खरंतर जे आपापलं ‘वेड’ जगतात तेच तरुण असाही एक तारुण्याचा अर्थ काढला जातोच.
मग आजच्या तरुण पिढीचं वेड काय आहे?
कुठकुठली ‘फॅड्स’ जगतोय आजचा तरुण?
याचा एका ऑनलाइन पोर्टलने शोध घेतला. आणि शोधही कसा, तर त्यांनी जगभरातल्या तरुणांना सोशल नेटवर्किगवAल्लन आव्हान केलं होतं की, तुम्ही सांगा तुमचं आजचं सर्वात मोठं फॅड कुठलं आहे ते?
त्यात अनेक तरुण मुलांनी खूप गमतीदार गोष्टी सुचवल्या. सांगितल्या. शेअर केल्या.
त्यातल्याच टॉप फॅडची ही एक यादी.
त्यातल्या ब:याच गोष्टी आपणही जगतोय असं तुम्हाला नक्की वाटेल.
1) गबाळीच स्टाईल
टापटीप रहा, चांगले कपडे घाला, चापूनचोपून भांग पाडा असं कितीही सांगितलं तरी सगळ्यात मोठं सध्याचं फॅड आहे, ते गबाळं राहण्याचं! कसेही राहतात मुलंमुली? मोठ्ठाले ढगळे कपडे, शॉर्ट्स, भलेमोठे गॉगल्स, चटाळेपटाळे कपडे आणि झोले असा लूक म्हणजेच आपली स्टाईल असं अनेकांना वाटतं. या स्टाईलचं सध्याचं नाव आहे, ‘मेसी लूक’ आणि हेच सध्या नंबर वनचं फॅड आहे.
2) सिंगल? सो.??
कॉलेजात गेलं की प्रेमाबिमात पडायचं, मग ब्रेकप, मग दर्देदिल हा प्रवास तसा नेहमीचा! पण सध्या कॉलेजातल्याच काय पण कॉलेज संपून रोजीरोटीच्या चक्करमधे असलेल्यांचाही एकच नारा आहे. आय अॅम सिंगल. मित्रमैत्रिणी चिक्कार पण रिलेशनशिपमधे नाही. हे एक नवंच खूळ आहे, आपण सिंगल आहोत असं अभिमानानं सांगण्याचं, आणि तसं राहण्याचंही! जगून घ्या, कशाला रोनाधोना पाहिजे, असाच हा नवा अॅप्रोच.
3) आहे मी फेमिनिस्ट. मग?
ही आणखी एक गंमत, मुलींनीच सांगितलेली.
त्या म्हणतात कुणी घरकाम सांगितलं, कुणी मुलींसारखं वागवलं की आम्ही खवळतोच. स्वयंपाक, साफसफाई ही कामं तर नाहीच करणार म्हणतो.
का?
तर ही कामं मुलींनीच का करायची, असा आमचा सवाल आहे. त्यामुळे काय वाट्टेल ते होवो, आपण फेमिनिस्ट आहोत म्हणजे आहोत, असं त्यांचं म्हणणं! पण मग याला त्या खूळ का म्हणतात, कारण मुलींसारखं नटणंमुरडणंही आवडतं आणि स्वत:ला फेमिनिस्ट म्हणवणंही!!
4) काय ही ‘लिंगो’?
अरे काय ही भाषा, काय ती व्याकरणाची ऐशीतैशी? असं कुणी म्हणोना का, पण सगळ्यात मोठं खूळ आहे ते भाषेतले शॉर्टफॉर्म वापरण्याचे. जगभरात इंग्रजी लिहिणा:यांनी त्या भाषेचं सध्या जे केलंय, ते अजब आहे.अशी भाषा वापरण्याचं सध्याचं खूळ व्याकरणाच्या पलीकडचं आहे.
5) सेल्फी स्टिक्स
हे खूळ तर काही नवीन नाही आता, सगळ्यांनाच माहिती आहे. पण आता नुस्तं सेल्फी काढणं नव्हे, तर स्टिक वापरून सेल्फी काढणं, ग्रुपी काढणं आणि ते सगळ्यांना पाठवणं हे खूळ अनेकांना वेडंच करतंय!
6) टॅटू आणि पिअर्सिग
े
टॅटू काढणं आणि कुठंकुठं टोचून घेत दागिने घालणं हे सध्याचं आणखी एक खूळ. जगभरात सध्या टॅटूची क्रेझ आहेच.
7) सोशल साइटवर शेअरिंग
आपल्या मनात आलेली प्रत्येक गोष्ट आपण जगाला सांगितलीच पाहिजे असं हे खूळ. अनेक तरुणांनी सांगितलं की, आम्ही बहुतेक सर्वच सोशल साइट्सवर आहोत. त्यामुळे निदान सेल्फी, ग्रुपी टाकणं हा तरी उद्योग रोज चालतोच.
- चिन्मय लेले