शहरं
Join us  
Trending Stories
1
"सरकार झुकणार नाही, सोशल मीडियावरील बंदी हटणार नाही..."; काय म्हणाले नेपाळचे पंतप्रधान केपी ओली?
2
नेपाळमध्ये Gen-Z आंदोलन, 19 जणांचा मृत्यू, नैतिक जबाबदारी घेत गृहमंत्र्यांचा राजीनामा; आता PM ओलींवर दबाव!
3
भीतीपोटी खैरात वाटतायेत...! नितीश कुमारांच्या घोषणांवरून प्रशांत किशोर यांचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले...
4
कोठारीत थरार...! पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या; मानसिक आजारातून घडली घटना
5
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
6
याला म्हणतात 'पैसा ही पैसा'...! १ लाखाचे झाले १२ कोटी, फक्त ₹१५ च्या शेअरनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल; तुमच्याकडे आहे का?
7
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
8
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
9
हुंडाबळीच्या खटल्यात पती, सासूला सक्तमजुरी; १५ वर्षांची शिक्षा
10
सराईत गुन्हेगारांची टाेळी; पाच जणांविराेधात मकोका, लातूर पाेलिसांचा दणका
11
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
12
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
13
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
14
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
15
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
16
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
17
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
18
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
19
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
20
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?

करिअरच्या वाटेवरचे ५ सिग्नल

By admin | Updated: April 28, 2016 13:51 IST

मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. एक खूप श्रीमंत माणूस असतो. त्याचा एक साधारण परिस्थितीतला मित्र असतो. श्रीमंत माणूस आपल्याच कामात, आपल्या नादात असतो. या गरीब मित्राकडे बघण्याची फारशी वेळही त्याच्यावर येत नाही की तशी गरजही पडत नाही

- डॉ. श्रुती पानसे( लेखिका मेंदू आणि शिक्षण या विषयातील संशोधिका आहेत.)

करिअर म्हणजे फक्त उत्तम नोकरी,भरपूर पैसा, प्रमोशन, पोझिशन नव्हे.यशस्वी करिअर आणि आनंदी जगण्यासाठीआणखीही काही गोष्टी महत्त्वाच्या असतात.त्या चुकल्या तर करिअरची गाडी पंक्चर होणारच!मध्यंतरी एक गोष्ट वाचली होती. एक खूप श्रीमंत माणूस असतो. त्याचा एक साधारण परिस्थितीतला मित्र असतो. श्रीमंत माणूस आपल्याच कामात, आपल्या नादात असतो. या गरीब मित्राकडे बघण्याची फारशी वेळही त्याच्यावर येत नाही की तशी गरजही पडत नाही. त्यामुळे त्याच्याशी असलेले संबंध वाढवण्यात त्याला काही रस नसतो. एकदा श्रीमंत माणसाचं अचानक मोठं नुकसान होतं. त्याच्याकडे अजिबातच पैसे नसतात. तेव्हा हा गरीब मित्र आपल्या साठलेल्या पैशातून त्याचे पैसे फेडतो.

