शहरं
Join us  
Trending Stories
1
घाबरायची गरज नाही! ट्रम्प यांच्या H-1B व्हिसा बॉम्बनंतर उडालेल्या गोंधळात, अमेरिकन अधिकाऱ्यानंच दिली आनंदाची बातमी; म्हणाले, फक्त...
2
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
3
SL vs BAN : 'काठावर पास' झालेल्या बांगलादेशचा टॉपर श्रीलंकेला दणका; पराभवाचा हिशोबही केला चुकता
4
“२३८ नवीन रेक, नववर्षांत स्वयंचलित दरवाजे असलेली लोकल, ६० टक्के प्रवासी वाढ”: अश्विनी वैष्णव 
5
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
6
Asia Cup 2025 :मॅच संपल्यावर वडिलांच्या निधनाची बातमी! घरी जाऊन तो परत आला अन् देशासाठी मैदानात उतरला
7
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
8
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
9
उद्योगांना दिलेली अवाजवी एमआरपी सवलत तात्काळ मागे घ्यावी, मुंबई ग्राहक पंचायतीची केंद्रीय मंत्र्यांकडे मागणी
10
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
11
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
12
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
13
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
14
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
15
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
16
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
17
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
18
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
19
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
20
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...

झिम्बाब्वे द. आफ्रिकेला नमविणार?

By admin | Updated: February 14, 2015 23:32 IST

झिम्बाब्वे १९९९च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करणार का? त्या वेळी द.आफ्रिकेला नमवीत झिम्बाब्वेने खळबळ उडवून दिली होती.

हॅमिल्टन : झिम्बाब्वे १९९९च्या इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकातील कामगिरीची पुनरावृत्ती करणार का? त्या वेळी द.आफ्रिकेला नमवीत झिम्बाब्वेने खळबळ उडवून दिली होती. यंदाच्या विश्वचषकात उद्या रविवारी हे दोन्ही संघ पहिल्या सामन्यात पुन्हा एकमेकांपुढे येणार आहेत.‘चोकर’चा ठपका पुसून काढण्याच्या निर्धाराने आफ्रिकेचा संघ या विश्वचषकात खेळेल. त्यांच्या पुढे तुलनेने कमकुवत झिम्बाब्वे असेल. सराव सामन्यात न्यूझीलंड व आफ्रिकेला तुल्यबळ लढत देणाऱ्या झिम्बाब्वेत उलटफेर करण्याची क्षमता आहे.पहिल्या सराव सामन्यात या संघाने १५७ धावांत न्यूझीलंडचे सात गडी बाद केले. नंतर पाऊस आल्याने सामना रद्द झाला. दुसऱ्या सामन्यात झिम्बाब्वेने लंकेला सात गड्यांनी नमविले. दुसरीकडे १९९१ साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणारा आफ्रिकेचा संघ मोक्याच्या क्षणी धाराशायी होत असल्याने उपांत्य फेरीच्या पुढे गेलेला नाही. यंदा या संघाचे नेतृत्व डिव्हिलियर्सकडे आहे. त्याने विंडीजविरुद्ध अवघ्या ३१ चेंडूत जलद शतक ठोकले. हा संघ गोलंदाजी आणि फलंदाजीत संतुलित असून, क्षेत्ररक्षणही उच्च दर्जाचे आहे. संघाकडे हाशीम अमलासारखा सर्वोत्कृष्ट फलंदाज असून, तो क्विंटन डी कॉकसोबत सलामीला येईल. नंतर फाफ डुप्लासिस व जेपी डुमिनी हे विश्वसनीय फलंदाज आहेत. वेगवान माऱ्यासाठी डेल स्टेन आणि मोर्ने मोर्केलच्या सोबतीला व्हर्नोन फिलॅण्डर आणि काईल एबोट, तसेच फिरकीपटू इम्रान ताहीर आणि अ‍ॅरोन फर्गिसो आहेत. झिम्बाब्वेला अलीकडे विजयासाठी झगडावे लागले. बांगलादेशने त्यांचा ५-०ने पराभव केला. पण, आॅस्ट्रेलियन कोच डेव्ह व्हॉटमोर यांनी प्रशिक्षणाची जबाबदारी स्वीकारल्याने संघात नव्याने उत्साह संचारला. सराव सामन्यातील फॉर्म कायम राखण्यात झिम्बाब्वेला यश आले, तर १९९९च्या इंग्लंडमधील कामगिरीची पुनरावृत्ती निश्चितपणे होईल. (वृत्तसंस्था)दक्षिण आफ्रिका : एबी डिव्हिलियर्स (कर्णधार), हाशिम आमला (उपकर्णधार), कायले अ‍ॅबॉट, फरहान बेहार्डीन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), जीन पॉल डुमीनी, फा डू प्लेसिस, इमरान ताहीर, डेव्हिड मिलर, मॉर्ने मॉर्केल, वॅन पार्नेल, अ‍ॅरोन फंगिसो, वेर्नोन फिलेंडर, डेल स्टेन.झिम्बाब्वे : एल्टॉन चिगुम्बूरा (कर्णधार), रेगिस चकाब्वा, तेंडाई चतारा, चामू चिभाभा, क्रेग एर्विन, तफाड्जवा कामुंगोजी, हॅमिल्टन मसाकाड्झा, स्टुअर्ट मात्सीकेंयेरी, सोलोमोन मिरे, तवांडा मुपारिवा, तिनाशे पन्यांगरा, सिकंदर रझा, बेंडन टेलर (यष्टीरक्षक), प्रोस्पर उत्सेया, सिन विलियम्स.आफ्रिकेविरुद्ध उत्कृष्ट खेळ करू : एल्टोन हॅमिल्टन : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रविवारी होणाऱ्या वर्ल्डकपमधील पहिल्या लढतीत आम्ही शंभर टक्के योगदान देऊ, असे मत झिम्बाब्वेचा कर्णधार एल्टोन चिगुंबुरा याने व्यक्त केले आहे़ २८ वर्षीय कर्णधार म्हणाला की, पावसाचा अडथळा आलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या सराव लढतीत आमचे चांगले प्रदर्शन राहिले होते, तर श्रीलंकेला आम्ही धूळ चारली होती़ त्यामुळे संघातील खेळाडूंना आत्मविश्वास उंचावला आहे़ याच बळावर आम्ही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वोत्कृष्ट कामगिरी करू .