शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

..क्या यहीं प्यार है? या 10 गोष्टी तुम्हालाही छळताहेत प्रेमात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 07:05 IST

कबीर सिंग करतो तशी सिनेमातली दादागिरी आणि अतिरेकी बॉसिंग आजच्या तरुण पिढीतही दिसते का? काय दिसतं, प्रेमात पडलेल्या अनेकांच्या ‘मनातलं’ शोधताना-ऐकताना ‘ऑक्सिजन टीम’ला?

ठळक मुद्देउत्तरं नव्हे, प्रश्न शोधणारी एक विशेष चर्चा !

-ऑक्सिजन टीम

कबीर सिंग या सिनेमाच्या निमित्तानं बरीच उलटसुलट चर्चा झाली. तो सिनेमा कसं बायकांचं शोषण करण्याचं समर्थन करतो, अतिरेकी वागण्याला प्रोत्साहन देतो अशीही चर्चा समाजमाध्यमांत रंगली. सिनेमाला अनेकांनी नावं ठेवले आणि तरुण प्रेक्षक मात्र आवजरून सिनेमा पहायला गेला. यातला सिनेमा हा विषय बाजूला ठेवला तरी त्यामागची तरुण मानसिकता ती ही चालू वर्तमानकाळातली आपल्याला शोधता येतेय का, असा एक प्रयोग ‘ऑक्सिजन’ने केला.काय दिसतं ‘ऑक्सिजन’ला पत्रानं आपली लव्हस्टोरी, त्यातले समज-गैरसमज, त्रास, वेदना आणि आनंद लिहून पाठवणारे तरुण वाचक मित्रमैत्रिणी मोठय़ा प्रमाणात आहे. चालू वर्तमानकाळात त्या प्रेमकथांत आणि त्यातल्या संघर्षात डोकावू पाहिलं तर काय दिसतं?कबीर सिंग इतका अतिरेक दिसतो की पूर्वीच्या प्रेमातली सादगी दिसते?खरं सांगायचं तर याहूनही वेगळं दिसतं आजचं चित्र.ते काहीसं धास्तावणारं आहे आणि प्रेमाची एक बोचरी बाजूही दाखवणारं आहे. सरसकट सगळ्यांच्याच प्रेमाला ही बोचरी, टोचरी बाजू आहे असं काही नाही. मात्र तरीही एक चित्र मांडायचं ठरलं तर नव्या प्रेमातले काही प्रश्न मात्र नक्की दिसतात.त्यातलेच हे काही ठळक मुद्दे.1. पझेसिव्हनेस.प्रेमात पझेसिव्हनेस असतोच. आपलं प्रेम आपलंच असावं असं वाटणं ही स्वाभाविक आहे. मात्र तू मेरी नहीं तो और किसी की नहीं असं वाटणं हा अतिरेक. मात्र आजच्या प्रेमात हा पझेसिव्हनेस वेगळ्या रंगरूपात दिसतो. आणि तो फक्त मुलेच गाजवतात असं नाही तरी मुलीही गाजवतात. जोडीदारापैकी कुणीतरी दुसर्‍याच्या तमाम सोशल मीडियाचा ताबा घेतं, कोण कुणाशी बोलतं, कुठं लाइक करतं ते कितीवेळ ऑनलाइन असतं ते काय कपडे घातले जातात, कुणाशी मैत्री केली जाते, कुणाशी नियमित संपर्क असतो असे प्रश्न उपस्थित केले जातात. हा ‘मालकी हक्क’ नात्यात शिरलेला आताशा आम दिसतो आहे. आणि तो काच जाचत असताना अनेकजण आपलं नातं ओढताना दिसतात.2. सर्रास मारझोड/शिवीगाळप्रेमात पडलो आहोत तर जोडीदारानं आपल्याला मारलं कधीमधी तर चालतं, त्याचं आपल्यावर प्रेम आहे असं मानणार्‍या मुली आजच्या काळात आहेत यावर कुणी विश्वास ठेवणार नाही, मात्र ऑक्सिजनकडे येणारी पत्र प्रेमातल्या मारझोडीच्या कहाण्या सांगतात. शिवीगाळ आम होते. हॉस्टेलवर किंवा रूमवर जाऊन सगळी कामं करून देणं इथपासून ते मागेल तेव्हा पैसे देणं इथर्पयतच्या कहाण्या कळतात. हे सारं म्हणजे त्याचं आपल्यावर प्रेम आहे, आणि तो असा वागतो तरी मी त्याच्याशिवाय जगू शकत नाही, मी त्याला बदलवीन असं म्हणणार्‍याही काहीजणी आपल्या पत्रांतून कहाण्या सांगतात. 3. सतत सीसीटीव्हीऑनलाइन असल्यानं सतत कनेक्टेड असण्याचा लाभ प्रेमीजिवांना मिळतो मात्र त्याचा वापर सीसीटीव्ही सारखा केला जातो. सतत हिरव्या टिंबाकडे आणि दोन निळ्या टिक्सकडे लक्ष. कुणाशी फोनवर, का, केव्हा बोललं जातं ते लास्ट सीन ते सोशल मीडिया वापर, ते ऑनलाइन शॉपिंग यासार्‍याचा जाच सीसीटीव्हीसारखा होतो. आणि सतत कुणीतरी आपला पिच्छा करतंय असा अनेकांचा फील असतो. त्यावरून भांडणंही सतत होताना दिसतात.4. तुला माझ्यावर भरवसा नाय का?हा असा प्रश्न प्रेमात वारंवार विचारून ब्लॅकमेल करणं आणि त्यानुसार शरीर संबंध ठेवणं, ते पैसे मागणं, फोटो काढणं किंवा नाजूक क्षण शूट करणं आणि त्यावरून पुन्हा ब्लॅकमेल करत तुझा आपल्या प्रेमावर विश्वास नाही का, असे प्रश्न उपस्थित केले जातात. प्रेम आहे म्हणून हे सारं अनेकजणी सर्रास चालवून घेतात.5. डंप करो डंपमुलंच मुलींना फसवतात असं काही नाही तर अधिक चांगल्या मुलासाठी किंवा आकर्षणापोटी आपल्या प्रियकराला ‘डंप’ करणार्‍या मुली दिसतात. दोघांचं एकमेकांशी पटत नाही म्हणून ब्रेकअप होणं वेगळं मात्र आताशा डंप करणं, टाळणं, काहीही कारण न सांगता संपर्क तोडणं हे सर्रास होतं असं अनेक तरुण मुलंही कळवतात. जे कॅज्युअल रिलेशनशिपमध्ये असतात त्यांना यासार्‍याचा त्रास होत नसेलही पण सिरीयस प्रेमप्रकरणात मात्र अनेकजण आपण वापरलो गेलो असं वाटून देवदास होतात.6. दोस्त क्या कहेंगे.प्रेमात पडलेल्या अनेकांना आपल्या मित्रांचाही धाक असतो. मुळात अनेक कपल्स मिळून एक ग्रुप करणं आणि ग्रुपने फिरणं, पाटर्य़ा करणं, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप बनवणं, त्यावरच्या चर्चा हे सारं ‘इन’ ठेवायला मदत करतं. मात्र ब्रेकअप केलं तर आपण यासार्‍या जगापासून लांब जाऊ, हे लोक आपल्याला एकटं पाडतील या भीतीनं अनेकजण प्रेम-प्रकरण सुरू ठेवतात.

