शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
6
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
7
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
8
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
9
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
10
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
11
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
12
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
13
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
14
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
15
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
16
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
17
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
18
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
19
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
20
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज

बलदंड चीनच्या सत्तेसमोर उभा ठाकला 22 वर्षाचा हॉँगकॉँगचा तरुण!

By meghana.dhoke | Updated: December 19, 2019 06:55 IST

सत्तेच्या गुर्मीशी लढत लोकशाही हक्कासाठी लढणार्‍या हॉँगकॉँगच्या तरुण आंदोलकांचा चेहरा.

ठळक मुद्देया आंदोलनाने हाँगकाँगला राजकीय नेतृत्व मिळवून दिलं आहे. अनेक तरु ण आंदोलनाचे चेहरा बनले आहेत.

-मेघना  ढोके / कलीम  अजीम ¸

 ‘आय अ‍ॅम फ्रॉम हॉँगकॉँग, नॉट चायना’ असे फलक जगभरात पसरलेले हॉँगकॉँगचे तरुण-तरुणी सध्या हातात घेत आहेत. तसं लिहिलेले शर्ट घालून फिरत आहेत. हॉँगकॉँगच्या तरुण आंदोलकांनी गेल्या सात-आठ महिन्यांपासून चीनच्या वर्चस्ववादाला प्रखर विरोध सुरू केला आहे. जागतिक मीडियाने या आंदोलनाला गेल्या 30 वर्षातलं सर्वात मोठं आंदोलन म्हटलं आहे. हॉँगकॉँगमध्ये हजारो तरुण मुलं-मुली रस्त्यावर उतरून स्वातंत्र्य आणि लोकशाही अधिकारांसाठी निदर्शनं करत आहेत. त्या प्रचंड मोठय़ा लढय़ाचा चेहरा बनलाय एक जेमतेम 23 वर्षाचा, बारकुडासा मुलगा. त्या मुलाच्या शांत चेहर्‍याकडे पाहून असं वाटतही नाही की एका महासत्तेच्या ताकदीला आव्हान देण्याचं बळ या कोवळ्या तरुणात असेल?मात्र तरीही  जगभर त्याच्या  हिमतीचीही चर्चा आहे. ‘ द फेस ऑफ द प्रोटेस्ट’- आंदोलनाचा चेहरा म्हणून तो जगभर गाजतो आहे.त्याचं नाव जोशुआ वांग. हा फक्त 22 वर्षाचा तरुण आहे. एका साध्याशा मध्यमवर्गीय घरात तो वाढला. त्याचे वडील आयटीत नोकरी करायचे, तर आई वंचित मुलांना सेवासुविधा मिळाव्यात म्हणून काम करायची.2019 र्पयत जोशुआचंही आयुष्य एकदम चारचौघांसारखंच नाकासमोर चाललं होतं. शाळेतही तो जेमतेम हुशार होता. कारण त्याला डिसलेक्सिया या आजाराचा त्रास होता. मात्र 2010 साली त्यानं पहिल्यांदा लोकशाही आंदोलनात सहभाग घेतला. 2014 मध्ये हे आंदोलन अधिक तीव्र झालं आणि एक मोठी चळवळ उभी राहिली. तिचं नाव अम्ब्रेला मुव्हमेण्ट. या चळवळीत जवळपास दोन महिने पूर्ण शहर ठप्प झालं होतं. त्या चळवळीचं नेतृत्वच जोशुआनं केलं. तेव्हा तो जेमतेम 19 वर्षाचाही नव्हता. मात्र त्याच्या नेतृत्वगुणाची चर्चा झाली. आणि जगप्रसिद्ध टाइम मॅगझिनच्या टीन्स स्पेशल मुखपृष्ठावर तो पर्सन ऑफ द इअर म्हणून झळकला.

म्हणता म्हणता हॉँगकॉँगच्या लोकशाही आणि स्वायत्ततेसाठीच्या लढय़ाचा तो चेहरा बनत गेला.  2017 साली त्याला अटक झाली. खटला दाखल होऊन शिक्षाही झाली. मात्र 2018 ला त्याची मुक्तताही करण्यात आली.चीनचं सरकार वादग्रस्त प्रत्यार्पण विधेयक हॉंगकाँगवासीयांवर लागू करू पाहत होतं.  या विधेयकामुळे चीनमध्ये गुन्हे करून हाँगकाँगला फरार झालेल्या नागरिकांना  ताब्यात घेण्याचा अधिकार चीनला प्रदान करण्यात आला होता. अर्थात यातून हाँगकाँगवर दमण व छळाचे नवे तंत्र वापरण्याची मुभा चीनला मिळणार होती. चीनचा हा डाव लाखो तरु णांनी हाणून पाडला.अजूनही जोशुआचा लढा सुरूच आहे. हॉँगकॉँग लोकशाही हक्कासाठी भांडत आहे आणि त्या लढय़ाचा चेहरा ठरला आहे जोशुआ वांग. वय वर्षे फक्त 22.मात्र त्याची जिगर मोठी आहे.

तरु णांनी हे आंदोलन आता ताब्यात घेतले आहे. आंदोलकांनी अनेक ठिकाणी जाळपोळ करून चीनला हॉँगकॉँगमधून निघून जाण्याचा इशारा दिला आहे. चीन हे आंदोलन चिरडून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. परंतु त्याला न जुमानता हाँगकाँगवासीयांनी आंदोलन सुरू ठेवले आहे. या आंदोलनाने हाँगकाँगला राजकीय नेतृत्व मिळवून दिलं आहे. अनेक तरु ण आंदोलनाचे चेहरा बनले आहेत. भविष्यात प्रदेशाच्या सत्तेची सूत्रं हातात घेऊन ते लोकशाही सत्ता स्थापन करतील, अशी अपेक्षा आहे.