शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

अंतिम सामन्यात उतरताच युवराजची विश्वविक्रमाला गवसणी

By admin | Updated: June 18, 2017 15:31 IST

क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईला सुरूवात झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे.

 ऑनलाइन लोकमत

ओव्हल, दि. 18- क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या लढाईला सुरूवात झाली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने नाणेफेकीचा कौल जिंकून पाकिस्तानला प्रथम फलंदाजीचं निमंत्रण दिलं आहे. कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानसोबत या सामन्याला सुरूवात होताच भारताचा डॅशिंग फलंदाज युवराज सिंगने वर्ल्ड रेकॉर्ड रचला आहे.  आयसीसी स्पर्धेच्याअंतिम सामन्यात सातव्यांदा खेळण्याचा विक्रम त्याने आपल्या नावे केला आहे.
 
युवराजच्या आधी हा विक्रम ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंग आणि श्रीलंकेचे माजी कर्णधार कुमार संगकारा व महेला जयवर्धने यांच्या नावावर होता. पाकिस्तान विरोधात मैदानात उतरताच सिक्सर किंग युवराजने सातव्यांदा अंतिम सामन्यात खेळण्याची किमया साधली. 
(भारत-पाकिस्तान क्रिकेट सीरीजबद्दल काय म्हणाले अमित शहा)
 
एकदिवसीय कारकिर्दीत युवराजने आतापर्यंत 8622 धावा केल्या आहेत.  या दरम्यान त्याची सरासरी 37 इतकी असून त्याने आतापर्यंत 52 अर्धशतक आणि 14 शतक आपल्या नावावर केले आहेत. वन-डेमध्ये 150 धावा ही युवराजची सर्वाधिक धावसंख्या आहे. पाकिस्तानविरूद्धचा हा महामुकाबला म्हणजे युवराजचा 301 वा सामना आहे. त्यामुळे या सामन्यात आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करून युवराज भारताला जेतेपद मिळवून देईल अशी अपेक्षा चाहत्यांकडून वर्तवली जात आहे.  
भारत-
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, युवराज सिंग, एम. एस. धोनी, केदार जाधव, हार्दिक पांड्या, आर. अश्विन, रवींद्र जडेजा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार.
पाकिस्तान-
सरफराज अहमद (कर्णधार), अझहर अली, बाबर आजम, मोहम्मद हफीज, शोएब मलिक, हसन अली, मोहम्मद आमिर, जुनेद खान, इमाद वसीम,  शादाब खान, फखर जमान.