शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

६ थिंकिंग हॅट्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 08:57 IST

आपण चर्चा करतो, पण कामाचं बोलतो का? ते नेमकं, कामाचं आणि प्रभावी कसं बोलता येईल?

- प्रज्ञा शिदोरेpradnya.shidore@gmail.com

तुम्ही एखाद्या गटात काम करत असताना, तुम्हाला असं कधी जाणवलं आहे का, की आपण उगीचच ‘मीटिंग, मीटिंग’ खेळत असतो. एखादं काम जे एका मेलने फत्ते होऊ शकत त्यासाठी लोक भेटतात, आणि मग भेटलोच आहोत तर इतरही काही मुद्दे बोलू म्हणून बोलायला लागतात. मूळ मुद्दा बाजूला राहतो आणि सगळ्यांचाच वेळ मात्र वाया जातो.  कॉर्पोरेट जग जसं वाढत गेलं तसं माणसानं परस्परांशी कसं वागावं, बोलावं यामध्येही बदल झाले; त्यापेक्षाही, माणसाने गटात कसं वागावं, आपली मतं प्रभावीपणे कशी मांडावी, याची एक नवीच विद्याशाखा उदयाला आली. मग लोकं जेव्हा एकत्र बसून एखाद्या गहन विषयावर चर्चा करत असतील, एखाद्या समस्येवर उपाय शोधात असतील तेव्हा ते कशा प्रकारे एकमेकांशी बोलले तर त्यांची ती चर्चा कशी प्रभावी होऊ शकते, ते योग्य निर्णयापर्यंत कसे येऊ शकतात या सर्व पद्धतीला एडवर्ड डी बोनोची ‘६ थिंकिंग हॅट्स’ पद्धत म्हटलं जातं. बोनोने १९८५  साली याविषयी पुस्तक लिहिलं आणि त्याला आजही व्यवस्थापनशास्त्रातील सर्वोत्तम पुस्तकांमध्ये गणलं जातं.     विचारांना आणि अर्थातच त्यामुळे चर्चेला योग्य दिशा मिळावी यासाठी ही थिंकिंग हॅट्सची पद्धत. प्रत्येक हॅट किंवा टोपीला विचारांची एक पद्धत किंवा दिशा मानलं गेलं आहे. गटामध्ये चर्चा करत असताना आपण प्रत्यक्ष अशा सहा रंगांच्या टोप्या घालायच्या आणि आपलं मत मांडायचं. अशा टोप्या घालणं विनोदी वाटत असेल तर आपलं म्हणणं हे कशाच्या पार्श्वभूमीवर आहे याची मांडणी करूनच मग बोलायला लागायचं. विचारांच्या या सहा दिशा म्हणजे - माहितीपर, विषयाची पार्श्वभूमी, त्याबद्दलच्या भावना, काळजी करण्याची कारणं, विषयाची चांगली बाजू, विषयाकडे कल्पकतेने बघणं या पद्धतीने विचार केला तर आपल्या मेंदूला योग्य अशी चालना मिळते आणि प्रश्न लवकर सुटतात असा अनुभव आहे. अनेक मॅनेजर्सच्या मते अशा पद्धतीमळे वेळ वाया जात नाही आणि चर्चा मुद्देसूद होते, चर्चेतून निष्पन्नही चांगलं होतं. लहान लहान गटामध्ये चर्चा सोप्या व्हाव्यात यासाठी ही पद्धत कशी वापराल हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा.आणि अधिक माहितीसाठी गुगल करून पाहा. ६ थिकिंग हॅट्सhttps://www.youtube.com/watch?v=QJmoq1R3KVc