शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांना मोठा दिलासा! 'ट्रम्पेट' चिन्हाचं 'तुतारी' हे मराठी भाषांतर रद्द, निवडणूक आयोगाचा निर्णय
2
Maharashtra Election: "आम्ही फोडणार नाही, पण करेक्ट कार्यक्रम करणार"; सतेज पाटलांचा इशारा
3
देवेंद्र फडणवीसांची स्पष्टोक्ती, मनसे महायुतीत येण्याचा सध्यातरी ‘स्कोप’ नाही
4
कसब्यात हिंदू महासंघाचा मनसे उमेदवाराला पाठिंबा; मतदारसंघात मतांचं गणित बदलणार?
5
जगभरात दिवाळी मोठ्या उत्साहात साजरी, न्यूयॉर्कमधील एम्पायर स्टेट बिल्डिंग दिव्यांनी उजळून निघाली
6
सरवणकरांचं कौतुक, राज ठाकरे, बाळा नांदगावकरांवर टीका; ठाकरे गटाचे उमेदवार काय म्हणाले?
7
भाजपचे सर्वात ज्येष्ठ कार्यकर्ते भुलाई भाई यांचे निधन; वयाच्या 111 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
मराठीसाठी लढणाऱ्या पक्षाचे ६ नगरसेवक चोरताना महाराष्ट्रद्रोह नव्हता का?; मनसेचा थेट सवाल
9
मेगा लिलावाआधी प्रीतीच्या PBKS नं केली १०० कोटींपेक्षा अधिक बचत; कुणाच्या पर्समध्ये किती पैसा?
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'मनोज जरांगेंच्या रुपात भारताला गांधी, आंबेडकर, मौलाना आझाम मिळतील';सज्जाम नोमानी काय म्हणाले?
11
'आम्ही त्यांच्याविरोधात प्रचार करू', नवाब मलिकांच्या उमेदवारीवर आशिष शेलार स्पष्ट बोलले...
12
"विश्वासाने जबाबदारी, सत्ता दिली, पण त्यांच्याकडून दुर्दैवाने गैरफायदा घेतला गेला"
13
तिरुपती बालाजी मंदिरातील सर्व कर्मचारी हिंदू असावेत, नवनियुक्त TTD अध्यक्षांचे मोठे विधान
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेतील अपक्ष अर्ज मागे घेणार का? भाजपा नेते सम्राट महाडिक म्हणाले, ;माघारीचा निर्णय कार्यकर्त्यांशी..."
15
IPL मधील ४ कॅप्टन ज्यांना फ्रँचायझी संघानं दिला 'नारळ'
16
नव्या परिवर्तनाकडे चला..! मनोज जरांगे पाटलांचं मुस्लीम-मराठा-दलित समाजाला आवाहन
17
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
19
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

बाइकवरून पडल्यावर...

By admin | Published: November 17, 2016 5:04 PM

वाटत होतं सैन्यात जावं, पण बाइकवर बसलो, अपघात झाला आणि स्वप्नासह एक पायही गमावला...