अशा अर्थाची ही गोष्ट आहे. साधीशीच. वाचताना वाटतं मैत्रीची महानता वगैरे ही गोष्ट सांगते.ते सारं तर या गोष्टीत आहेच पण तुम्ही म्हणाल या गोष्टीचा करिअरशी आणि करिअर निवडीशी काय संबंध आहे?संबंध आहे तो असा की, आपण आपली माणसं करिअरच्या वाटेवर कशी जपतो, त्यांना सोबत घेऊन कसं चालतो, आपण जेव्हा प्रगती करत असतो तेव्हा ‘आपल्या’ माणसांशी कसं वागतो हे सारं फार महत्त्वाचं आहे. त्यामुळे करिअरचे निर्णय घेताना, एखादी वाट, एखादी दिशा पक्की करताना, आपल्या स्वप्नाच्या मागे धावताना आणखी काही गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत, नव्हे त्या आपण लक्षातच ठेवायला पाहिजेत.नाही तर गुणवत्ता, मेहनत सारं काही उत्तम असूनही अनेक माणसांचं करिअर डळमळीत असतं.कारण त्यासोबत जपायच्या, करायच्या छोट्या पण महत्त्वाच्या गोष्टी त्यांना माहिती नसतात.त्यासाठी स्वत:च्या करिअरच्या वाटेवर हे लक्षात ठेवा..१. निर्णय घ्या, पण जपून!करिअर आणि त्याला जोडून येणारी पैशांची उपलब्धता ही गोष्ट जगण्यासाठी फार आवश्यक असते. प्रत्येकाला पैसा कमवायचा असतो, तसंच आपल्याकडचा पैसा वाढावा असंही वाटत असतं. त्यासाठी आपण पैसे फिक्स डिपॉझिटमध्ये टाकतो. शेअर्समध्ये पैसे गुंतवतो. सोनं घेऊन ठेवतो. जागा घेतो. हे सारं आणि पैसे तर तुम्ही कमवालच, पण त्यासाठी आपण नक्की काय मार्ग निवडतो हेही तितकंच महत्त्वाचं आहे. परदेशी जाऊन जास्त पैसा मिळतो, या कारणासाठी घाईघाईने, कोणत्यातरी एजंटमार्फत, योग्य शहानिशा न करता परदेशी वाटेवर जाणं हे खूपच चुकीचं आहे. म्हणून स्वत: घेतलेल्या निर्णयांविषयी अधिक जबाबदार व्हा. वाटलं म्हणून, मित्र म्हणतात म्हणून नव्हे, तर विचारपूर्वक निर्णय घ्या. आणि मुख्य म्हणजे त्या निर्णयांची जबाबदारीही घ्या.२. भांडवल जपावं आणि वाढवावंआर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हा. दीर्घकालीन मुदतीत गुंतवणूक करा. भांडवल हे बीज आहे असं लक्षात घ्या. ते तसंच ठेवलं तर त्यापासून काहीही उगवणार नाही. तुम्ही ते रु जवा. त्यासाठी मेहनत करा. खतपाणी घाला. ते वाढवायला शिका. नव्या, सुरक्षित गोष्टींमध्ये पैसे गुंतवा. छोटी रक्कम असो वा मोठी, ती बाजूला पडेल हे बघा. हे जसं पैशाचं तसंच गुणवत्तेचंही. आपली गुणवत्ताही नुस्ती पडून राहिली तर यशाचे अंकुर फुटत नाहीत. त्यामुळे ती वाढीस लागेल याचीही काळजी घ्या.३. नो इम्प्रेशन मारू धोरणइम्प्रेशन पॉलिसी काही काळच उपयोगी पडते. इतरांवर चकचकीत इम्प्रेशन मारण्याच्या नादात चुकीच्या गोष्टी करत बसू नका. तुम्ही जसे आहात तसेच राहा. उगाचच वेगळी इमेज तयार करण्याच्या फंदात पडू नका. आजकाल याचं मोहजाल फार मोठं आहे आणि ते ठिकठिकाणी पसरवलेलं असतं. याहूनही महत्त्वाची गोष्ट अशी की इतरांची इम्प्रेशन पॉलिसी वेळीच ओळखा. आणि इम्प्रेशन मारू नका, इम्प्रेशनला भुलू नका.४. काळजी घ्या स्वत:ची!प्रत्येकालाच छानशा विश्रांतीची गरज असते. सकाळी जेव्हा दिवसाचं नियोजन कराल तेव्हाच ब्रेक कधी घ्यायचा हे ठरवून ठेवा. दिवसभर काम उपसण्याच्या नादात स्वत:कडून फार ओझी वाहण्याची अपेक्षा करू नका. हातून चांगलं काम होण्यासाठी स्वत:ला उत्साहाचे डोस अधूनमधून द्यावे लागतात. अधूनमधून छोट्या सुट्या घ्याव्यात. काही मिनिटांचे ब्रेक्स तरी नक्कीच घ्यावेत. हवं ते म्युझिक ऐकलं तर आपलाच उत्साह वाढेल. एखादं छानसं पुस्तक वाचणं, सिनेमा बघणं यामुळे आपल्याला आपल्या कामाव्यतिरिक्तही एक जग आहे याची जाणीव होईल. त्यातून आनंदच मिळतो. रिलॅक्स करणारे हे ब्रेक्स एखाद्या मोटिव्हेशनल ब्रेकसारखेच असतात. ५. उद्या उगवणार आहेच..एखादी गोष्ट मनासारखी किंवा ठरवल्याप्रमाणे झाली नाही तर दुसरा प्लॅन तयार ठेवा. जर तुमचा एखादा निर्णय चुकला तरी चूक लक्षात घेऊन पुढे चला. प्रत्येकाकडून चुका होत असतात. फक्त तीच चूक पुन्हा होत नाहीये ना हे बघा. जर तसं झालंच तर त्यातूनही शिका. स्वत:ला समजवा. स्वत:ला सूचना द्या. या जगात फार पुढच्या गोष्टी कोणालाही माहीत नसतात. त्यामुळेच कायम अनिश्चितता असतेच. ती स्वीकाराल तेव्हाच ‘कॅप्टन कूल’ होता येईल. वाटेत जे जे काही येईल त्या अडचणींवर मात करायची आहे. अडचणी येणारच आहेत. भूतकाळ कवटाळून ठेवू नका. वर्तमानकाळाची मजा घ्या. उद्याचा दिवस हाताशी आहेच!