शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

आजीला भेटायला तो इटलीहून इंग्लंडला चालत गेला, त्याची  गोष्ट 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:40 IST

10 वर्षाचा मुलगा इटली ते लंडन 2800 किलोमीटर प्रवास चालत करतो तेव्हा   

ठळक मुद्देपायीपायी इटली ते लंडन

- कलीम अजीम

दहा वर्षाचा रोमिओ कॉक्स तीन महिने आणि 2,800 किलोमीटरचा पायी प्रवास करत इटलीहून लंडनला पोहोचला. आजी रोज मेरीला भेटायचं म्हणून त्यानं वडिलांसह हा प्रवास केला. इटली ते लंडन, पायी प्रवास. त्या प्रवासाचा प्रत्येक क्षण आणि प्रसंग फोटो आणि व्हिडिओ स्वरूपात त्याच्या वडिलांनी कॅम:यात टिपले आहे. दहा वर्षाच्या मुलाची ही सफर तिकडे तरुणांच्या जगात मोठय़ा चर्चेचा विषय बनली आहे. कॉक्स म्हणतो, ‘टाळेबंदीत फ्रान्सहून इटलीत चालत आलेली एक वयस्कर आजी मी पाहिली. मला वाटलं ती जर हे करू शकते तर मी का नाही? मलाही माङया आजीला भेटायला लंडनला जायचं होतं.’

पण दोन्ही देशात लॉकडाऊनुमळे  वाहतुकीवर र्निबध होते. जाणार कसं? वडिलांना तो म्हणाला पायी जाऊ, पण वडील तयार नव्हते. पण मुलगा ऐकेनाच म्हटल्यावर तेही त्याच्यासोबत निघाले.  दोघांचं पहिलं डेस्टिनेशन मेसिना होतं. आईनं त्या दिशेनं कॉक्सला चालत नेलं. निरोप दिला.पिता-पुत्र 24 जूनला इटली - सिसिलीहून नेपल्सला जाणारी बोट घेऊन निघाले. पुढे सायकलवरून त्यांचा लांबचा प्रवास सुरू झाला. रोज पहाटे साडेचार वाजता उठून प्रवास सुरू व्हायचा. कॅन्टरबरीहून रोमला जोडणा:या फ्रान्सिजेना मार्गावर ही जोडी दिवसाला सुमारे 2क् किलोमीटर प्रवास करत असे.जिथे रात्र होईल तिथे त्यांचा मुक्काम होई. अनेकदा त्यांनी निरभ्र चांदण्याच्या खाली जंगलात तळ ठोकला. प्रवासात वसतिगृहं आणि कॉन्व्हेंटमध्येदेखील मुक्काम पडला. कॉक्स म्हणतो, ‘आम्ही तारे आणि झाडांखाली कुठेही झोपायचो. ते खरोखरच चांगले दिवस होते.’हा प्रवास साधा नव्हता. प्रवासात गाढव, घोडा, मिळेल त्या वाहनावर बॅगा  सांभाळत बसावं लागायचं. तब्बल 93 दिवस ते रस्त्यावर प्रवास करत होते. यादरम्यान दोघांनी इटली ते इंग्लंडदरम्यान चार देश ओलांडले. अर्थात, लंडनला पोहोचल्यावर 14 दिवस नियमानुसार क्वॉरण्टाइन व्हावंच लागलं आणि मग 5 ऑक्टोबरला कॉक्स त्याच्या आजीला भेटला. या दिवशी मीडिया प्रतिनिधींनी दोघांच्या भावमुद्रा टिपण्यासाठी गर्दी केली होती. ते व्हिडिओही व्हायरल झाले.

 कॉक्सचे वडील फिल कॉक्स व्यवसायानं पत्रकार व माहितीपट दिग्दर्शक आहेत. ते एका सेवाभावी संस्थेसाठी समाजकार्य करतात. मुलाच्या धाडसाचे कौतुक म्हणून त्यांनी त्याच्यासोबत हा पायी प्रवास केला. लॉकडाऊनमुळे निर्वासितांनी केलेल्या वेदनादायी पायपिटीवरही त्यांनी आपल्या या प्रवासातून भाष्य केलं. कोरोनाकाळात देश ओलांडत चालत जात आपल्या माणसांना भेटणं हे जगभरातल्या माणसांनी कसं अनुभवलं याची ही गोष्ट आहे. ( कलीम मुक्त पत्रकार आहे.)