शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
Online Shopping Tips : ऑनलाइन खरेदीवर खरोखर सूट मिळते का, कसे ओळखायचे? ध्रुव राठीने सांगितली ट्रिक
3
डोळ्यांसमोर पत्नीवर झाले ४५ वार, तरीही पती गप्प कसा बसला? पोलिसांना संशय आला; तपास करताच मोठा ट्विस्ट निघाला!
4
बॅंक FD विसरुन जाल! Post Office ची ही स्कीम देईल १० वर्षात ४२ लाखांचा फंड, पटापट करा चेक
5
६ लाखांत झेडपी, १० लाखांत मनपा लढवायची तरी कशी?; खर्चाची मर्यादा वाढवण्याची मागणी
6
आर्यन खानने 'बॅड्स ऑफ बॉलिवूड' दिग्दर्शित केलीच नाही? या चर्चांवर मुख्य अभिनेत्री म्हणाली...
7
"H-1B व्हिसा धोरण अन्यायकारक, भारतीय-अमेरिकननी विरोध करावा", शशी थरूरांचे आवाहन
8
चढायला गेले एस्केलेटर बंद पडला, बोलायला गेले टेलीप्रॉम्प्टर बिघडला; UNमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत काय काय घडलं?
9
संतापजनक अन् ह्रदयद्रावक! आधी दगड कोंबला, फेविक्विकने चिटकवले तोंड; १५ दिवसांचं बाळ फेकले जंगलात
10
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
11
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
12
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
13
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
14
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
15
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
16
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
17
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
18
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
19
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
20
हॉटेलमध्ये रंगला हत्येचा थरार! प्रियकरानं आधी प्रेयसीला संपवले, त्यानंतर स्वत:चाही घेतला जीव

सहा अटेम्प्ट दिले आणि मग ठरवलं, आता थांबू !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 16:13 IST

बरेच लोक ‘कोण अधिकारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत’ हे हेरून त्याच्या/तिच्यासोबत ‘कॅलक्युलेटेड लव अफेअर’ करताना दिसतात.

ठळक मुद्देजिथं ‘स्पर्धा’ असते, तिथं ‘ह्युमन एलिमेन्ट’ कमी-कमी होत जातो.

