शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

झहीरची नियुक्ती ही द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ आहे : बीसीसीआय

By admin | Updated: July 14, 2017 00:58 IST

भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचे गोलंदाजी सल्लागार म्हणून झहीरची करण्यात आलेली नियुक्ती फलंदाजी सल्लागार राहुल द्रविडप्रमाणे ‘दौरा विशेष’ असल्याचे बीसीसीआयने गुरुवारी स्पष्ट केले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने स्पष्ट केले की, झहीर व द्रविड या दोघांची नियुक्ती नवे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या सल्ल्यानुसार करण्यात आली आहे. सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) ९ जुलै रोजी मुख्य प्रशिक्षकपदासाठी पाच उमेदवारांची मुलाखत घेतली. कुठलेही मानधन न घेता हे काम केल्यामुळे बीसीसीआयने सीएसीचे आभार मानले. बीसीसीआयने म्हटले आहे की,‘क्रिकेट सल्लागार समितीच्या सदस्यांचे आभारी आहोत. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याची जबाबदारी स्वीकारण्यास सहर्ष सहमती दर्शवली. समितीच्या तिन्ही सदस्यांनी पारदर्शिता व प्रतिबद्धतेसह आपली जबाबदारी निभावली.’बीसीसीआयने पुढे म्हटले की,‘शास्त्री यांच्या नावाची शिफारस त्यांच्या सादरीकरणाच्या आधारावर करण्यात आली. शास्त्री यांची मुख्य प्रशिक्षकपदी निवड करण्यात आल्यानंतर सीएसीने त्यांच्या सल्ल्यानंतर विदेश दौऱ्यांसाठी संघाच्या गरजेनुसार फलंदाजी व गोलंदाजी सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. सीएसीने केलेल्या कार्याप्रति बीसीसीआय आभार व्यक्त करते. सोमवारी नव्या प्रशिक्षकाची निवड जाहीर करण्यात आल्यानंतर बीसीसीआयने स्पष्ट उल्लेख केला होता की, जहीर खान संघाचे पूर्णकालीन गोलंदाजी प्रशिक्षक राहतील. (वृत्तसंस्था)>सीएसीने व्यक्त केली राय यांच्याकडे नाराजी क्रिकेट सल्लागार समितीने (सीएसी) गुरुवारी सीओए प्रमुख विनोद राय यांना पत्र लिहून नुकताज भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदांवर कलेल्या निवडीबाबत आपली नाराजी कळवली. ‘राहुल द्रविड आणि झहीर खान यांची नियुक्ती मुख्य प्रशिक्षक रवि शास्त्री यांच्यावर लादण्यात आली आहे असे दृश्य सध्या उभे केले जात आहे,’ असे सीएसीने या पत्रात म्हटले आहे. सीएसीला केवळ मुख्य प्रशिक्षकाची निवड करण्याचे हक्क असताना त्यांनी त्यापलीकडे जाऊन राहुल द्रविड आणि झहीर खान यांचीही सल्लागार म्हणून निवड केली.