शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

..अ‍ॅण्ड, वी आर देअर!

By admin | Updated: January 18, 2017 18:39 IST

फर्स्ट इअरची सायकल सहल. एका आठवड्यात आठशे किलोमीटर सायकलिंग.

 बॅच सुरू होऊन पंधरा मिनिटं झालीयेत..ठिकेय, उरलेला पाऊण तास जमके वर्कआउट करेंगे. ‘लेट कमर्स, बी क्विक! गेट आॅन द सॅडल!’ - रिकी टोमणा मारतोय नेहमीप्रमाणे.माझ्या नेहमीच्या सायकलवर तो दुसरा मुलगा बसलाय..ठिकेय, आज ही कोपऱ्यातली सायकल ट्राय करूया. ‘थ्री टू वन, गो!’याह! ही खरी मजा - असा असावा वर्कआउट! सुस्साट, तुफान! पण असं जोमात पॅडलिंग सुरू केलं की हमखास अलिबागची आठवण येणार. फर्स्ट इअरची सायकल सहल. एका आठवड्यात आठशे किलोमीटर सायकलिंग. असंच तुफान, सुस्साट. समुद्राच्या काठाकाठानं. रणरणत्या उन्हात, रिमझिम पावसात. तशी मजा परत नाही जमली. मात्र आता जिमच्या निमित्तानं ही स्पिनिंग बॅच. डिस्को लाईट्समध्ये. इंग्लिश गाण्यांच्या तालावर. रिकीच्या कॉमेंट्रीसोबत. सुस्साट सायकलिंग.पाचवीतल्या सुटीत आजोबांनी शिकवली सायकल. ते कसल्या मस्त गोष्टी सांगायचे. त्यांनी जगलेल्या लाइव्ह गोष्टी. सायकलवरून कुठे कुठे फिरले होते ते! किती बदल्या झाल्या. गाव-तालुके बदलले, पण आजोबांची सायकल कायमची सोबत. असंच सायकल चालवता चालवता टाइम ट्रॅव्हल करून मागे जाता आलं तर? - पन्नास वर्षं मागे. तरुण यंग आजोबांसोबत सायकल चालवायला. आरशातल्या माझ्या जागी आजोबा असतील. झब्बा, पायजमा, कोट आणि गांधी टोपी घातलेले! वळणावळणाचा उतार आणि रस्त्यावर आम्ही दोघंच. संध्याकाळ. सूर्यास्त. मेडिटेशन म्हणता येईल का असं सायकल चालवण्याला? पण मेडिटेशनमधे असं डोकं नसतं चालवायचं म्हणे. काहीही असो, आपल्याला लै आवडतं सायकलिंग.‘अ‍ॅण्ड... वी आर देअर! वेल डन गाईज, लेट्स स्लो डाउन...’- प्रसाद सांडभोर xprsway@gmail.com

 

छोटीशी गावं. त्यापेक्षा मोठी पण छोटीच शहरं. या शहरात राहणारी जिद्दी मुलं. आपल्या स्वप्नांचा हात धरून संधीच्या शोधात मोठ्या शहरांकडे धावतात. काय देतात ही मोठी शहरं त्यांना, कसं घडवतात-बिघडवतात? आणि जगवतातही..?? - ते अनुभव शेअर करण्याचा हा नवा कट्टा. तुम्ही केलाय असा प्रवास? आपलं छोटंसं गाव, घर सोडून मोठ्या शहरात गेला आहात शिकायला? मोठ्या शहरात? दुसऱ्या राज्यात? परदेशातही? काय शिकवलं या स्थित्यंतरानं तुम्हाला? काय अनुभव आले? कडू-वाईट? हरवणारे-जिंकवणारे? त्या अनुभवांनी तुमची जगण्याची रीत बदलली का? दृष्टिकोन बदलला का? त्या शहरानं आपलं मानलं का तुम्हाला? तुम्ही त्या शहराला? की संपलंच नाही उपरेपण? या साऱ्या अनुभवाविषयी लिहायचंय? तर मग ही एक संधी! लिहा तुमच्या स्थलांतराची गोष्ट. १. लिहून पाठवणार असाल, तर पाकिटावर ‘वन वे तिकीट’ असा उल्लेख करा. सोबत तुमचा फोटो आणि पत्ता-फोन नंबरही जरूर लिहा.. पत्ता- शेवटच्या पानावर, तळाशी. २. ईमेल-  oxygen@lokmat.com