शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

यू मुंबाचा ‘पंगा’च भारी

By admin | Updated: July 21, 2015 00:49 IST

यू मुंबा संघाने घरच्या मैदानावर आपले वर्चस्व पुन्हा एकवार सिद्ध करताना यंदाच्या प्रो कबड्डी दुसऱ्या सत्रात पटणा पायरेट्सचे कडवे आव्हान २५-२० असे आरामात परतवले

रोहित नाईक, मुंबईयू मुंबा संघाने घरच्या मैदानावर आपले वर्चस्व पुन्हा एकवार सिद्ध करताना यंदाच्या प्रो कबड्डी दुसऱ्या सत्रात पटणा पायरेट्सचे कडवे आव्हान २५-२० असे आरामात परतवले आणि विजयाची शानदार हॅट्ट्रिक नोंदवली. या विजयासह यू मुंबाने सर्वाधिक १५ गुणांची कमाई करून गुणतालिकेत अव्वल स्थान आणखी मजबूत केले. पुन्हा एकदा कर्णधार अनूपकुमारने आक्रमक चढाया करताना मुंबईला सलग तिसरा विजय मिळवून दिला. याआधी झालेल्या सामन्यात तेलगू टायटन्सने दणदणीत विजयासह पुणेरी पलटणचा ४५-२४ असा धुव्वा उडवून दुसऱ्या विजयाची नोंद केली.प्रेक्षकांचा जबरदस्त पाठिंबा लाभलेल्या मुंबईने सलग तिसऱ्या सामन्यात मुंबईकरांना विजयाची भेट दिली. सुरुवातीला तोडीस तोड खेळ झालेल्या या सामन्यात नंतर वर्चस्व राहिले ते फक्त मुंबईकरांचे. रिशांकने सुरेशकुमार आणि अमित हुडा यांना बाद करून मुंबईला ११-७ असे आघाडीवर नेले. त्याच वेळी दीपक नरवालने कमाल करताना एकाच चढाईत रिशांक आणि सुरेंद्र यांना बाद करून पटणावरील लोणचे संकट टाळले. मात्र, स्टार आक्रमक शब्बीर बापूने आपला जलवा दाखवताना गिरीश एरनाक आणि दीपक यांना बाद केले व लगेच २०व्या मिनिटाला पटणावर लोण चढवून मुंबईने मध्यंतराला १७-१० अशी आघाडी घेऊन सामन्यावर पकड मिळवली.यानंतर मुंबईने मिळवलेली आघाडी अखेरपर्यंत कायम राखली. कोणतीही घाई न करता मुंबईने भक्कम बचावाच्या जोरावर सहज बाजी मारली. दुसऱ्या सत्रातदेखील शब्बीरने दबदबा राखला. दुसऱ्या बाजूला कर्णधार अनूप पटणा संघाला नाचवत होता. मोहित चिल्लर, जीवाकुमार आणि विशाल माने यांनी दमदार पकडी करताना दोन्ही आक्रमकांना चांगली साथ दिली. पटणाकडून संदीप नरवालचा अष्टपैलू खेळ संघाचा पराभव टाळू शकला नाही. रवी दलालनेदेखील आकर्षक चढाई करताना पटणाकडून अपयशी झुंज दिली. दखल घेण्याची बाब म्हणजे पटणाचा अव्वल खेळाडू कर्णधार राकेशकुमारला या सामन्यात एकही गुण मिळवता आला नाही. त्याने एकूण १० चढाया केल्या; मात्र चमक काही दाखवता आली नाही.