- मयूर देवकर
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांना केवळ आपल्याच देशाची नाही तर जगभराची चिंता करावी लागते ! मग अशा सुपरबिझी माणसाला स्वत:साठी वेळ तरी कसा मिळतो? मावळते रष्ट्राध्यक्ष ओबामा रात्री उशिराचा वेळ स्वत:साठी राखून ठेवतात. त्यावेळी ते काय करतात, त्यांच्या लेट नाईट सवयी काय आहेत याबद्दल त्यांच्या सहकाºयांनी दिलेली ही माहिती. येत्या सहा महिन्यात त्यांचा राष्ट्रध्यक्ष म्हणून कार्यकाळ संपणार आहे. एका नावाजलेल्या ब्रिटिश वृत्त वेबसाईटने केलेल्या सर्व्हेक्षणानुसार जगभरात ओबामा आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत.
१. रात्रपाळीचा माणूस
ओबामा रात्री उशिरापर्यंत आपल्या आॅफिसमध्ये बसून काम करत असतात. संशोधनातून असे दिसून आले की, तुम्ही जेव्हा थकलेला असता तेव्हा तुमची सृजनशीलता (क्रिएटिव्हिटी) सर्वाधिक सक्रीय असते.
२. बदाम खाओ!
रोज रात्री ओबामा सात खारट बदाम खातात. ना एक जास्त, ना एक कमी. यातून त्यांना ४३ कॅलरी, ४ ग्रॅम फॅट, १० मिलीग्रॅम सोडियम आणि १.५ ग्रॅम प्रोटिन मिळते.
३. खेळ पाहतात.
रात्री उशिरा काम करताना ते टीव्हीवर नेहमी खेळांचे चॅनेल लावून ठेवतात. दुसºयाला पळताना आपल्याच हृदयाची धडधड, श्वासोच्छवास, रक्तप्रवाह वाढतो जणूकाही आपण स्वत:च पळत आहोत. कादाचित यामुळेच ते खेळ पाहत असावेत.
४. केवळ पाच तास झोप
ते रात्री २ दोन वाजता झोपून ते सकाळी ७ वाजता उठतात. म्हणजे झोप केवळ पाच तासांची. परंतु नॅशनल स्लीप फाउंडेशनच्या मार्गदर्शकतत्त्वानुसार सहा तासांपेक्षा कमी झोप आरोग्यासाठी घातक आहे. त्यामुळे तल्लखपणा कमी होतो, स्मरणशक्तीची झीज होते (राष्ट्राध्यक्षासाठी दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या) आणि लैंगिक इच्छादेखील कमी होते (नो कॉमेंट!).
५. डोकेबाज
ओबामा रात्री उशिरा त्यांच्या आयपॅडवर ‘वर्डस् वुईथ फ्रेंडस्’ नावाचा शब्दखेळ खेळतात. यामुळे मेंदूचा व्यायाम होतो. पुरेशा बे्रन अॅक्टिव्हिटीमुळे अल्झायमर्सपासून बचाव होऊ शकतो.
६. कॉफी न पिणं
ते शक्यतो कॉफी पिण्याचे टाळतात. कॉफीऐवजी ते पाणी पिण्यावर अधिक भर देतात.