शहरं
Join us  
Trending Stories
1
स्टार फुटबॉलर लिओ मेस्सी पोहोचला 'वनतारा'मध्ये; केली महाआरती, वन्य प्राण्यांमध्येही रमला!
2
मेस्सीची 'वनतारा भेट'! महाआरती, शिवाभिषेक, बाप्पाचरणी नतमस्तक अन् वाघ-सिंहाशी धमाल (Photos)
3
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉने लिलाव सुरू असताना केलेली मोठी चूक, नंतर करावं लागलं 'हे' काम
4
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
5
VIDEO : अनसोल्ड परदेशी खेळाडूसाठी काव्या मारननं पर्समधून १३ कोटी काढले; संजीव गोएंका बघतच राहिले!
6
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
7
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
8
स्मृतिभ्रंशाने त्रस्त असलेल्या महिलेचा क्रिकेटपटू सलीम दुराणी यांची पत्नी असल्याचा दावा
9
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
10
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
11
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
12
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
13
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
14
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
15
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
16
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
17
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
18
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
19
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
Daily Top 2Weekly Top 5

शेतीमार्गावर चालायला सुरुवात केली आणि थेट शेतकरीच झालो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 17:23 IST

काही प्रश्न दिसत होते, त्यांची उत्तरंही स्वत:च शोधू लागलो.

ठळक मुद्देआणि मी पूर्णवेळ शेती करूलागलो.

- श्रीकांत एकुडे, निर्माण 6

एमएससी अॅग्रिकल्चरपर्यंतचं शिक्षण मी अकोल्याच्या पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात पूर्ण केलं.शेतक:याच्या घरातच जन्मलो-वाढलो, तेव्हा शेती आणि शेतक:यांसाठी काहीतरी करायचं या दृष्टिकोनातून कृषी शिक्षणात सहा वर्षे घालवली;पण कृषी शिक्षणातून उत्तम शेतकरी घडवायचे की सरकारच्या कृषी विभागासाठी कर्मचारी घडवायचे, उत्कृष्ट कृषी संशोधक निर्माण करायचे की मार्केट विश्वातील कंपनीचे पगारधारक नोकर तयार करायचे हेच ठरवू न शकलेल्या कृषी शिक्षणप्रणालीप्रमाणोच मीही प्रचंड गोंधळलो होतो. खासकरून कृषी पदवीधारकांना पदवीच्या शिक्षणानंतर अनेक महत्त्वाच्या क्षेत्रत नोकरीच्या संधी उपलब्ध असतात. खासगी कंपनीत पोटापाण्यापुरती नोकरी मिळवण्यासाठी फारशी कसरत करावी लागत नाही; परंतु सरकारी अधिकारी किंवा एखाद्या खासगी कंपनीचा कर्मचारी होऊन मी शेती आणि शेतक:यांचे प्रश्न योग्य प्रकारे समजू शकेन का? प्रश्नांच्या संपूर्ण बाजू अभ्यासून त्यावर शाश्वत उपाययोजना मला शोधता येईल का? त्या उपायांची अंमलबजावणी कशी करायची? त्यासाठी कोणती साधने वापरावी लागतील? अशा प्रश्नांनी मला वेढलेले होते. अशा प्रश्नांची उत्तरे सहा वर्षाचे कृषी शिक्षण घेतल्यानंतर सध्याच्या प्रचलित शिक्षणप्रणालीत मुळीच सापडणार नाहीत, असे ठाम मत तयार झाले आणि निर्माण चळवळीशी फार लवकर संबंध आल्यामुळे महाविद्यालयीन जीवनातील सीजीपीए, टॉपर, रँक, कटऑफ, एमपीएससी, बँकिंग अशा संज्ञामध्ये मी अडकून राहिलो नाही.मी स्वत: शेतक:याचा मुलगा असल्याने मला शेतीच्या प्रश्नांविषयी संपूर्ण माहिती आहे, अशा आविर्भावात मीसुद्धा होतो; परंतु निर्माणमध्ये सहभागी होण्यासाठी अर्ज भरण्यास सुरु वात केली. त्यानंतर अर्जातील प्रश्नांमुळे मला खोलवर विचार करण्यास प्रवृत्त केले. मी स्वत:ला ओळखणं, मला स्वत:ची पूर्ण माहिती असणं, स्वत:ला स्वीकारणं, हे सर्वात मोठं कठीण काम आहे हे जाणवायला लागले. मी काय विचार करतोय? याचं सूक्ष्म निरीक्षण स्वत: करायला लागलो. विचाराला कृतीतून व्यक्त करताना स्वत:ची ओळख होण्यास सुरुवात झाली. त्यातूनच शेती आणि शेतक:यांच्या  प्रश्नांबाबत विविध आयाम तपासण्याचा, समस्यांची कारणो शोधण्याचा खरा अर्थपूर्ण प्रवास सुरू झाला.विषयाच्या कक्षा रुंदावल्या. समस्येचा आवाका समजायला लागला. जागतिक बाजारपेठेचा भारतीय शेतमालाच्या किमतीवर होणारा परिणाम, कृषी निविष्ठांचे झालेले व्यापारीकरण, बियाणो, अवजारे, रासायनिक खते, कीटकनाशके यावर निर्माण झालेली भांडवलदारांची मक्तेदारी आणि यावर शेतक:यांचे वाढवलेले अवलंबित्व, वाढता उत्पादन खर्च, वातावरणातील बदलांमुळे नैसर्गिक आपत्ती, नुकसान भरपाईसाठी कायमस्वरूपी उपाययोजना न करणारी राजकीय व्यवस्था, सरकारचे शेतकरीविरोधी आयात-निर्यात धोरण, हमीभाव ठरवण्याच्या चुकीच्या पद्धती, फक्त उत्पादन वाढवण्याचा आग्रह धरणारी कृषिप्रशासन व्यवस्था, शेती उत्पादन व विक्री यातील असमतोल आणि यामुळे होणारी शेतमालाची नासाडी, महत्त्वाची असणारी परंतु कायम दुर्लक्षित मार्केटिंग व्यवस्था, आवश्यक वस्तू कायद्याच्या नावाखाली शेतक:यांची होणारी पिळवणूक, अल्पभूधारक शेतक:यांची वाढती संख्या, शेतक:यांविषयीची सामाजिक अनास्था अशा अनेक अस्मानी आणि सुलतानी कारणांचा अभ्यास करण्याची इच्छा होऊ लागली.पदव्युत्तर शिक्षण झाल्यानंतर चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत पालकमंत्री इंटर्नशिपच्या माध्यमातून एक वर्ष प्रशासन व्यवस्था समजून घेता आली. इंटर्नशिपच्या माध्यमातून शेतक:यांसाठी शाश्वत विपणन व्यवस्था निर्माण करता येईल का? या दृष्टीने प्रयत्न करण्यात सुरु वात केली; परंतु त्यात असफल झालो. या कालावधीत योजनांच्या अंमलबजावणीची प्रक्रि या शिकता आली. शेतक:यांसाठी करोडो रु पयांच्या योजना, प्रशिक्षण, कार्यशाळा, मार्गदर्शन मेळावे आयोजन अंमलात आणल्यानंतरही शेतकरी सुरक्षित उत्पन्नापासून का वंचित आहे? मोठय़ा कष्टाने पिकवलेल्या शेतमालाची शेतकरी तेवढय़ाच विश्वासाने विक्री का शकत नाही किंवा तशी व्यवस्था निर्माण करणारी योजना आजर्पयत का राबविण्यात आली नाही? कमी खर्चात उत्पादन घेण्यापासून ते त्यांची विक्री करण्याच्या क्षमता शेतक:यांमध्ये विकिसत का करू शकलो नाही? याचाही अभ्यास करण्याची निकड मला जाणवली. 

