शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

शिकायला वय नसतं हे मान्य; पण विशीत ते काम जास्त चांगलं होतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 07:40 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

-डॉ. विनय सहस्त्रबुद्धे

विनय. बोलू आपण,  पण मी अलीकडे एक पुस्तक वाचलं ते तूही आधी वाचायला हवंस असं मला वाटतं.इकीगाई.जपानी संकल्पनेवरचं हे पुस्तक आहे. जीवनाचं मर्म सांगणारं. लेखकानं असं सुचवलेलं आहे की माणसाच्या कर्माचे, भागध्येयाचे चार भाग असतात. हृदय किंव मन, दुसर्‍यांकडून अपेक्षा, प्रोफेशन किंवा कौशल्य आणि व्होकेशन म्हणजे तो पैसा कशातून मिळवतो. जीवनात ज्या काही विपरितता येतात त्या या चार गोष्टी चार दिशांना जातात म्हणून येतात असं हे पुस्तक म्हणतं.हे चारही भाग ज्यावेळी एकत्र काम करतील तेव्हा जे समाधान आणि आनंद मिळेल ते म्हणजे इकीगाई. या इकीगाईचा शोध न घेतल्याचे परिणाम भोगत असल्याचे अनेकजण आवतीभोवती दिसतात.तो शोध मीही योग्य वेळी घ्यायला हवा होता, असं मलाही वाटलं. मी कॉमर्स केलं एक वर्ष मग आर्ट्सला आलो. मी इंग्लिश लिटरेचरमध्ये एम.ए. केलं; पण राज्यशास्त्रात जास्त रस असल्याने पीएच.डी. राज्यशास्त्रात केलं. म्हणजे ही नागमोडी वाटचाल जी झाली ती हे पुस्तक वेळीच वाचलं असतं तर टळली असती.म्हणून म्हणतो हे पुस्तक जमलं तर वाच!दुसरं म्हणजे माणसांचे नातेसंबंध, मैत्री किंवा पारस्पारिकता, हे एक रसायन आहे. वेळ द्यावा लागतो त्याला. मेहनत घ्यावी लागते. निर्धार असावा लागतो. मैत्री करायची, नातं निभवायचं तर एकतर्फी निर्धार किंवा प्रय} करावे लागतात. गेले उडत अशी भावना नाही चालत. मैत्री, नात्यासाठी आपण पुढाकार घ्यायला हवा.त्या फुलपाखरी दिवसांत हे लक्षात नाही येत; पण एक नक्की की नात्याचं बहरणं किंवा कोमेजणं हे तुझ्यावरही अवलंबून आहे. ते जमलं नाही तर त्याचं खापर इतरांवर फोडून चालणार नाही. आणि अजून एक म्हणजे कौशल्य आणि क्षमतांना काढायची धार. शिकायला वय नसतं हे मान्य आहे. मात्र जीवनाच्या पंचविशीच्या टप्प्यार्पयत आपली कौशल्य, क्षमता शार्प करता येतात. त्यांना धार जास्त चांगली काढता येते. तसे तर काय लोक आयुष्यभर शिकतात, पण ताण-तणावापासून मुक्त असताना वयाच्या या टप्प्यात ते काम अधिक चांगलं होतं. आपल्या क्षमतांना चांगली बैठक मिळते.ज्याला इंग्रजीत ‘बिल्ड अपॉन’ म्हणतात, तसा करिअरचा भक्कम पाया घालणं, त्यासाठी कौशल्य आत्मसात करणं हे याच वयात अधिक चांगलं होतं.तर ते कर. त्यासाठी हे मोक्याचं वय आहे त्याचा पुरेपूर वापर कर!( उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी)