार व्हॉट्सअँपने भारतात ही सेवा प्रायोगिक तत्त्वावर काही यूर्जससाठी उपलब्ध करून दिली आहे. या वर्षभरात व्हॉट्सअँप कॉल्स लॉन्च झाल्यास आश्‍चर्य वाटायला नको. सध्यातरी अशा प्रकारच्या कॉलिंगसाठी काहीही शुल्क लागत नाही; पण लाइन अँपचे ज्याप्रकारे १0 देशांमध्ये स्वस्त कॉलिंग प्लॅन्स आहेत तसेच भारतातही भविष्यात व्हायची शक्यता आहे. या सगळ्याचा अर्थ म्हणजे आपल्यासाठी अधिक ऑप्शन्स आणि कमी दर.
 
मोबाइल कॉर्मस 
 फ्लिपकार्ट, स्मॅपडीलसारख्या कंपन्यांनी भारतात शॉपिंगचा अर्थच बदलून टाकला आहे. परंतू, भारतात कॉम्प्युटरपेक्षाही मोबाइलची वाढ वेगाने होत आहे. त्यामुळे खरी संधी आहे. ती मोबाइल कॉर्मसच्या क्षेत्रात. व्हॉट्सअँप, लाइनसारख्या इन्स्टण्ट मेसेजिंग अँपकडे कोट्यवधी यूर्जस आहेत. त्यांचा वापर शॉपिंग सेवा देण्यासाठी केला गेला नाही तर नवलच. याचमुळे लाइनसारखे अँप्स इतर देशात शॉपिंगची सुविधा पुरवतात. यात वेगवेगळे ब्रॅण्ड आपले ऑफिशिअल चॅनल्सना इन्स्टण्ट मेसेजिंग अँपवर आपण ट्विटरप्रमाणे फॉलो करू शकतो. या चॅनल्सद्वारे आपल्याला नवीन उत्पादनं आणि डिल्सचे मेसेज मिळतात. भारतात फ्लिपकार्ट आणि जबाँग या पोर्टल्सचे चॅनेल्स सध्या वुईचॅट आणि लाइन या अँप्सवर उपलब्ध आहेत.
 
मोबाइल पेमेंट  
इन्स्टण्ट मेसेजिंग अँपद्वारे शॉपिंग करणे अधिक सुलभ व्हावं यासाठी या अँप्सनी मोबाइल पेमेण्टची सुविधाही उपलब्ध करून दिली आहे. आपण गूगल प्ले स्टोअरवर एखादे पेटअँप विकत घेण्यासाठी जसा क्रेडिट कार्डचा वापर करता तसं काहीसं या मोबाइल पेमेण्टचं आहे. आपल्या क्रेडिट-डेबीट कार्डची माहिती लाइनसारख्या अँपमध्ये स्टोअर करायची आणि तुम्हाला इन्स्टण्ट मेसेजिंगद्वारे मिळालेली एखादी डिल हवी असल्यास त्या पेमेण्टच्या माहितीचा वापर करायचा असं काहीसं याचं स्वरूप आहे.