यातून माझं एक महत्त्वाचं शिक्षण झालं.शेतक:यांना मार्गदर्शन करण्याचा विचारच डोक्यातून बाहेर निघाला आणि मी स्वत: शेतीमार्गावर चालायला सुरु वात केली.सुरु वातीपासूनच शेती करणो निश्चित केले असल्यामुळे पूर्णवेळ शेती करण्याकडे सहजरीत्या वळलो. शेती करत असताना नैसर्गिक जीवन जगणो, आधुनिक पारंपरिक शेती पद्धती यांचा समन्वय साधून शेतीचा उत्पादन खर्च कमी करणो, तसेच जैविक व सेंद्रिय शेती पद्धतीच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने विषमुक्त शेतीकडे वाटचाल सुरू आहे. सोबतच शेतीमालाला उत्पादनखर्च आधारित भाव मिळावा आणि ग्राहकाला योग्य भावात विषमुक्त शेतमाल मिळावा. यासाठी शेतकरी ते ग्राहक अशी शेतमाल विक्र ीची साखळी तयार करून शाश्वत मार्केटिंग व्यवस्था तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी आम्ही माङया भागातील भाजीपाला उत्पादक शेतकरी आणि ग्राहकांसोबत मे आणि जून महिन्यात घरपोहोच भाजीपाला सेवा देण्याचा उपक्र माची सुरु वात केली होती. त्यातून अनेक गोष्टी शिकता आल्या. वस्तू निवडण्याचे स्वातंत्र्य ग्राहकांना हवे आहे. ताजा आणि विषमुक्त भाजीपाला यावर ग्राहकांना प्रशिक्षण देणो आवश्यक आहे. शेतमालाच्या भाववाढीचा अनावश्यक बाहू केला जातोय. वास्तविक ग्राहकांची मासिक-वार्षिक मिळकत आणि अन्नधान्य, खाद्यपदार्थावर होत असलेला त्यांचा नगण्य खर्च यामध्ये असलेली प्रचंड तफावत यावरही प्रकाश टाकणो गरजेचे आहे. यात ग्राहकांना प्रत्यक्ष भेटी देऊन त्यांच्याशी संवाद साधण्याची अत्यंत आवश्यकता जाणवली.ं शेतीप्रश्नाशी माझा भावनिक संबंध जुळला होताच; पण त्याला आता घट्ट मिठी मारता आली. त्या प्रश्नासोबत संघर्ष करताना योग्य कृतींचा ताळेबंद तयार करण्याची सूक्ष्मदृष्टी तर मला मिळाली. त्यासोबतच माङया कामाची उत्पादकता मोजण्याचे कौशल्य मिळाले आणि कामाच्या सकारात्मक-नकारात्मक परिणामांना सामोरे जाण्याचे आणि ते पचवण्याचे मानसिक बळसुद्धा.

निर्माणमध्ये सहभागी व्हायचं आहे?

तरुणांना अर्थपूर्ण जगण्याचा शोध घ्यायला मदत करणा:या निर्माण या उपक्रमाच्या अकराव्या बॅचसाठीची निवडप्रक्रिया सुरू झाली आहे.त्यात सहभागी व्हायची इच्छा असेल तरhttp://nirman.mkcl.orgया संकेतस्थळावरउपलब्ध असलेला अर्ज भरता येईल.अधिक माहितीही याच संकेतस्थळावर मिळू शकेल.