शहरं
Join us  
Trending Stories
1
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
2
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
3
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
4
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
5
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
6
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
7
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
8
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
9
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
10
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
11
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
12
दोन ठाकरेंच्या एकत्र येण्याचे असे झाले प्लॅनिंग..!
13
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
14
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
15
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
16
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
17
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
18
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
19
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
20
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?

झिम्बाब्वे संघाचे पारडे जड

By admin | Updated: February 19, 2015 02:33 IST

झिम्बाब्वे द. आफ्रिकेकडून ६२ धावांनी पराभूत झाला खरा; पण त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली होती. ब गटाच्या या लढतीत झिम्बाब्वे संघात विश्वासाचा संचार झालेला दिसतो.

संयुक्त अरब अमिरातविरुद्ध आज लढत : पहिल्या विजयासाठी उत्सुकनेल्सन : द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या लढतीत दमदार कामगिरी करणाऱ्या झिम्बाब्वेला उद्या गुरुवारी विश्वचषकात कमकुवत मानल्या जाणाऱ्या संयुक्त अरब अमिरातविरुद्ध (यूएई) विजय अपेक्षित असेल. झिम्बाब्वे द. आफ्रिकेकडून ६२ धावांनी पराभूत झाला खरा; पण त्यांनी अनेकांचे लक्ष वेधून घेणारी कामगिरी केली होती. ब गटाच्या या लढतीत झिम्बाब्वे संघात विश्वासाचा संचार झालेला दिसतो. यामुळे यूएईचे आव्हान मोडीत काढण्यास वेळ लागणार नाही. या गटातून द. आफ्रिका, भारत आणि पाक यांचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश निश्चित मानला जात आहे. चौथ्या संघासाठी आयर्लंड, विंडीज आणि झिम्बाब्वे यांच्यात चुरस असेल. आयर्लंडने विंडीजला धूळ चारल्यामुळे झिम्बाब्वेवरील दडपण वाढले. झिम्बाब्वेने विश्वचषकाच्या सराव सामन्यात लंकेला पाणी पाजले. द. आफ्रिकेचेही ८३ धावांत चार गडी बाद केले होते. डेव्हिड मिलर- डुमिनी यांनी नंतर २५६ धावांची नाबाद भागीदारी करीत ४ बाद ३३९ धावा उभारल्या. झिम्बाब्वे ४९ षटकांत २७७ पर्यंत मजल गाठू शकला. या सामन्यात हॅमिल्टन मस्कद्जाने ८० आणि चामू चिभाभाने ६४ धावा ठोकल्या. अखेरचे पाच गडी ४१ धावांत बाद झाल्यामुळे घात झाला. १९८३ पासून नऊ वेळा विश्वचषकात सहभागी झालेल्या झिम्बाब्वेचा अनुभव अमिरातपेक्षा मोठा आहे. अमिरात संघ १९ वर्षांनंतर विश्वचषकात पुन्हा सहभागी होत आहे. १९९६ साली त्यांनी नेदरलँडवर एकमेव विजयाची नोंद केली होती. सराव सामन्यात यूएईचा अफगाणिस्तानने १४ धावांनी पराभव केला. मोहम्मद तौकीरच्या नेतृत्वात खेळणाऱ्या अमिरात संघातील अनेक खेळाडू भारतीय किंवा पाकिस्तानी वंशाचे आहेत. सर्व खेळाडूंचा अनुभव लक्षात घेतला तरी केवळ ७१ सामन्यांचा अनुभव असलेल्या या संघाला शिकण्यासारखे बरेच काही असेल.(वृत्तसंस्था) ४झिम्बाब्वे व युएई या संघामध्ये आत्तापर्यंत एकदिवसीय आंतरराष्ट्रीय स्पर्धेत एकही लढत झालेली नाही. त्यामुळे दोन्ही संघ एकमेकांविरुद्ध आपला पहिला विजय नोंदविण्यास उत्सुक असतील. पण यांच्यामध्ये टी-२०चा एक सामना झाला होता. ज्यामध्ये झिम्बाब्वेने ५ विकेटने विजय नोंदविला होता.झिम्बाब्वे : एल्टॉन चिगुम्बुरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा (यष्टिरक्षक), तेंडाई चतारा, चामू चिभाभा, क्रेग एर्विन, तफाड्जवा कामुंगोजी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मात्सीकेंयेरी, सोलोमोन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पन्यांगरा, सिकंदर रझा, बेंडन टेलर (यष्टिरक्षक), प्रोस्पर उत्सेया व सिन विलियम्स.युनायटेड अरब अमिराती : मोहंमद तौकीर (कर्णधार), खुरम खान (उपकर्णधार), अमजद अली, अमजद जावेद, अ‍ॅड्री बेरेंगर, फहाद अल्हाशमी, मंजुला गुरुगे, कमरान शाझाद, कृष्ण चंद्रन, मोहंमद नावीद, नासीर अझीज, स्वप्निल पाटील (यष्टिरक्षक), रोहन मुस्ताफा, शॅकलेन हैदर व शैमान अनवर.