शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
3
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
4
देशपांडे लैय भारी! तुषारने पहिल्याच षटकात PBKS च्या स्टार फलंदाजांचे उडवले त्रिफळे, Video 
5
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
6
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
7
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
8
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
9
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
10
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
11
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
12
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
13
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
14
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
15
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
16
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
17
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
18
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
19
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
20
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'

2020 - तुम्ही 20 वर्षाचे होतात, तेव्हाच्या ‘स्वत:’ला आज काय सांगाल?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 09, 2020 8:00 AM

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?

- ऑक्सिजन टीम

2020. टुझिरोटुझिरो हे वर्ष उजाडलं. या आकडय़ाला गेली अनेक वर्षे तरुण भारतीयांच्या मनात एक वेगळं स्थान होतं.डॉ. कलामांनी रुजवलेलं इंडिया 2020चं स्वप्न अनेक चेतलेल्या मनांना त्यावेळी खरंही वाटलं होतं.त्या दिशेनं या देशानं काही पावलं पुढे वाटचाल केली आणि काही बाबतीत मात्र आपण अनेक पावलं मागे सरकलो असं आवतीभोवतीचं आजचं वास्तव आहे.तरुणांच्या आंदोलनांना देशात धार आलेली आहे, विद्यार्थी रस्त्यावर उतरत न्याय आणि लोकशाही हक्कांसाठी आज भांडत आहेत. या पिढीला  राजकारणातलं साधं ‘डावं-उजवं’ कळत नाही, त्यांना आय-मी-मायसेल्फपलीकडे काही दिसत नाही, असे आरोप ज्यांच्यावर होत होते त्यापैकीच काही तरुण मुलं आज रस्त्यावर बेडरपणे उभी आहेत. व्यवस्थेला आव्हान देण्याची ही ताकद विशीतल्या मनगटांत सहज दिसते आणि ती सहजी वाकत नाही, वाकवता येत नाही हे ही तितकंच खरं आहे.त्यामुळे विशी-पंचविशीच्या टप्प्यावरून पुढं सरकलं जगणं, आणि कितीही यशस्वी झालं, तरी मनातल्या एखाद्या कोपर्‍यात एक फॅण्टसी कायम राहाते की, आपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?आपणच आपल्याला परत त्या विशीच्या उंबरठय़ावर भेटलो तर?-तर काय होईल?आपलीच आपल्याला ओळख पटेल? विशीतल्या आपल्याच ‘कोवळ्या’ रूपाला आपलं चाळिशीच्या टप्प्यावरचं किंवा त्याही पुढच्या वाटेवरचं ‘पक्व’पण काही सांगू शकेल? जुने दोस्त भेटल्यावर मारतात तशा  गप्पा मारता येतील की रागच येईल स्वतर्‍चा? आपण विशीतच फार भारी होतो, आता आपण फार सुस्त झालो असं तर वाटणार नाही? अनुभवातून कमावलेल्या काही गोष्टी सांगता येतील की राहून गेलेल्या गोष्टी आता तरी कर, शहाणपणानं वाग, असा सल्ला देता येईल?- असे अनेक प्रश्न होते.ते प्रश्न आम्ही विविध क्षेत्रातल्या जाणकारांसमोर ठेवले. त्यांना विचारलं की, आज म्हणजे अगदी चालू वर्तमानकाळात तुम्हीच वीस र्वष वयाच्या तुम्हालाच भेटलात तर काय सांगाल स्वतर्‍ला.?- हा एका ओळीचा प्रश्न वरकरणी सरळ, साधा अगदी बॅटवर सहज येणारा चेंडू वाटतो. प्रत्यक्षात तो चकवतो.त्यामुळेच राजकारण-समाजकारण ते क्रीडा, अभिनय-लेखक-कलावंत या सार्‍यांनीच हा प्रश्न आपापल्या पद्धतीने खेळून काढला. काहीजणांना तो खरंच फुलटॉस वाटला, तर काहींनी फक्त चेंडू सोडून दिला. काहींसाठी गुगली होता, तर काहींना बाउन्सर वाटला.वाटो काहीही, या विशीतल्या कल्पनेतल्या पीचवर उतरून खेळणं मात्र सार्‍यांनीच एन्जॉय केलं.विविध क्षेत्रातल्या नामवंतांशी या गप्पा रंगल्या, ज्यांच्याकडे ज्ञानाची, अनुभवाची शिदोरी आहे त्यांनी विशीतल्याच स्वतर्‍शी ‘संवाद’ साधला.या गप्पा म्हणूनच रंगल्या कारण त्यात उपदेश नाही, तर करून बघ असं म्हणणारं प्रेमळ शेअरिंग आहे. आणि त्या वयात अनेक गोष्टी राहून गेल्याची चुटपुटही आहे.सगळ्यांशी बोलताना एक गोष्ट ‘कॉमन’ होती. ती म्हणजे, अनेकांना वाटत होतं की, विशीत आपल्याकडे भरपूर वेळ होता, त्या वेळेचं आपण अजून काहीतरी धड करायला हवं होतं. अजून काही भाषा शिकून घेतल्या असत्या, अजून काही कला शिकलो असतो, वाचलं असतं खूप, भरपूर प्रवास करून घेतला असता, घरकोंबडेपणा सोडला असता तर बरं झालं असतं.दुसरं म्हणजे आज यशस्वी असलेले हे अनेकजणही सांगतात, की तेव्हा घेतलेले सारेच निर्णय बरोबर होते, फार विचारपूर्वक घेतले होते असंही नाही. त्यातले काही निर्णय चुकले, काही फसले तर काही बरोबर आले किंवा त्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागली.चुका करण्याची किंवा अपयशाची भीती तेव्हा वाटत नव्हती ही त्या वयाची मोठी ताकद होती.माणसं असं स्वतर्‍च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं.ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक - विशी र्‍ 2020.हा अंक म्हणजे स्मरणरंजन नाही, कल्पनाविलास किंवा रोमॅण्टिक स्वप्नाळू प्रवास नाही, तर ही स्वतर्‍लाच शोधण्यासाठीची एक छोटीशी सुरुवात आहे.आज वयाच्या विशीत असलेल्या सगळ्यांना तर त्यात काही सापडेल; पण तिशीत असलेल्यांनाही बरंच काही सापडेल आणि ज्यांची विशीतली स्वप्न धुसर झाली असतील त्यांनाही 2020 मध्ये नव्या विशीतला प्रवास नक्की हाक मारेल.