शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

उकळी फुटल्यावर.. 2

By admin | Updated: January 11, 2017 15:10 IST

कोवळ्या वयातच डसलेलं अनावर शारीरिक आकर्षण मर्यादा ओलांडून पुढे गेलं, तर वाट्याला येणाऱ्या ताणातून मार्ग कसा काढायचा?

कॉलेजातल्या तरुणच नव्हे, शाळेतल्या कच्च्याबच्च्या मुला-मुलींच्या अस्वस्थ सिक्रेट जगात डोकावून पाहणाऱ्या खास अंकाचा पार्ट - 2‘कळतं हो सगळं, पण पटत नाही. मान्य कसं करणार, आमची मुलं अशी वागत असतील?’- गेल्या गुरुवारी आॅक्सिजनचा अंक प्रसिद्ध झाल्यानंतर एका घाबऱ्याघुबऱ्या आईचा फोन आला. त्यांचा प्रश्न होता की, मुलांच्या जगात ‘असं’ काही आहे हे मान्य कसं करणार?मान्य करा अगर करू नका, मुलामुलींच्या आयुष्यात या गोष्टी घडत आहेत, हे वास्तव.‘हे’ चित्र सर्वसमावेशक आहे का? म्हणजे सगळीच मुलं आणि सगळ्याच मुली ‘त्यातल्या’ असतात का? - असेही प्रश्न अनेकांनी विचारले. त्याचं उत्तर अर्थातच ‘नाही’ असं आहे. पण हे खरं, की ही लागण मोठी आहे आणि वाढती आहे.गंभीर आहे, ते हे की या स्वाभाविक वाटणाऱ्या थ्रिलचे ‘परिणाम’ कुणी या मुलांना वेळेवर सांगत नाही आणि आपापली लढाई एकेकट्याने, गुपचूप लढत राहणं.. त्यापायी येणारा असह्य ताण सोसत राहणं आणि हे सगळं आपल्या आईवडिलांपासून, घरापासून लपवत राहण्याचा आटापिटा त्यांच्या वाट्याला येतो.ही मुलं आतून एकेकटी पडत जातात. त्यातून बरेच जण बाहेरही पडतात. काळ हे औषध इथेही लागू पडतंच की! पण मनावर ओरखडे राहतात.जी बाहेर पडू शकत नाहीत, त्यांच्या बाकीच्या आयुष्यावर मोठा परिणाम होतो. तोल हरवतो. त्यातून कुणी गुन्हेगारीच्या चक्रात अडकलं की आयुष्य नको त्या वळणांनी सटकत राहतं. विशेषत: मुलगे. आधीच्या परस्पर संमतीतून चालू झालेली नाती नंतर काही कारणांनी बिनसली की आरोप-प्रत्यारोप सुरू होतात. प्रकरण ब्लॅकमेलिंगपर्यंत पोचतं. दबाव. दडपण. बळजोरी. मग पोलीस. तक्रारी. चौकश्या.- हे असं समजा झालं, तर.. पुढे काय?- या सर्वात कळीच्या प्रश्नाचं उत्तर शोधणारा हा अंक.- आॅक्सिजन टीमसुटायचंय?यातलं काही तुम्हाला माहितीये?तुम्ही काही अनुभवलंय?कधी अडकला आहात, नको त्या गुंत्यात?मदत हवी आहे तुम्हाला त्यातून सुटण्यासाठी?- तर मोकळेपणाने विचारा प्रश्न,शेअर करा तुमचे अनुभव.पुढच्या भागात या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचाप्रयत्न आपण करू!नाव लिहू नका. लिहिलंत तरी ते गुप्त राहील याची खात्री बाळगा.ईमेल :  oxygen@lokmat.com