शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

वेळ हीच ताकद आहे, वेळ वाया घालवू नकोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:15 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- अंजली भागवत

अंजली.  सावध हो! आता तुझ्या हातातला वेळ हीच तुझी ताकद आहे. आता तू वेळ वाया घालवतेस, तसं करू नकोस. हा वेळ सत्कारणी लावला तर उद्या तुलाच वेळ फुकट गेल्याचं दुर्‍ख होणार नाही. या वयात आपल्यासमोर खूप काही प्रलोभनं असतात. त्याकडे आपण जातो. ते करतोही. पण मग नंतर वाटतं की, का केलं आपण ते? त्या गोष्टींचा काही उपयोग नव्हता. उगाचच या गोष्टी केल्या. जर ही गोष्ट सोडून दुसरी गोष्ट केली असती तर त्याचा फायदा झाला असता. आणि अजून एक.करिअर तर करायचंच आहे; पण जरा मैत्रिणींबरोबर मजा कर. पुढे गेल्यावर वाटेल की, आपण तेव्हा हे सारं का नाही केलं? नंतर आपण ती मजा काही करू शकत नाही. त्यामुळे तेही कर.आनंदी हो. आपण कायम आनंदी राहायचं आहे, हे मोठं झाल्यावरही लक्षात ठेव. आणि अजून एक, मला तुझा म्हणजे या वीस वर्षाच्या अंजलीचा खूप अभिमान आहे. शूटिंगचं वातावरण प्रोफेशनल नाही. कुणाचा पाठिंबा नाही.  मध्यमवर्गीय कुटुंब. तरी तू एक स्वप्न पाहिलंस, त्या स्वप्नांसाठी खूप झटतेस. शंभर टक्के प्रयत्न केले. त्यावेळी जसं करिअरवर खूप प्रेम केलं, तसं कायम कर. करिअरशी कायम प्रामाणिक राहा.आनंदी राहा. आणि कष्टही करत राहा.

(आंतरराष्ट्रीय महिला नेमबाज )