शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

१० ट्रेन्स १७ दिवस २६५ तास

By admin | Updated: April 28, 2016 13:52 IST

१७ दिवस. रेल्वेनं प्रवास. तोही जनरल कम्पार्टमेण्टमधून. रिझर्व्हेशन नाही, प्लॅनिंग नाही. फक्त देशाची चार टोकं जोडणारा प्रवास रेल्वेनं करायचा..

- समर्थ महाजन

रेल्वेच्या जनरल डब्यातून,रिझर्व्हेशन न करता,देशाच्या चार कोपऱ्यांचा प्रवास करणारेतीन भन्नाट दोस्तआणि त्यांच्या त्याहून भन्नाट प्रवासाचीही रेल्वे डायरी.१७ दिवस. रेल्वेनं प्रवास. तोही जनरल कम्पार्टमेण्टमधून. रिझर्व्हेशन नाही, प्लॅनिंग नाही. फक्त देशाची चार टोकं जोडणारा प्रवास रेल्वेनं करायचा..अशी आयडिया गप्पा मारता मारता, वाद घालता घालता सुचली. आणि मला, ओंकारला आणि रजतला एकदम वाटलं की, देशाची चारी टोकं जोडणारी भारतीय रेल्वे, तिच्यानं जर असा अनारक्षित प्रवास केला तर आपल्याला माहिती नसलेलं जग दिसेल, काही सरप्राईजेस वाट्याला येतील, भन्नाट काहीतरी जगून पाहता येईल!आयडिया आवडली आणि देशाची टोकं जोडत १० रेल्वेंनी जनरल डब्यातून प्रवास करायचं ठरलं. कुठलंही रिझर्व्हेशन न करता देशातली ९५ टक्के जनता ज्या जनरल डब्यातून प्रवास करते त्या डब्यातला हा मुक्काम आपल्याला ‘माणसांना’ भेटवेल, अनेक माणसांशी बोलता येईल, नवीन गोष्टी उकलत जातील आणि कुठलंच रिझर्व्हेशन नसलेलं हे जग आपल्याला थोडंबहुत तरी दिसेल असं वाटलं आणि आम्ही तिघे जुजबी सामानसुमान घेऊन प्रवासाला निघालो.मुंबई सेण्ट्रल स्टेशनहून आम्ही आमची पहिली ट्रेन पकडली. सौराष्ट्र मेल. मुंबई सेण्ट्रल ते ओखा. गुजरातमधल्या जामनगर जिल्ह्यातलं एक छोटंसं गाव. खरंतर बंदरच. देशाचं पश्चिमेचं एक टोक म्हणा ना. त्या दिशेनं आम्ही निघालो. जो थोडा रिकामा दिसला अशा जनरल डब्यात जाऊन बसलो. सामान टाकून जरा स्थिरावलो तर डब्यात मोबाइल चार्जिंगसाठीचे पोर्ट दिसले. ‘गुजरात इफेक्ट’, सध्या गाजत असलेली राजकीय उपमा माझ्या डोक्यात चमकून गेलीच. गाडी धावायला लागली, तशी समोर बसलेल्या एका गृहस्थाशी नजरानजर झाली. एकमेकांकडे पाहून हसूनबिसून झालं आणि तेवढ्या ओळखीवर गप्पांना सुरुवात झाली. हे गृहस्थ कडक सूटबिट घालून जनरल डब्यातून प्रवास करताहेत, हे जरा वेगळंच वाटलं. शांताराम त्यांचं नाव. पन्नाशीचे असावेत. बोलता बोलता म्हणाले, ‘‘मी जामनगरला चाललोय, माझ्या लेकीचं एमबीबीएसचं कॉनव्होकेशन आहे. पोटाला चिमटे काढले, पण लेकीला डॉक्टर केलंच. मी हा असा कायम सेकंड क्लास, जनरलमधूनच जातो. पण तिला मात्र कधी असं पाठवलं नाही. कायम लक्झरी बसमधूनच लेकीला शिकायला धाडलं..’’ लेक डॉक्टर होणार म्हणून सूटकोट घालून निघालेला हा बाप, त्याच्या चेहऱ्यावर अभिमानाचं तेज दिसत होतं. गाडी धावत होती. बाहेर भल्यामोठ्या पवनचक्क्यांच्या रांगा दिसत होत्या, लांबच लांब पसरलेली मिठागरं होती. पुढचा प्रवास होता उत्तरांचल एक्स्प्रेसचा. डब्यात गच्च गर्दीत दोन डफलीवाले गायक सुफी गाणी गात होती. त्या सुंदर सुफी गाण्यांनी तो गर्दीचा डबा जसा भारावून गेला. त्याच डब्यात आम्हाला एक ८२ वर्षांचे आर्मीतून निवृत्त झालेले आजोबा भेटले. एकेकाळी कसे ते अशाच एका गच्च भरलेल्या रेल्वेतून पळाले होते याची अत्यंत रंजक गोष्ट त्यांनी सांगितली. फाळणीच्या काळात लाहोर ते अमृतसर प्रवास पॅसेंजर ट्रेनमधून कसा केला याचा अनुभव ते सांगत होते आणि आमच्या डोळ्यासमोर फाळणीचं चित्रच उभं राहिलं. फाळणी, त्यानंतर उसळलेल्या दंगली, कत्लेआम, रक्ताचे वाहिलेले पाट हे सारं आपण फोटोत पाहतोच, पण त्या आजोबांनी ते सारं सांगितलं तेव्हा जाणवलं की, माणसांच्या आयुष्यातच नाही, तर इतिहासाच्या एका टप्प्यातही याच रेल्वेनं किती महत्त्वाची भूमिका बजावली आहे.या साऱ्या गप्पांत जवळच बसलेले एक नावाडी गृहस्थ दिसले. डोक्यावर टोपी, टोपीवर ‘ख्वाजा गरीब नवाज’ अशी एम्ब्रॉयडरी! ते काका अजेमर शरीफला निघाले होते. सोबत कागदपत्रांची फाईलही होतीच. ‘‘दिल्लीला नोकरीसाठी चाललोय. पण त्याआधी अजमेरला जाऊन दुआ मागतो, गाऱ्हाणं घालतो की, अजून किती परीक्षा पाहणार, माझ्यावर कृपा कर, आता तरी मिळू दे हाताला काम,’’ म्हणाले. हा प्रवास करत आम्ही दिल्लीत पोहचलो. तिथून आम्हाला कटराला जायचं होतं. म्हणजे जम्मू आणि काश्मीरच्या दिशेनं! अवचित पावसानं इथं गाठलंच. प्रचंड गर्मीत, गर्दीत प्रवास करत निघालेल्या रेल्वेत एकदम पंजाब दी मिट्टी की खुशबू दरवळली. तिथंच डब्यात मला एकजण भेटले. माझं नाव विचारलं. ते नाव पंजाबी असल्यानं लगेच त्यांनी मी कुठला, गाव कुठलं अशी ओळख काढत गप्पांना सुरुवात केली. मग त्यांनी सांगितलं की, लहानपणी मार्केटमध्ये त्यांचा भाऊ हरवला, जो आजवर सापडलेला नाही. त्याचं नावही समर्थच होतं, हे नाव ऐकून त्यांच्या लहानपणाच्या साऱ्या आठवणी एकदम जाग्या झाल्या.आमच्या बाजूलाच एक बंगाली गृहस्थ बसलेले होेते. ते स्थलांतरित, पोट भरायला पंजाबात आलेले. मात्र जवळच बसलेले काही पंजाबी मुलं त्यांची टर उडवत होते. पण माझं आणि त्यांचं बोलणं सुरू झालं. स्थलांतरिताचं जगणं, त्यातली असुरक्षितता हे ते सारं अत्यंत प्रांजळपणे सांगत होते. आमच्या गप्पा ती पंजाबी तरुण मुलंही ऐकत होती, आणि त्या माणसाच्या कष्टांना मग त्यांनीही दाद दिली! बोलणं झालं, एकमेकांची बाजू समजली तर दृष्टिकोन कसा बदलतो याचंच ते एक जिवंत उदाहरण आमच्यासमोर होतं. हा अनुभव अत्यंत वेगळा आणि ‘बोलका’ होता.तिथून पुढे आम्ही ज्या ट्रेनमध्ये चढणार होतो तो प्रवास जास्त थरारक वाटत होता. बनीहाल-बारामुला ट्रेनचा काश्मीरमधला प्रवास. आमच्या सगळ्या प्रवासात आम्ही ट्रेन सोडली ती फक्त याच टप्प्यात. आम्ही दिल्लीहून कटराला पोहचलो आणि तिथून एक टॅक्सी करून बनिहालला पोहचलो. तो सात तासांचा प्रवास आम्ही फक्त टॅक्सीतून केला. कारण काश्मीर खोऱ्यात जाणाऱ्या त्या एकमेव ट्रेनने आम्हाला प्रवास करायचा होताच. बनीहाल हे स्टेशन अक्षरश: स्वप्नातल्या काल्पनिक जादुई दुनियेतली देखणी, सुंदर स्टेशन्स असतात ना तसंच दिसत होतं. चारी बाजूनं बर्फाच्छादित पर्वत. त्या हिमशिखरावरून परावर्तीत होत येणारा