शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नात्यांकडे संशयाने पाहू नकोस. प्रेमावर विश्वास ठेवच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2020 08:00 IST

माणसं असं स्वत:च्याच विशीकडे वळून पाहतात तेव्हा त्यांना फक्त आपल्या वयाचं नाही तर त्या वेळच्या आणि आजच्या समाजाचं आणि भोवतालातल्या बदललेल्या वास्तवाचंही बरंच काही सापडत जातं. ते सापडावं म्हणून हा ऑक्सिजनचा विशेष अंक 

ठळक मुद्देआपल्याला आपल्या विशीत परत जाता आलं तर?  

- मृणाल कुलकर्णी

मृणाल, सांगू तुला, वयाच्या विशीत तू घेतलेले 90 टक्के निर्णय योग्यच होते. उरलेले 10  टक्के चुकले तर त्याची खंत करणं सोडून दे. त्या वयात तू घर, करिअर आणि स्वतर्‍च्या आवडीनिवडी हे सगळं बॅलन्स करू शकलीस, ते भल्याभल्यांना जमत नाही अगं! तू ते केलंस त्याबद्दल आनंदी राहा. आणखी काय काय जमलं असतं ही खंत मनात येऊ देऊ नकोस.अजून एक, याच वयात ठरव तुझा लाइफ पार्टनर. अनेक निर्णय दोघांनी मिळून घेतले, साथ दिली एकमेकांना  तर एक उत्तम आयुष्य जगता येतं, यावर माझा आजही शंभर टक्के विश्वास आहे. एकच बदल कर जमलं तर स्वतर्‍त, दुसर्‍याला वाईट वाटेल म्हणून स्वतर्‍ला त्रास करून घेऊ नकोस. इतरांच्या हातातलं आईस्क्रीम वितळू नये, ते त्यांना खाता यावं हे पाहताना आपल्या हातातलं आईस्क्रीम गळून जात नाही ना, हे पण पाहा!आयुष्यात योग्य वयात योग्य निर्णय घेतले तर त्याचे फायदेच होतात. त्यामुळे रिस्क घ्यायला घाबरू नकोस. मला माहितीये, तुझ्या वयाच्या अनेक मुली म्हणतात की, नको लग्न, त्यानं माझ्या स्वातंत्र्यावर गदा येईल; पण मला तसं वाटत नाही. बायका स्मार्ट असतात अगं. आणि आता तर काळ किती बदलला. पार्टनर आता एकमेकांच्या साथीनं पुढे जातात. आणि आपला पार्टनर तसं काही कमी करत असेल तर त्यानं ते करावं म्हणून तसे संस्कारही जरा धीर धरून करायला लागतात. खरं सांगते, एक स्री म्हणून आपल्याला सगळं हवं असतं. स्रीत्वाचं एक अंग जर पूर्ण नाही झालं तर पुढं कुठं तरी वाईट वाटण्याची शक्यता असते. त्यामुळे घे बिनधास्त निर्णय.मुख्य म्हणजे नात्यांकडे प्रेमाने बघ, संशयाने पाहू नकोस. शंका कुणालाच जिंकून घेऊ शकत नाही, प्रेम मात्र सर्वाना जिंकतं. त्यामुळे प्रेमावर विश्वास ठेवच.अजून एक म्हणजे, तब्येत सांभाळ! ते अत्यंत आवश्यक आहे. हे राहिलं, तेही करून घेऊ, तेही करता येईल असं म्हणताना फिटनेसचा हात सुटतो. तो सोडू नकोस. फिटनेसबाबात जागरुक राहा. फिजिकली आपण फीट नसलो तर आपली अनेक स्वप्नं अपूर्णच राहू शकतात.बाकी काय तुला उत्तम यश, उत्तम कुटुंब लाभलं आहे, त्यांची भक्कम साथ आहे. यातून तर तू उभी आहेस, मी उभी आहे.तू आणि मी एकच तर आहोत.

(ख्यातनाम अभिनेत्री)