-शर्मिष्ठा  भोसले 

एसआयएसीमध्ये अधिकारीपदी असलेल्या अश्विनी आडिवरेकर यांनी मला गजानन वडजेचा संपर्क दिला होता. त्याला फोन केला, तर म्हणाला, ‘यशोदा डेअरीजवळ ये, मी तिथंच उभा असेन.’ मी पत्ता विचारत पोचले तर तो होताच तिथे. मध्यम उंची, गव्हाळ रंग, डोळ्यांवर स्कॉलरवाला चश्मा आणि चेहर्‍यावर मस्त मोकळं हसू.आम्ही ‘ओल्ड राजेंदर नगर वॉक’ वर निघालो. गजानन आता माझा गाईड होता. कुठली-कुठली ठिकाणं दाखवत त्यांच्याबद्दल बोलत होता अखंड.‘पूर्वी एक काळ होता तेव्हा इंजिनिअरिंगची क्र ेझ होती. मग एमबीएची आली. सध्या स्पर्धा परीक्षांचा बबल आहे हवेत. पण तो 2-3 वर्षात फुटणार! पूर्वी दहावीत गुणवत्तायादी असायची. ती बंद करण्यात आली. मग झळाळतं यश मिळवण्याचं जे ‘सायकॉलॉजिकल क्रेव्हिंग’ हुशार मुलांमध्ये साठून राहायला लागलं, ते त्यांना ‘स्पर्धा परीक्षा’ या प्रकाराकडे खेचून आणतंय असं वाटतं. स्वतर्‍च्या क्षमता पुरेपूर जोखण्याची, त्या जगाला दाखवण्याची संधी ही परीक्षा देते. ती संधी एक तरु ण म्हणून घेतलीच पाहिजे. पण एक महत्त्वाचं कळलं पाहिजे, ‘कुठं थांबायचं!’ तयारीला कितव्या वर्षी सुरुवात करायची हे सतत सांगितलं जातं. पण कितव्या वर्षी थांबायचं त्याचं काय? पोरगा आपला अटेम्प्टवर अटेम्प्ट देत राहतो. ‘आता केलेला अभ्यास वाया जाईल, एवढा एकच शेवटचा प्रयत्न करू’ या मोहाला बळी पडतो. शिवाय ‘ग्रेसफुल एक्झीट’ घेण्याची संधी तरी कुठं असते? त्यानं स्पर्धापरीक्षा सोडली तर भोवतालचे लोक त्याला सतत चिडवत-डिवचत राहणार. बरं चल आपण चहा घेऊ. मी माझीपण गोष्ट सांगतो तुला,’ असं म्हणत गजानन मला चहा प्यायला घेऊन गेला. गजानननं 2011-12 साली स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. तोवर बी.ई. झालेलं होतं. घरी अडचणी होत्या म्हणून पाचेक र्वष नोकरी केली. त्यातला वर्षभर अमेरिकेतही होता. या काळात भाऊ-बहिणी यांचं शिक्षण-लग्नं-नोकर्‍या असं झालं. मग मात्न डोक्यातला युपीएससीचा किडा स्वस्थ बसू देईना. मुंबईत नोकरी करतानाच एक विकेन्ड क्लास त्याने जॉईन केला होता. तो फ्रॉड निघाला. काही हजाराला बुडाला. पुन्हा सगळी बचत खर्च केली. पहिली प्री दिली 2012 ला. मित्नपण ‘होईल रे तुझं’ असं म्हणत भुलवायचे. 2013 ला अचानक युपीएससीचा सिलॅबसच बदलला. गजाननसकट अनेकांना त्या काळात प्रचंड निराशा आली. त्याच्या एका मित्नाच्या वडिलांनी तर त्यांची शेती विकून त्याला दिल्लीत पाठवलेलं. तो रडायलाच लागला, अशी सगळी कथा.गजानन सांगत होता, ‘ मी सहा अटेम्प्ट दिले, आणि मग ठरवलं, आता थांबू या. तसंही मी सुरुवात केली, तेव्हा वयोमर्यादेनुसार तितकेच अटेम्प्ट उरले होते. सध्या मी एका एनजीओमध्ये नोकरी करतो शिवाय ऑनलाइन टेस्ट सिरीजचे पेपर भारतभरातल्या मुलांना तपासून देतो. माझं छान चाललंय.’स्पर्धा परीक्षांसाठी क्वालिफाय न झालेले अनेक जण बॅँकिंग, एलआयसी, तलाठी अशा सगळ्या परीक्षा देत राहतात. तिथंही अपयश आलं, तर त्यांचा आत्मविश्वास पारच ढासळतो. घरी जाऊन पुन्हा शेती, व्यवसाय यांत मन लागत नाही. पुन्हा लग्नाचाही प्रश्न असतोच. इथं येणार्‍या अनेकांच्या प्रसंगी जोडय़ाही जुळतात, असं गजानन मिश्कील हसत सांगत होता. रॅन्क मिळवून किंवा न मिळवताही लग्न करून गावी जाणारे बरेच आहेत. बरेच लोक ‘कोण अधिकारी होण्याचे चान्सेस जास्त आहेत’ हे हेरून त्याच्या/तिच्यासोबत ‘कॅलक्युलेटेड लव अफेअर’ करताना दिसतात. गजानन हसून म्हणतो, ‘एकूण सगळी गंमत आहे! इथं एका चिंचोळ्या-अंधार्‍या खोलीत राहणारी बिचारी सात-आठ पोरं आहेत, तसा 3 बीएचकेमध्ये राहणारा ‘बडे बापका बेटा’ही इथेच आहे. कसंय, जिथं ‘स्पर्धा’ असते, तिथं ‘ह्युमन एलिमेन्ट’ कमी-कमी होत जातो. एकमेकांचा हेवा, अस्वस्थता, नैराश्य हे त्याचे साइड इफेक्ट्स! मग पोरं सिगारेट दारूच काय, अगदी चरस-गांजालाही बळी पडतात. इथली अस्वस्थता हेरून माफियांनी सगळं चोरीछुपे उपलब्ध करून दिलंय!’ गजानन आणि आदेश मुळे या दोघांनी iasdelhi.org नावाची वेबसाईट वर्षभरापूर्वी सुरू केलीय. ‘आमचं इथं आल्यावर अनेक प्रकारे खूप शोषण झालं. शोषण सध्याही अटळ आहे. पण आता येणार्‍या नव्या पोरांचं शोषण जरा कमी व्हावं म्हणून आमचा हा प्रयत्न आहे.’ - तो सांगतो, आणि हसताहसता गंभीर होऊन जातो एकदम.**

(...पुढे ? वाचा  उद्या इथेच .. )

क्रमशः भाग 5

( लोकमत  दीपोत्सव  २०१८  दिवाळी  अंकात  "स्वप्नांचे  गॅस  चेंबर" हा लेख  प्रसिद्ध झाला आहे. )