शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

झिरो टॉलरन्स ! कुणी मुद्दाम त्रास देत असेल, तर त्याला सोडू नकोस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:30 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- स्वाती साठे

स्वाती.  मी वीस वर्षाची होते, तेव्हा आजच्याइतकी जीवघेणी स्पर्धा नव्हती. आज स्पर्धाही मोठी आहे आणि कष्टही अधिक आहेत. त्यामुळे प्रशासनातच काम करणार असशील तर शासकीय सेवेत काम करतानाचे माझे अनुभव मी सांगेनच तुला. आपल्या हातून नकळत होणार्‍या चुका कशा टाळता येतील, त्याविषयीही बोलूच.पण त्याहून महत्त्वाचं असं काही मला तुला सांगायचं आहे.स्वतर्‍कडे दुर्लक्ष नको करू. तुझी तब्येत, तुझ्या आवडी-निवडी याकडे लक्षच द्यायचं नाही असं नको करू!स्वतर्‍कडे लक्ष दे ! तब्येत, आवडी-निवडी, त्यासाठी वेळ देणं, स्वतर्‍साठी वेळ काढणं हे जमायला हवं. आपलं जगणं हा एक हॅपी बॅलन्स असला पाहिजे. व्यक्तिगत आयुष्य आणि व्यावसायिक आयुष्य यांचा नीट मेळ घाल, बॅलन्स कर दोन्ही. त्यातून आनंद घे. आनंदी राहा. ते महत्त्वाचं आहे.आणि अजून एक, आता विशाखासारख्या कायद्यांमुळे कार्यालयीन ठिकाणी होणार्‍या सेक्शुअल अब्यूजशी लढता येऊ शकतं. त्यासाठी धोरण एकच, झिरो टॉलरन्स. चालतंच, होतंच, असं काहीही मनात आणायचं नाही. कामाच्या ठिकाणी त्रास होत असेल तर कायद्याची मदत घे. सोसायचं, सहन करायचं नाहीच.आपण काम करतो तेव्हा अनेकदा आपल्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले जातात. आपल्या पाठीमागे काय चर्चा होते, त्याकडे दुर्लक्ष कर; पण समोरून कुणी मुद्दाम त्रास देत असेल, तोंड वाजवत असेल तर धोरण एकच, झिरो टॉलरन्स. त्याला सोडू नकोस.तुझ्याकडे कायद्यानं दिलेले अधिकार आहेत, हक्क आहेत. त्यांचा योग्य वापर करायला शिक. भरपूर काम कर. मनापासून काम कर. आणि आनंदी राहा.

(उपमहानिरीक्षक, मुख्यालय, कारागृह व सुधारसेवा)