शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

ज्वेरेव्ह सलामीलाच गारद

By admin | Updated: May 31, 2017 00:41 IST

जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा नववा मानांकित जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्हला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत

पॅरिस : जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा नववा मानांकित जर्मनीचा युवा खेळाडू अलेक्झांडर ज्वेरेव्हला फ्रेंच ओपन टेनिस स्पर्धेत पुरूष एकेतरी स्पेनच्या फर्नांडो वर्डास्कोकडून पराभवाचा धक्का सहन करावा लागला. दुसरीकडे माजी विजेता आणि तिसरा मानांकित स्टेन वावरिंका आणि जागतिक क्रमवारीत नंबर एक असलेल्या ब्रिटनच्या अँडी मरेने आंद्रे कुज्नेत्सोव्हाचा पराभव करून दुसरी फेरी गाठली.वावरिंकाने पहिल्या सामन्यात स्लोव्हाकियाचा नवखा खेळाडू जोसेफ कोवालिक याच्यावर ६-२, ७-६, ६-३ ने विजय नोंदविला. २०१५ चा विजेता असलेल्या वावरिंकाची पुढील लढत युक्रेनचा अलेक्झांडर दोगलोपोलोव याच्याविरुद्ध होईल. दोगलोपोलोवने अर्जेंटिंनाचा कार्लोस बरलोक याच्यावर ७-५, ६-३, ६-४ ने विजय साजरा केला. मरेने दुसरा सेट गमावल्यानंतर उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून रशियाच्या आंद्रेचा ६-४, ४-६, ६-२, ६-० असा पराभव करून पुढच्या फेरीत प्रवेश केला़ज्वेरेव्हला यंदा फ्रेंच ओपनचा प्रबळ दावेदार समजले जात होते, पण पहिल्याच सामन्यात स्पेनचा अनुभवी खेळाडू फर्नांडो वर्डास्को याने त्याला ६-४, ३-६, ६-४, ६-२ ने धूळ चारली. हा सामना सोमवारी रात्री अर्धवट राहिला होता. आॅस्ट्रेलियाचा १८ वा मानांकित निक किर्गियोस हा देखील दुसरी फेरी गाठण्यात यश्स्वी ठरला. त्याने जर्मनीचा फिलो कोलश्रायबर याचा ६-३, ७-६, ६-३ ने पराभव केला. अर्जेंटिनाचा २९ वा मानांकित ज्युआन मार्टिन डेल पेट्रोयाने आपलाच सहकारी गुड्डो पेला याच्यावर सहजरीत्या ६-२, ६-१, ६-४ ने विजय नोंदविला. अमेरिकेचा २७ वा मानांकित सॅम क्वेरी याला मात्र पराभवाचे तोंड पहावे लागले. त्याला द. कोरियाचा हियोन चुंग याने ६-४, ३-६, ६-३, ६-३ ने धक्का दिला. महिला गटात ब्रिटनची सातवी मानांकित योहाना कोंटा पहिल्याच फेरीत पराभूत झाली. तायपेईची १०९ व्या स्थानावर असलेली सीह सु वी हिने १-६, ७-६, ६-४ अश फरकाने तिला नमविले. कोंटा तीनवेळा फ्रेंच ओपनच्या मुख्य फेरीत खेळली आहे. युक्रेनची पाचवी मानांकित इलिना स्वितोलिना हिने कझाखस्तानची श्वेदोव्हावर ६-४, ६-४ ने विजय साजरा केला. अमेरिकेची १२ वी मानांकित मेडिसन कीज, स्पेनची २१ वी मानांकित कार्ला सुआरेज आणि फ्रान्सची अलाईज कार्नेट यांनी देखील दुसरी फेरी गाठली. (वृत्तसंस्था)