सूर्यप्रकाश या हिरव्या-मरून रंगातल्या स्टेशनला सोनेरी रंगात रंगवून टाकतो. अर्थात या साऱ्यासोबत सैन्याचा पहारा आहेच. वाळूच्या बोऱ्यांनी उभारलेले तात्पुरते चेक पॉइण्ट्स आहेत. चांगली कसून तपासणी झाली आणि मग आम्हाला ट्रेनमध्ये चढायची परवानगी मिळाली. ट्रेनमध्येच आम्हाला श्रीनगर विद्यापीठात शिकणारे तीन तरुण दोस्त भेटले. त्यांच्याशी गप्पा झाल्या. त्यांना आमचा उपक्रम कळला. आणि मग श्रीनगरला न उतरता आम्ही तुम्हाला आमचं सारं राज्य दाखवतो म्हणत ते आमच्यासोबत निघाले. पण बारामुलाला पोहचता पोहचताच आमच्या लक्षात आलं की, फार काही फिरणं, भटकणं यासाठी वेळ उरलेला नाही. पण नाराज न होता त्या तीन दोस्तांनी प्लॅटफॉर्मवर बसल्या बसल्याच आम्हाला अनेक गोष्टी, जागेचं महत्त्व सांगायला सुरुवात केली. आमच्यासोबत परतीचा प्रवास करत त्यांनी आम्हाला येत्या जूनमध्ये त्यांच्या गावी येण्याचं आमंत्रणही देऊन टाकलं. दोस्तीचं एक नातं जोडलं गेलं.अवतीभोवतीही असेच तरुण दिसत होते, पण विक्रेते. चाळीसएक विक्रेते तरी असतीलच, प्लॅटफॉर्मवर लहानमोठ्या वस्तू विकणारे. कुणी खारे शेंगदाणे, काजू असं काहीबाही विकत होते. काश्मीर खोऱ्यात बेरोजगारीचा प्रश्न मोठा आहे. त्यातून असं मिळेल ते काम तरुण करताहेत असं तिथं समजलं.काश्मीर खोऱ्यातून आम्ही पुढे जम्मूला आलो आणि जम्मू मेलने पुन्हा दिल्लीला पोहचलो. दिल्लीहून आम्ही आता अतिपूर्वेला जाणार होतो. ब्रह्मपुत्र मेलने आसाममधल्या दिब्रुगढच्या दिशेनं निघालो. या ट्रेनच्या डब्यात प्रेमाच्या इतक्या विरुद्धरंगी छटा दिसल्या की आम्ही चक्रावूनच गेलो.या डब्यात एक वंदना भेटली, नर्स होती. तिच्याशी बोलताना कळलं की, तिचं एका मुलावर प्रेम आहे. पण आपलं कधीच लग्न होऊ शकत नाही हे तिनं मान्य करून टाकलंय. जातीपातीचा अडसर हेच कारण. दुसरी तरुणी भेटली ती राणी. ती मूळची आसामिया. आपण उत्तर प्रदेशच्या एका ट्रक ड्रायव्हरच्या प्रेमात कसं पडलो, त्यासाठी हिंदी कसं शिकलो, हिंदी शिकून त्याच्या घरच्यांचं मन कसं जिंकलं याची एक रोमॅण्टिक गोष्टच तिनं सांगितली.मात्र या गप्पा काही फार दीर्घकाळ रंगू शकल्या नाहीत, कारण डब्यातली प्रचंड गर्दी. एका डब्यात किती माणसं कोंबली जाऊ शकतात आणि ती कशी जागा करून घेतात याच्या साऱ्या मर्यादा संपल्या तरी डब्यात गर्दी वाढतच होती. लोक शौचालयापाशी बसले, वरती सामान ठेवायच्या रॅकवर जाऊन झोपले, काही सीट्सच्या खाली सरकले, काहींनी तर ते जाळीदार झोके म्हणजे हॅमॉक्स कम्पार्टमेण्टमध्ये उंच टांगले आणि त्यावर जाऊन झोपले. याच गर्दीत अ‍ॅरॉन भेटला. अगदी कोवळा, लहानसा मुलगा. इतका छोटा मुलगा एकट्यानं रिझर्व्हेशन न करता प्रवास करतोय हेच धक्कादायक होतं. पण त्याला त्याचं काही नव्हतं. तो शांतपणे म्हणाला, मी आईलाही सांगितलं, ‘चल मा, काही नाही होणार, मी येतो लवकर घरी!’