7. सवय झाली त्याचं काय?आपलं एकमेकांवर प्रेम आहे की एकमेकांविषयी आकर्षण वाटतं आहे हेच अनेकांना कळत नाही. मात्र ते कबूल करतात की, आम्हाला एकमेकांची सवय झाली आहे. एकटय़ानं जगण्याची भीती वाटते. आता ब्रेकअप केलं तर पुढं कसं होणार म्हणूनही भांडत एकमेकांशी नातं ठेवलं जातं. मात्र त्याचा जाच होतो.

9. फसवलं तरीपण.काहीजणांना किंवा काहीजणींना माहिती असतं की, जोडीदार आपल्याला फसवतो आहे. तरीही केवळ आपलं त्याच्यावर खरं खरं प्रेम आहे, आपलं प्रेम त्याला परत आपल्याकडे आणेलच या आशेवर झुरत राहतात. आणि स्वतर्‍लाही फसवतात.

10. चलता है!चालेल तोवर चालेल स्वतर्‍लाही फार त्रास करून घ्यायचा नाही असाही अनेकांचा प्रेमाकडे पाहण्याचा अ‍ॅटिटय़ूड दिसतो. मात्र या चलता है अ‍ॅटिटय़ूडमधली बेफिकिरी आपल्याला कुठं नेईल हे मात्र लक्षात येत नाही.