शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट! ती वाट सोड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 06:50 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- अतुल देऊळगावकर

अतुल.हे जागतिकीकरणाचं जग आहे. विश्व आपल्या हातात आहे; पण मेंदूत नाहीये. आपण फक्त उपकरणांनी आधुनिक झालो आहोत, मानसिकतेत ती आधुनिकता नाहीये. वैश्विक गाभा आपल्याला गवसलेलाच नाही.1981 साली आलेलं थर्ड वेव्ह नावाचं ऑल्विन टॉफ्लरचं पुस्तक आहे, ते जमलं तर वाच. तंत्रज्ञान आणि गांधी विचार यांची सांगड घालायला पाहिजे. विचार वैश्विक व्हायला पाहिजे. नेमकं त्याच काळात फक्त स्व-प्रतिसादात रमतो आहेस तू.तो घात आहे. अडथळा आहे. कुटुंब, समाज, देश, जग सगळ्यांच्याच वाटेतला अडथळा आहे.विचार कर की, हा अडथळा तोडण्यासाठी मी काय करायला हवं?तुझ्या ‘मी’ भोवतीची वेलांटी फार घट्ट व्हायला लागली आहे ती सोडव, सैल कर ते पेच. विचार स्वतर्‍ला, मला कळतंय का ग्रेटाचं काय चाललंय ते? ब्राझीलमध्ये धडधडून पेटलेलं जंगल मला दिसतंय का?होतोय का संवाद त्या जगाशी?तुला सांगतो, विसावं वय असं असतं, ज्या वयात वेगळी संस्कृती तयार करतो आपण. ती तशी संस्कृती तयार करणं हेच विसाव्या वर्षीचं खरं आव्हानही आहे. परंपरेतून काय घ्यायचं आणि काय टाकायचं, आधुनिकतेतून काय घ्यायचं आणि काय टाकायचं, हे समजून निवडलं पाहिजे. एकत्र गुंफलं पाहिजे. ते आपण करतोय का?ते करण्यासाठी प्रय} कर.ते केलं तर तुझी अभिव्यक्ती अधिक सुंदर, सशक्त होत जाईल. आज सगळीकडे जी अभिव्यक्ती दिसते ती उधार, उसनवार, कॉपी-पेस्ट दिसते. ती वाट सोड, अधिक वैश्विक हो. आपलं करिअर, विचार, अभिव्यक्ती, आधुनिकता आणि पारंपरिकता यांची सांगड सोपी केली तर जगणं अधिक सशक्त होत जाईल.हे आव्हान आहे तुझ्यासमोर.सांग, स्वीकारतोस का?

( सुप्रसिद्ध पर्यावरणविषयक लेखक)