दिब्रुगढला, देशाच्या अतिपूर्वेला पोहचलो. तिथून पुढचा प्रवास मात्र खूप लांबचा होता, दक्षिणेकडचा. देशातला बराच लांब पल्ल्याचा प्रवास. विवेक एक्स्प्रेसने आम्ही दिब्रुगढहून कन्याकुमारीला जाणार होतो. पण या प्रवासात माझ्या घशाला इन्फेक्शन झालं. जरा फोनवर आॅनलाइन सर्च मारला तर कळलं की, केळी खाल्ल्यानं हे घशाचं इन्फेक्शन बरं होऊ शकतं. मग मी आयआयटी खरगपूरमध्ये शिकणाऱ्या माझ्या ज्युनिअर दोस्तांना उद्देशून एक पोस्ट सोशल मीडियात टाकली की, मी अमूक ट्रेनमध्ये आहे, मला केळी हवी आहेत. खरगपूर कॅम्पससमोरच हिजली स्टेशन आहे. ट्रेन त्या स्टेशनला पोहचताच आमच्या जनरल कम्पार्टमेण्टसमोर ही भरपूर केळी घेऊन उभ्या दोस्तांची गर्दी दिसली. ते एवढी केळी घेऊन आले होते की, डब्यातल्या लोेकांना वाटलं की, आम्ही आता डब्यात केळी विक्री करतच फिरणार आहोत. साडेतीन दिवसांचा हा प्रवास होता. या साडेतीन दिवसात त्या जनरल कम्पार्टमेण्टचा अक्षरश: कचराडेपो बनला. आणि मजल दरमजल करत कन्याकुमारी स्टेशनात गाडी पोहचली.कन्याकुमारीहून आम्ही मुंबईला परतीच्या ट्रेनने निघालो. शेवटचा प्रवास. नेत्रावती एक्स्प्रेस आम्हाला मुंबईला घेऊन जाणार होती. गाडीला तुफान गर्दी. पण लोक आपापल्यापुरती जागा करून घेत होती. कुणाला त्रास न देता, बसण्यापुरती जागा त्या गर्दीतही आपोआप निघत होती. मला वाटलंच की, हे असं सगळ्यांना सामावून घेणं, समजून घेणं कशाचं लक्षण असावं? नव्या शिक्षणाचं की मुळात संस्कृतीत असलेल्या आपलेपणाचं? सांभाळून घेण्याच्या, सामावून घेण्याच्या कौशल्याचं? मुंबईच्या दिशेनं गाडी निघाली, कोकणात पोहचली. सुंदर हिरवंगार कोकण दिसू लागलं. आणि पुढे मुंबई उभी होतीच आमच्या स्वागताला..२६५ तासांच्या या रेल्वे प्रवासात किमान १०० माणसांशी तरी आम्ही बोललो..प्रत्येकवेळी बोलताना एकमेकांची सारीच मतं पटली असं काही झालं नाही; पण तरीही ‘चाय पे चर्चेला’ सारे उत्सुकतेनं तयार होते. गप्पा झाल्या, थोडे शाब्दिक वाद झाले; पण तरी बोलणं, बोलत राहणं हा धागा सर्वत्र कायम राहिला. सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट या गर्दीत दिसली ती म्हणजे इतरांना समजून घेण्याचा सहिष्णू भाव. टॉलरन्स. ज्याची चर्चा सध्या आपल्या देशात सतत होतेय. अनेकदा सोबतच्या माणसांशी बोलताना आवाज चढलेले दिसले, पण मारामाऱ्या काही कधी झाल्या नाहीत. या प्रवासात एक जाणवलं की, घरात बसून वाटतं किंवा आपल्यासमोर रंगवलं जातं तितकं हे जग वाईट नाही. घराबाहेर पडून पाहा, माणसं चांगली आहेत, बोलायला, समजून घ्यायला उत्सुक आहेत.हा प्रवास संपला त्याला आता दोन आठवडे झाले, पण अजूनही आपण चालत्या ट्रेनमध्ये आहोत असे भास होतात. रेल्वेची धडधड ऐकू येते. विक्रेत्यांच्या आरोळ्या, गर्दीचा कलकलाट डोक्यात घुमतो. मोजदाद न करता प्यालेला चहा आणि रंगलेल्या गप्पा आठवतात. अनारक्षित डब्यातून केलेल्या या प्रवासाच्या आठवणींनी आयुष्यभरासाठी मनात आपली जागा रिझर्व्हड करून ठेवली आहे. हे सारं लिहिताना मनात तो क्षण आणि क्षण जागा होतो आहे. खरं सांगतो, हा इतका सुंदर अनुभव तुमच्यापासूनही लांब नाही..आत्ता तुम्ही बसला आहात, तिथून फक्त एक स्टेशन दूर आहे हा थरारक अनुभव..