- प्रभाकर पाटील

माझ्यावर जी वेळ आली, तशी कुणावर येऊ नये. म्हणून हा अनुभव लिहितो आहे. शहादा शहराच्या जवळ असलेलं माझं गाव सुलतानपूर. वयाच्या बाराव्या वर्षापासून वाटायचं की सैन्यात जावं. लहानपणी सातवीत असतानाच घरचे मला सांगायचे की तू सैनिक हो. वडिलांचं पण स्वप्न तेच होते की, एका तरी मुलानं सैन्यात जावं. जळगावला मी शाळेत होतो, एनसीसीत होतो. जळगावमध्ये घेतल्या जाणाऱ्या मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी व्हायचो. खो-खो, कबड्डी, व्हॉलिबॉल, क्रिकेट शाळेकडून खेळायचो. अभ्यासातही हुशारच होतो. दहावीनंतर मी जळगाव सोडलं अन् शहाद्यात आलो. लोणखेडा येथे अकरावीला प्रवेश घेतला. एनसीसीच्या माळी मॅडम, भालेरावसरांनी सांगितलं होतं की व्यायाम सुरू ठेव. एनसीसीचं प्रमाणपत्र मिळालं. एका नॅशनल ट्रेकिंग कॅम्पसाठी निवडही झाली. सैन्यात जायची इच्छा अधिक तीव्र होत होती. पण एकदा कॉलेजमधून माझ्या मित्रांसोबत बाइकवर घरी जायला निघालो, नेमकं मीच त्याच्याकडून बाइक चालवायला घेतली. आम्ही गप्पा करत घरी जात होतो, कॉलेजपासून ५ कि.मी. अंतरावर दरा फाटा म्हणून एक स्टॉप आहे, तिथं अचानक एक कुत्र्याचं छोटं पिल्लू मोटारसायकलच्या पुढच्या चाकात आलं. मला ते समोरून दिसलंच नाही. मी त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला अन् माझ्याकडून बाइकचा पुढचा ब्रेक दाबला गेला. खूप जोरात पडलो. जबरदस्त मुक्का मार पायाला बसला. तेवढं बरं की माझ्या मागे बसलेला माझा मित्र पंकज त्याने साइडला उडी टाकली. त्याला काहीच लागलं नाही. त्यानं माझ्या पायावरची बाइक उचलून साइडला केली अन् १०८ अ‍ॅम्ब्युलन्सला फोन केला व घरी फोन केले. शहाद्याला मला खासगी रुग्णालयात दाखल केलं. पायाला मोठी दुखापत झाली होती. पुढं नाशिकला दवाखान्यात हलवलं. पायाचं आॅपरेशन करावं लागलं. अनेक उपचार, शस्त्रक्रिया झाल्या. खूप शर्थीचे प्रयत्न केले डॉक्टरांनी. पण शेवटी जीव वाचवण्यासाठी पाय कापावा लागला. या वर्षीच मार्चमधली, महाशिवरात्रीचीच ही गोष्ट. त्या दिवशीच माझ्या पायाचं शेवटचं आॅपरेशन झालं, पाय कापला गेला. पाय तर गेलाच, माझं स्वप्नही कायमचं पुसलं गेलं. वाटलं, वाचलो नसतो तरी बरं झालं असतं यापेक्षा. घरचे पण खूप रडायचे. त्यांचं दु:ख पाहून जे वाटायचं ते मी कुठल्याच शब्दात सांगू शकत नाही. घरच्यांनी, डॉक्टरांनी मला खूप समजावलं. धीर दिला. मीही पुन्हा स्वत:चं आयुष्य नव्यानं सुरू करायचं असं ठरवून घरी आलो. आता गेले काही महिने बरा होतोय. माझा लहान भाऊ माझ्यासाठी मोठा ‘आधार’ आहे. तो म्हणतो, मी आता तुझ्या जागेवर आलो. मी तुझा मोठा भाऊ आहे. त्याचं नाव महेंद्र. तो बारावीला आहे, एनसीसीत आहे. सैन्यात जाण्याची त्याची पण इच्छा आहे. वाटतं की, तो माझं स्वप्न पूर्ण करेल. मी पण घरी बसून आता स्पर्धा परीक्षांची तयारी करतोय. संघर्ष सुरूच आहे. पाय गमावलाय हिंंमत गमावलेली नाही. हे सारं माझी कहाणी सांगायला लिहिलं नाही. मला माझ्या साऱ्या दोस्तांना एकच सांगायचं आहे की, बाइकवर बसण्यापूर्वीच जरा विचार करा. वेगावर नियंत्रण ठेवा. जपून चालवा. हेल्मेट घाला. संकट एका क्षणाचं असतं, अपघात एका क्षणात होतो; पण त्याची किंमत जबर मोजावी लागते. आपल्यालाही, आपल्या घरच्यांनाही. अपघातानं जे माझ्या वाट्याला आलं, ते तुमच्या वाट्याला येऊ देऊ नका. आजही मी वेगात, बुंगाट गाडी चालवणारे तरुण पाहतो, तेव्हा काळीज धडधडतं माझं. मोटारसायकल चालवू नका असं नाही, पण आपलं ध्येय काय, आपण ते कसं जगणार हे कायम डोळ्यांसमोर ठेवा. अपघातानं जी स्वप्न चक्काचूर होतात, त्याची किंमत मी काय वेगळी सांगू आणखी.. तुमचं तसं होऊ नये म्हणून म्हणतो, काळजी घ्या.. प्लीज.

- लेखक सुलतानपूर, नंदुरबार येथील आहेत.

 ‘त्या’ अपघाताची कहाणी..

प्रभाकरचं हे पत्र वाचलंत? बाइक चालवताना तो पडला आणि त्यात त्याचा पाय गमवावा लागला.. जीव वाचला ते महत्त्वाचं.. पण काही दुर्दैवी तर अशा रस्ते अपघातात जीव गमावतात.. रोज आपण अशा बातम्या वर्तमानपत्रात वाचतो.. रस्ते अपघातात बळी जाणाऱ्यांचं प्रमाण या देशात सर्वाधिक आहे.. हेल्मेट न वापरण्यापासून ते अतिवेगात गाडी चालवणं, वाहतुकीचे नियम न पाळणं ते रस्त्यांची दुर्दशा अशी अनेक कारणं यामागे आहेतच.. पण अपघात किती मोठा आघात करतो, एका क्षणात होत्याचं नव्हतं होतं.. तुम्ही गेलाय अशा अनुभवातून? गाडी चालवण्याचं पॅशन, ते त्याच गाडीचा अपघात? बाइकवरचं प्रेम ते त्यामुळे जगण्यावर ओढावलेलं संकट? त्यातून कमावलेली हिंंमत आणि पुन्हा नव्यानं सुरू केलेलं आयुष्य? लिहाल त्या अनुभवाविषयी? त्या अपघाताची कहाणी..

 अंतिम मुदत- २८ नोव्हेंबर २०१६