शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

युवराजच्या एक्स गर्लफ्रेंडचा होणार घटस्फोट

By admin | Updated: June 6, 2017 21:17 IST

मोहोब्बते फेम अभिनेत्री किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. किम शर्मा सर्वात अगोदर युवराज सिंहला डेट करत होती पण

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 6 - मोहोब्बते फेम अभिनेत्री किम शर्मासोबत युवराजचे अनेक वर्षं अफेअर होते. किम शर्मा सर्वात अगोदर युवराज सिंहला डेट करत होती पण युवराजच्या आईला किम पसंत नसल्याने त्यांचे नातं टिकलं नाही. त्यानंतर युवराजने हेजलशी लग्न केलं. तर युवराजशी ब्रेकअप झाल्यानंतर किमने अली पुंजाशी आपला संसार थाटला होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, अली पुंजानीने एका दुसऱ्या महिलेसाठी अभिनेत्री किम शर्माला सोडल्याचे समजत आहे. दोघे लवकरच घटस्फोट घेणार आहेत. विशेष म्हणजे केवळ एक आठवडा डेटींग केल्यानंतर दोघांनी विवाहाचा निर्णय घेतला होता. हॉटेल व्यावसायिक अली पुंजानीसोबत विवाह केल्यानंतर किम केनियात सेटल झाली होती. पण आता किम मुंबईत परतली असून तिने बॉलिवूडमध्ये पुन्हा काम शोधण्यास सुरुवात केली आहे.2010 मध्ये किमने केनियात राहणाऱ्या अली पुंजानीसोबत मोम्बासा येथे विवाह केला होता. अलीसोबत लग्न केल्यानंतर किमने तिचे बॉलिवूड करिअर सोडून दिले होते आणि ती अलीला बिझनेसमध्ये मदत करत होती. अलीच्या हॉटेल चेनची ती सीईओ होती. पण आता घर, पदभार सर्व सोडून परत आल्यामुळे किमला आर्थिक चणचण भासत आहे. किम मुंबईतच काम करुन तिथेच बिझनेस करु इच्छित आहे असे समजते.किम मुंबईला आल्यानंतर तिचे नाव मुंबईतील फॅशन डिजाईनर अर्जून खन्नासोबत जोडले जात आहे. दोघांना अनेकवेळा सोबत पाहण्यात आले आहे. इतकेच नव्हे तर 21 जानेवारी 2017 ला आपल्या वाढदिवशी किम अर्जूनसोबत गोव्याला होती. अर्जून खन्ना हा विवाहित आहे आणि त्याच्या पत्नीचे नाव शेफाली आहे.दरम्यान, अली पुंजानीसोबत विवाहाच्या अगोदर किम शर्मा स्पॅनिश बॉयफ्रेंड कडर्लोस मार्टीनला डेट करत होती. या दोघांचा साखरपूडाही झाला होता आणि लग्नानंतर मॅड्रिड येथे ती शिफ्ट होणार होती. पण काही कारणांमुळे साखरपूडा मोडला गेला आणि त्यानंतर किमने अली पुंजानीसोबत विवाह केला.