शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

२५ मिनिटं शांतता

By admin | Updated: March 1, 2017 13:40 IST

अठरा.. एकोणीस.. वीस... बरोब्बर वीस पावलं झाली सरांनी सांगितलं तशी. आता? सांगितलंय तसं ‘तीन टाळ्या वाजेपर्यंत पंचवीस मिनिटं शांतता अनुभवायची. बाहेरची आणि आतली’ बघूया कसं किती जमतंय ते!

- प्रसाद सांडभोर
 
अठरा.. एकोणीस.. वीस... बरोब्बर वीस पावलं झाली सरांनी सांगितलं तशी.  आता? सांगितलंय तसं ‘तीन टाळ्या वाजेपर्यंत पंचवीस मिनिटं शांतता अनुभवायची. बाहेरची आणि आतली’ बघूया कसं किती जमतंय ते!बाहेरून दाट वाटली होती ही झाडी, पण इथे उभं राहून अगदी मोकळं मोकळं वाटतंय रान. कसला आवाज होता तो? दिसत तर नाहीये काही अंधारात. सरांनी गॅरंटी दिलीय की इथे जंगली प्राणी नाहीयेत. कोल्हा, बिबट्या वगैरे नसेल. कुत्रा असता तर भुंकला असता. कदाचित झाडाची फांदी पडली असेल... श्या! केवढे विचार डोक्यात!बास आता - एक, दोन, तीन- शांत.खाली बसावं का जरा? पालापाचोळा आहे - त्यात काही असेल? साप, मुंगळे, मुंग्या? नको - उभंच राहूया. कपडेपण खराब होतील. अरेच्चा! ...पुन्हा तेच - शांत रहायचंय. मनात काही विचार नको. सर असते सूचना द्यायला तर बरं होतं राव. सोप्प झालं असतं. हे वरचं झाड - निलगिरी आहे का? काय माहीत! - वर कसलं किती भारी दिसतंय. सगळ्या बाजूंनी झाडांची टोकं आणि मधे गडद निळं आकाश. झाडांची टोकं तेवढी हलताहेत मधून मधून. त्या टोकांवर बसून वाऱ्यासोबत डुलायला कसलं भारी वाटेल ना. शेजारून विमानं जातील, तारे पडतील. वरून खालचं सगळं कसं बरं दिसत असेल? पक्षी किंवा खार नाहीतर माकडांनाच माहीत! आत्ता कुणी वर असतील तर म्हणत असतील, हा कोण वेडोबा, असा वर पाहतोय! माझ्या डोक्यातले आवाज ऐकू जात असतील का त्यांना?डोक्यात चाललंय तितकंच काय ते ध्वनिप्रदूषण. बाकी सगळं शांत आहे.- डोळे. कान. त्वचा. जिभ.तीन टाळ्या वाजल्या? संपली वेळ? पंचवीस मिनिटं? इतक्या लवकर? श्या! आत्ता कुठे जमायला लागलं होतं यार ... sandbhorprasad@gmail.com